चिखलाच्या वलयात फुलते,चिखल कधी होत नाही
काट्यांच्या विळख्यात खिळते,निखळ कधी होत नाही
कमळ फुलाच्या पाकळ्यांवर
चंद्र होऊन साचते कविता,
पानवेलीच्या धुंद कळ्यांवर
पाऊस होऊन नाचते कविता,
आयुष्य देही कुरुक्षेत्रावर
कर्ण् होऊन गाजते कविता,
निरागस जिवाला लागल्यावरती
आई होऊन याचते कविता,
चिखलाच्या वलयात फुलुन,काट्यांच्या विळख्यात खिळुन कधीही संपत नाही कविता,
माती होऊन मातीत रुजते,पुन्हा पहाटे फुलते कविता.
माझ्यासाठी तुझे ते गाणे असू दे
सांगायास काही गाऱ्हाणे असू दे
तुझ्यासारखे कैक वेडे इथे रे
मज सारखे काही शहाणे असू दे
नवे यमक काही सुचलेच नाही
जुळलेले शब्द जुने पुराणे असू दे
विरहाचे क्षण आहे मनी पण
आठवणीत चोरून पाहणे असू दे
खरे सुख आहे तुझे तुज पाशी
जरा दुःख गोजिरवाणे असू दे
जीवनास या अर्थ नसेल तरीही
जगायास थोडे बहाणे असू दे
इथे काय सारेच कविवर्य नाही
दोन चार श्रोते दिवाणे असू दे
- अमेय
7387674171
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
डोळ्यात तेल घालूनी, कण कण आम्ही निसला,
शोध लागला प्रकाशाचा ही, परी अंधार कसा दिसला,
असा कसा रे रुसून बसला,
काळ्या पाषाणावरील इथला थेंबही पुसला.
आभाळाच्या कोर्या पाटीची, रेघही कुठे दडून गेली,
मातीलासुद्धा विसरून आता आम्हालाही पोरकी झाली,
सुगंध दरवळणारा तो मातीचा, कुठे तीच हरवून गेली,
अंधार्या दुनियेतल्या त्या राजानं, इथं कशी रे घरटी केली..
आयुात असं नव्याने परत कधीतरी भेटू ....
ओठांवर थोडंसं हू अन काळजात बरंचसं रू ...
क्षणातच आठवेल आपल्या प्रेमाचा इतिहास ...
तो एकच षण मात्र सर्व काही झालं होत खल्लास .....
तरीही मात्र वाट पाहत होो भेटीची .... कारणे
बाकी राहिली ोती ना एकमेकांना सुावयाची .....
ुठून सुरु होतो असा ्रेमाचा आरंभ ..
ा ओढवो मग नंतर वेडसरपणाचा रारंभ .....
का वाढत गेलं आ्यातलं अंतर ....
यातून मन आता ोत जाते कातर कातर
होता माझा श्याम अन होते मी तुझी राधा ...
जूनगेले पूर्ण जीवन पण तो क्षण राहिा अर्धा ....
जनसामान्यांमध्ये इंश्युरंस आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टींबद्दल कमालीची कन्फ्युजंस , समज गैरसमज आढळून येतात . आणि आजकाल जश्या जश्या पेन्शन मिळणाऱ्या नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत त्या प्रमाणात हे गैर समज वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सामान्यत: हातात असलेला पैसा कुठेतरी गुंतवला की मनावरचे दडपण कमी होते. (असं आपल्याला वाटतं ) पण आपण काही गोष्टी साफ विसरून जातो , उदाहरणार्थ :
1) आपल्याला नक्की काय हवे होते अथवा आहे ?
2) आपल्याला जे हवे होते, ते या व्यवहारातून मिळणार आहे का ?
3) जे आऊटकम या व्यवहारातून मिळणार आहे ते आपल्याला पुरेसे अथवा उपयोगाचे आहे का ?