अहमदनगर

महाविद्यालयीन इश्क

Submitted by प्रशांत तिवारी on 25 October, 2017 - 14:41

couple.jpg
कॉलेजातील मस्ती नि यारों की फुलवारी
नव्हतीच ती स्वस्ती तरी पण फुलवली भारी
कट्टा नि कटिंग चाय भी होता था शेरिंग
नडला आम्हाला की झालाच साऱ्यांना बोरिंग

नुसत्या एका नजरेने आंखोसे मार डालना
कुठूनस मनात धकधक तर हार्टबीट बढना
इशारो इशारो में ही पुरा पिरेड ऑफ जाना
घायाळ होतांना लाईफ के ख्वाबो में खो जाना

प्रांत/गाव: 

संध्याकाळ

Submitted by Shivkamal on 9 July, 2017 - 09:23

उंच उंच त्या तरु सावल्या
अनवाणी पहा चालू लागल्या
शुभ्र धवल ते तेज नाभाचे
काळोखाच्या काजळात झाकोळून गेले
सूर्याच्या किरण शलाका
लाल तांबड्या डोहात बुडाल्या
पानांची थांबली सळसळ
वाऱ्याच्या झोतासंगे
चाललेली उगी पळापळ
ढगांचे रथ मोठाले
घरट्यात सोडण्या स निघाले
अन रानातील माणसे
मोळ्यासंगे घरी निघाली

विषय: 
प्रांत/गाव: 

कश्मिर हँडलुम डीपार्टमेंटच्या नावाने फ्रॉड स्कीमस

Submitted by कविता१९७८ on 22 February, 2016 - 06:18

काल शिर्डीत होते, अगदि द्वारकामाईच्या अगदी बाजुलाच काश्मिरी हँडलुमचे दुकान होते, काश्मीर हँडलुम डेव्हलपमेंट एम्पोरीयम. विविध प्रकारचे काशिदा काढलेले ड्रेसमटेरीयल पाहुन त्या दुकानात गेल्या वाचुन राहवले नाही. एका मैत्रीणीने पश्मिना शाली बद्द्ला विचारताच दुकानदाराने माहीती द्यायला सुरुवात केली. कश्या प्रकारे चिगु / चिरु नावाच्या प्राण्यांच्या शरीरावरील लोकर कापुन ब्लँकेटस बनवतात आणि त्या स्कीम मधे ग्राहकांना वापरायला देतात.

विषय: 
प्रांत/गाव: 

पणती जपून ठेवा !

Submitted by विक्रम देशमुख on 2 November, 2014 - 01:53

स्नेहालया सम्बनधी आजच्या सकाळ सप्तरन्ग मधे आलेला सन्जय आवटे यान्चा लेख.

सुविख्यात समाजसेवकांनी समर्पित होऊन उभ्या केलेल्या भव्य कामाचं कौतुक असावंच, पण स्वतःच्या संवेदनांच्या कक्षा रुंद करणं हे त्याहून महत्त्वाचं. आपल्याला जे आणि जेवढं शक्‍य आहे, तेवढं प्रत्येक जण अवतीभवती करत गेला तर खूप काही बदलेल. नगरच्या ‘स्नेहालय’ या संस्थेचं काम त्यासाठीच महत्त्वाचं. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी या संस्थेनं जो प्रयोग केला, तो तर वस्तुपाठ आहे, लोकसहभागाचा. समाजाचं काम एकट्या-दुकट्यानं नव्हे, अवघ्या समाजानंच करायला हवं, अशा पद्धतीनं सगळे घटक सोबत आले, तर कामाचं रूप किती बदलू शकतं, याचा हा पुरावा.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

स्नेहालयास मदत

Submitted by विक्रम देशमुख on 5 February, 2014 - 06:17

प्रिय मित्रांनो , स्नेहालय परीवारातफे शुभेच्छा . आपण स्नेहालय परिवाराचे निकट सदस्य आहात. त्यामुळे एक महत्वाची विनंती आपणास करीत आहे. स्नेहालय सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या संस्थेचे बहुतांश प्रकल्प लहान, वैयक्तिक देणगीदारांच्या समर्थनावर काम करत आहेत. परंतु आपली गंगाजळी रिकामी झाल्याने दरमहा खर्चाचे सुमारे १२ लाख रुपये आपल्याला कष्टपूर्वक गोळा करावे लागतात. सध्या एड्स बाधितांचे रुग्णालय, हिमातग्राम, स्नेहधार, रेदिओनगर ९०.४ F.M. , पुणे स्नेहधार प्रकल्प, बालभवन प्रकल्प, अनामप्रेम, स्नेहालय ई- विद्यालय, अशा प्रकल्पांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रांत/गाव: 

आताशा मी....

Submitted by रमेश भिडे on 4 October, 2012 - 12:47

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो......................

सलील-संदीप चि ही गझल ऐकताना मलाही कुठेतरी जाणवले

च्यायला गेली ४ वर्षे फेसबुक वर काढली, २५५० मित्र, १७६० ग्रुप चा सदस्य

पण हातात काय?

फेसबुक वर हजार मित्र आणि गावात विचारेना कुत्र ,अशी गत

मग ठरवलं ,आता जरा मायबोली वर जावून बघुया

बघुया मिळते का कोणी जिवाभावाचे?

अरेच्चा ! पण इकडे पाहिले तर सगळीच मारामारी चाललेली ---

कोणी भगवा ,कोणी हिरवा ,कोणी पांढरा शुभ्र ...
पण या झेंड्याच्या पाठीमागे होती मळकट अभ्र ...

प्रत्येक जण आपापला झेंडा घेवून नाचतोय

विषय: 

अहमदनगर गटग

Submitted by चंपक on 16 March, 2011 - 01:48
तारीख/वेळ: 
21 May, 2011 - 02:00 to 04:00
ठिकाण/पत्ता: 
रविवार दि. २१ मे, २०११ दुपारी ४ ते ६ स्थळः <strong>झोपडी कॅन्टीन</strong>, सावेडी रोड, अहमदनगर (नवीन ठिकाण सुचवु शकता. जास्त लोकांना जे सोयीचे असेल ते नक्की करु! )

नगरी तसेच इतर मायबोलीकरांसाठी खुले गटग!

माहितीचा स्रोत: 
अहमदनगर गटग, मे २०११
विषय: 
प्रांत/गाव: 

आम्ही नगरकर....

Submitted by suddhir_sonawane on 4 July, 2009 - 10:10

मी मुळचा नगरमधील जामखेड तालुक्यातला...
म्हणुन पक्का नगरी...
ज्यावेळी पहिल्या॑दा पुण्यात आलो ना..
अगदी वेड लागायची पाळी आलेली...
कुणीही ओळखीच॑ नसलेल॑..
अशावेळी कुठल्याही तालुक्यातील..
कुठल्याही गावातील...

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - अहमदनगर