अद्भूत

Submitted by एस.व्ही. on 27 September, 2012 - 12:39

अद्भूत
--------------------------------

या भूतलावर काही गुढ रहस्य असते का? शाश्वत - अशाश्वतामध्ये काहीतरी सत्य दडले आहे असे म्हणतात. देव जाणे! पण खरेतर मानवी आयुष्य एक अगम्या गूढ आहे असेही कधी कधी वाटते. खरे खोटे देव जाणे! हा जाणता देव तरी कोण आहे की एका मायावी शक्तीलाच आपण पुर्वग्रहानुसार 'देव' असं संबोधतो? देव जाणे! काही असो....
पण मला वाटते तसेच कोणाला काही अद्भूत सापडेल तर इथे सांगावे ====>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*************************************************************************************************************************
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'तरंगणारा दगड'

p.txt.jpg

सौदी अरेबिया मधील अई-हिस्सा या गावामध्ये वर्षातून एकदा म्हणजे एप्रिल महीन्यामध्ये हा भला मोठा दगड जमीनीपासून ११ से.मी. अपोआप वर उचलला जाऊन तो जवळ जवळ ३० मिनीटे अधांतरीच तरंगत रहातो.

असे म्हटले जाते की, १७ वर्षापुर्वी (एप्रिल-१९८९) एक मुजाहीद या दगडामागे दडला असताना त्याला शूट करून मारण्यात आले होते. त्याचे आज देखिल या दगडावर असलेले रक्ताचे डाग पहायला मिळतात. व आश्चर्य म्हणजे जेंव्हा जेंव्हा हा दगड जमीनीपासून वर येतो तेंव्हा हे डाग अधीकच गडद व ताजे असल्याप्रमाणे लाल ओले होतात. तेथील गावकर्‍यांनी हे डाग पुसून टाकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतू पुसल्या नंतरही काही वेळाने हे डाग पुन्हा पुर्वीसारखेच उमठून येतात.

या दगडाबद्दल अनेक अख्यायीका आहेत. आरबस्थानातील इस्लाम धर्मी लोक याला एक आल्लाहचा चमत्कार मानतात.

दगड स्थिर असताना वेगवेगळ्या वेळी घेतल्या गेलेल्या काही इतर प्रतिमा :-

p.txt02.jpgp.txt.03.jpgp.txt.04.jpgp.txt.05.jpg

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users