नागपुर

श्रावणमासी

Submitted by याकुब क्युरेशी on 20 August, 2018 - 23:05

श्रावणमासी, अपेक्षा मनाशी,
येईल कशीबशी, सर पावसाची ||

श्रावणमासी, नजरा अधाशी,
भिडती आकाशाशी, शोधी ढगंं ||

श्रावणमासी, शेतीची जराशी,
थांबवी सात्यानाशी, मेघराजा ||

श्रावणमासी, विनंती भास्काराशी,
सोयाबीन, कपाशी, सुकऊ नको ||

श्रावणमासी, मागणे देवापाशी,
बळीराजा फाशी, न जाओ कुणी ||

श्रावणमासी, स्वप्न उराशी,
धनधान्याच्या राशी, येतील धरा ||

विषय: 
प्रांत/गाव: 

प्रकाशन - "असेही-तसेही", "अग्निसखा"

Submitted by क्रांति on 28 July, 2011 - 02:36
तारीख/वेळ: 
7 August, 2011 - 21:00 to 23:00
ठिकाण/पत्ता: 
श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर

दि. ७-८-२०११ रोजी सायंकाळी ६ वाजता, श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथे मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली माझा "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. समस्त माबोकरांना आगहाचं निमंत्रण.

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - नागपुर