सातारा

पिकपंढरी

Submitted by सो भि या on 14 October, 2023 - 04:38

भातरोपांची हिरवळ, मुग्ध हवेत गारवा

काळ्या आईन नेसला, शालु भरजरी हिरवा

रोप एकामागे एक, उभी देखनी सुरेख

जशी रांगेत वारीच्या, वारकरी एक एक

बहरती परजागी, रोप भाताची निराळी

लेक लाडकी जशी, पर-प्रपंच सांभाळी

रानावनात अवध्या, सांडी सुर्याचे किरण

काळ्याआईच्या तान्ह्याला, करी तेजाचे कोंदण

आषाढ सरला, लागे श्रावणी हुरहूर

निळे मनाचे पाखरू, रानोमाळ भिरभिर

सर सर पावसाची, भेटे उन्हा उराउरी

उनपावसाचा खेळ, मनोहर खरोखरी

फेर धरूनी घुमतो, वारा वाजवी बासरी

दंग होवुनी नाचती, रोपे धान्याची शिवारी

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

जबरदस्त Smile

Submitted by Santosh zond on 26 July, 2020 - 13:00

तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !

शब्दखुणा: 

आठवणीतले क्षण...

Submitted by अभिजीत... on 6 April, 2018 - 05:17

दिवस होता दिवाळीचा ३० ऑक्टोबर २०१६ माझा आवडता सण .. दिवाळी, माझाच नाही तर सर्वांचाच आवडता सण खास करून लहान मुलांचा ...

तो दिवस होता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस..... पहाटे लवकर उठून कड्यक्याच्या थंडीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची मज्जा आज हि मनाला प्रसन्न करुन जाते.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

आत्ता कुठे कैदी रमाया लागला होता

Submitted by भालचंद्र on 8 February, 2018 - 04:31

जो ताठ मानेने जगाशी वागला होता
तो वृद्ध कमरेतून आता वाकला होता

मी नाईलाजाने उभ्या केल्यात या भिंती
तू एवढा मजबूत पाया बांधला होता

आत्ताच का केलीस तू सुटका तुरुंगातुन !
आत्ता कुठे कैदी रमाया लागला होता

मी ओढली चादर तरी तो हालला नाही
तो पांघरूनी सोंग तेव्हां झोपला होता

रस्ते तुझे, गल्ल्या तुझ्या, शहरे तुझी सारी
तू कोणत्या कारागृहातुन हरवला होता ?

-भालचंद्र

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम

Submitted by MallinathK on 20 February, 2015 - 20:59
तारीख/वेळ: 
20 February, 2015 - 17:30 to 5 March, 2015 - 19:30
ठिकाण/पत्ता: 
सारस बाग, पुणे ते विवेकानंद स्मारक, कन्याकुमारीसायकल मोहीम.

पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम 

पुणे - दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील काही सायकलप्रेमींनी पुणे ते कन्याकुमारी अशा सायकल मोहीमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम सारसबाग येथून २१ फेब्रुवारीला प्रस्थान करणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांतून प्रस्थान करत १६५० किमी प्रवास करून विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी येथे सांगता करण्यात येईल. 

पुणे-बामणोली बाईक राईड आणि कँपिंग

Submitted by सॅम on 9 November, 2014 - 23:41

काहि दिवसांपूर्वी मुंबईरेंजर्स बरोबर बामणोली बाईक राईड आणि कँपिंग साठी गेलो होतो... तेथिल ही काही प्रकाशचित्रे...

- मुंबईवरुन आलेल्याना मी NH4 bypass वर भेटलो
- पुढे सातारामार्गे बामणोली. कासला MTDCमधे जेवण.
- बामणोलीमधे नौकाविहार
- संध्याकाली बामणोलीमधे (शाळेच्या मागे) तंबू ठोकले. तळ्याकाठी जेवण. रात्री बर्‍यापैकी थंडी होती.
- सकाळी आवरुन बामणोलीहून १० किमी वरील फेरीच्या धक्यावर पोचलो. तिथुन फेरीने तापोळा.
- महाबळेश्वरमधे जेवण.
- वाईमार्गे पुणे

मार्गः


प्रांत/गाव: 

स्टौबेरी शेतीबद्द्ल माहीती हवी आहे..

Submitted by शोनु-कुकु on 16 October, 2013 - 05:51

स्ट्रोबेरी शेतीबद्दल माहीती हवी आहे...
भांडवल कीती लागते एकरी, उत्पन्न कीती असते...जमीन कशी लागते ..आणि स्कोप कीती आहे शेतीमधे..
मला थोडीफार माहीती आहे पण अजुन कोणाला काही माहीत असल्यास सांगा...

विषय: 
प्रांत/गाव: 

अद्भूत

Submitted by एस.व्ही. on 27 September, 2012 - 12:39

अद्भूत
--------------------------------

या भूतलावर काही गुढ रहस्य असते का? शाश्वत - अशाश्वतामध्ये काहीतरी सत्य दडले आहे असे म्हणतात. देव जाणे! पण खरेतर मानवी आयुष्य एक अगम्या गूढ आहे असेही कधी कधी वाटते. खरे खोटे देव जाणे! हा जाणता देव तरी कोण आहे की एका मायावी शक्तीलाच आपण पुर्वग्रहानुसार 'देव' असं संबोधतो? देव जाणे! काही असो....
पण मला वाटते तसेच कोणाला काही अद्भूत सापडेल तर इथे सांगावे ====>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

व्हाइट बोर्ड

Submitted by घबाड on 20 June, 2012 - 11:54

मला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.

साधारण किंमत किती असेल?

भिंतीला लावायला हूक असतात का? की स्टँडही येते त्याच्या बरोबर?

साधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट
१५० बाय १२० किंवा ९० सेमी.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - सातारा