मायबोलीकर सदस्यांच्या गझला वाचत वाचतच , गझल पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.यावर
सुधारणेसाठी जाणकारांच्या सूचना याव्यात,म्हणून टाकत आहे.
आयुष्याची याही वर्षी नवी डायरी आली आहे..
तुझ्यावीना जगायचीही माझी तयारी झाली आहे..
नव नव्या संकल्पांच्या शपथा घेऊन झाल्या आहेत..
मुद्दाम या ही वर्षी तुला त्यातून सूट दिली आहे !
तसं माझं भविष्य मी आधीच लिहून ठेवलंय बघ !
प्रत्येक दिवशी फक्त तुझीच आठवण लिहिली आहे!
आधी जेव्हा तू नसायचीस तेव्हा त्रास व्हायचा..
पण आता रेटत जगायची मात्र सवय झाली आहे..!
जे बोलत आहेस ती ज्ञानाची देवघेव नाही
तू चांगदेव नाही अन मी ही ज्ञानदेव नाही
ह्या जगात सगळ्यांना नशिबाने छळलेले आहे
प्राक्तनास तळतळ देणारा तू एकमेव नाही
चक्रवाढ व्याजाने नेले जे होते तू दुःखा
मज जातमुचलका देण्याला कसलीच ठेव नाही
उदासीनसे रक्त धावते नाडी लागत नाही
कुठलाच जोश नाही मजला कुठलाच चेव नाही
अस्सल नाटक झोपेच्या सोंगाचे वठले आहे
बेशुद्धपणाइतकी जालीम कुठलीच टेव* नाही
(टेव - लत, व्यसनासारखी सवय. मूळ शब्द हिंदी असल्याने ही सूट घेता येते का हे जाणकारांनी सांगण्याची विनंती)
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
उशीर झाला आहे फार पण थांबशील का माझ्यासाठी
पाऊलवाटा रेंघाळशील का प्रतीक्षेत तू माझ्यासाठी..?
कितीतरी तुडवलो गेलो भावनेंच्या त्या ओझ्याखाली
हात धरुनी उठवशील अन कडकशील का माझ्यासाठी..
रेल्वे सारखा धावत आहे मज माहीत नाही ब्रेक जरी
लाल ध्वजाचे रूप घेऊनी फडकशील का माझ्यासाठी..?
खट्याळ हसतेस किती बिलगतेस झाले नयन हे फितुर जरी
स्वच्छ पांढरे ह्रदय घेऊनी धडकशील का माझ्यासाठी..?
पहाटेच्या त्या स्वप्नामध्ये मृत्यूचे तांडव बघितले
मृत्यूयात्रेत येतांना रडशील का तू माझ्यासाठी ?
आकाशात साचलेले काळे ढग,
दुरून कुठूनतरी येणारा भिजलेल्या मातीचा वास,
येऊ घातलेल्या पावसाला जणू पिटाळून लावणारा वारा,
वारा अंगावर झेलत खिडकीत उभा मी,
चेहऱ्यावर आदळलेलं ते वाळकं पान
आठवतात मला ते चिखलाने भरलेले इवले इवले पाय,
माझं भिजलेलं डोकं पुसण्यासाठी हातात टॉवेल घेऊन दारात उभी आई,
पावसात भिजलेलं अंग घुसळून पाणी उडवणारा तो कुत्रा, समोरच्या मैदानावर चिखलात खेळणारी ती मुले
महिला दिनाच्या शुभेच्छा !
इथे कोण कोण महिला उद्योजिका आहेत ?
आपण ह्या थ्रेड ला प्रतिसाद देऊन अनेकांचा गट तयार होऊ शकतो
किंवा आपण पटकन हे प्रतिसाद , आपल्याला हवे तसे संपर्क साधण्यासाठी वापरू शकतो.
माझ्यापासून सुरुवात करते.
मी : ऑनलाईन समुपदेशन ( शारीरिक , मानसिक ), वेबसाईट डिझायनिंग (लेखिका , प्रकाशिका , मराठी मासिकाची मालक इ. बरेच )सध्या बॅडमिंटनसाठी मैत्रीण पार्टनर शोधत आहे
इश्क़ की चादर ओढ़े समशान के बाहर
सो रहा था आशिक़ कोई ,
लोग बेरहेम जला के चले गए।