ठाणे

विहिर

Submitted by vijaybhoir on 15 May, 2020 - 09:50

कितीशी असते अशी
एखाद्या विहिरीची जागा
एका वर्तुळा भोवती
सारा खोलीचा त्रागा

उन्मादत असते पाणी
खोल खोल डोहात
काढणारा मात्र असतो
आपल्याच उंचीच्या ओघात

मस्त सिमेंट काँक्रीटवर
हात जखडून ठेवतो
मान अर्धी खोलात
विस्कटणारे प्रतिबिंब बघतो

एवढ्या पाषाणी दगडात
ओलावा असेल तरी कसा
पडणारी एक एक भेग
जसा ओलावा देईल तसा

इतके अंदाज सारे
वरूनच कसे बांधायचे
स्पर्शविना इतके सारे
असेच कसे बोलायचे

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मी उगा भांडतो तुझ्याशी !

Submitted by प्रकाशसाळवी on 8 May, 2020 - 09:54

उगा तुझ्याशी भांडतो मी
वेदना तुझ्या मांडतो मी
**
लपवू नकोस आसवांना
चांदणे बघ सांडतो मी
**
अबोल तू होवू नकोस
शब्दांस कसा तांडतो मी
**
केस कर मोकळे तूझे
मोगरा कसा माळतो मी
**
होवू नको निराश तू
वंचना तुझ्या कांडतो मी
**

विषय: 
प्रांत/गाव: 

मी

Submitted by किमयागार on 6 May, 2020 - 15:15

कोण होतो काल मी अन् कोण आहे आज मी?
मी, मला अन् माझ्यामधे गुंतलो माझाच मी.

कधी होतो कुणाच्या जीवनाचा भाग मी,
कधी होतो कुणाच्या आसवांचा थेंब मी.

कधी होतो कुणाची पेटणारी चूल मी,
कधी होतो कुणाच्या भाकरीचा घास मी.

पाऊसवेड्या या मृदेचा बहरणारा गंध मी,
कधी होतो मृदेला भिजवणारा पाऊस मी.

काल होतो हा जसा मी, आज कोठे आहे असा मी?
'मी'च जाळून 'मी'पणाला, उरलो आता राखेत मी.

----------मयुरेश परांजपे-----------

प्रांत/गाव: 

काय उरले

Submitted by पारिजातका on 6 May, 2020 - 14:34

तुझ्या माझ्यात काय उरले
'मी' पणा सोडून सारेच विरले
माझेच खरे करता करता
आपलेपण कधीच हरले

घेतल्या होत्या ज्या आणाभाका
शब्द ते मंत्रातच दडले
सप्तपदीच्या पावलांचे
रक्तबंबाळ ठसेच उरले

सोबतीचे क्षण आपुले
आठवणीत एकाकी पडले
दुरावलेले मन हे आता
मार्ग वेगळा शोधून गेले

हरवले नाते साताजन्मचे
बंध प्रेमाचे तुटून गेले
अहंपणाच्या अहंकाराने
शापित जीवन मात्र उरले

- प्राजक्ता

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

अधूरे स्वप्न

Submitted by पारिजातका on 5 May, 2020 - 16:14

निघालो होतो जग जिंकाया
पण स्वप्न ते अधूरेच राहिले होते
दावेल वाट विजयाची असे
सारथी तरी कोठे राहिले होते

दांभिकतेने भरलेल्या जगाने
अस्तित्वच माझे पुसले होते
विनवीत होतो ज्या दगडाला त्यात
देवत्व तरी कोठे उरले होते

ऊन सावलीच्या खेळात या
डाव सारे निसटत होते
जिंकाया साथ देणारे
हात तरी कोठे उरले होते

भूतकाळातील जखमांचे
व्रण काही जात नव्हते
वेदना शमतील असे
मलम तरी कोठे उरले होते

मायेने गोंजारणारे
स्वर निःशब्द झाले होते
जीवन मैफिल रंगवणारे
सूर निरागस कोठे राहिले होते

प्रांत/गाव: 

फळी

Submitted by किमयागार on 4 May, 2020 - 15:14

मज बागेत फिरता फिरता,
दिसली फळी जखमी, केविलवाणी.
ती तशीच कणखर होती,
जरी दोन ठिकाणी तुटलेली.

ती फळी मला म्हणाली,
मी थकून गेले राजा,
या टोळ्यांना देऊन थारा.
आज हीच टाळकी माझी,
गंमत पाहून गेली.

तो बाक बघ बाजूचा,
तो माझा प्राणसखा अन् साथी.
मी जी जी भोगली दु:खे,
ती त्याच्याही वाट्याला आली.

या बाकाहून प्रेमळ दुसरा,
मी कुणीच पाहीला नाही.
मी तुटून पडल्यानंतर त्याने,
दुसरी फळी शोधली नाही.

----------मयुरेश परांजपे---------

प्रांत/गाव: 

वास्तव

Submitted by किमयागार on 4 May, 2020 - 14:02

मी श्वापदांना उपाशी झोपताना पाहिले,
मी माणसांना अधाशी भूंकताना पाहिले.

सागराला सागराशी बोलताना पाहिले,
मी नद्यांना सागराशी भांडताना पाहिले.

बोलणाऱ्या माणसांना मारणारे पाहिले,
मारणाऱ्या माणसांना पोसणारे पाहिले.

रोज ती गाथा तुक्याची वाचणारे पाहिले,
गाथेतल्या त्या तुक्याला टाळणारे पाहिले.

अशाश्वताने शाश्वताला गाडताना पाहिले,
मी शाश्वताची अंत्ययात्रा चालून पाहिले.

----------मयुरेश परांजपे----------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

काही विनोदी जाहिराती आणि नामफलक...

Submitted by अजय चव्हाण on 5 November, 2019 - 07:39

परवा कोल्हापूरहून येताना सातारा पुणे हायवेवर भोरजवळ एका हाॅटेलची जाहिरात पाहण्यात आली आणि ती पाहून हसावं का रडावं हे कळतचं नव्हत.. जाहिरात साधारण अशी होती -

हाॅटेल ओमकार

महाराजा मिसळ.
निखारा मिसळ.
दही मिसळ.
सुखी भेळ.
......

आणि बाजूच्या कोपर्यात मोठा वर असलेला दिशादर्शक बाण आणि त्याखाली लिहलेलं..

क्लिन टाॅयलेट

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

रसत्यावरील त्या भारतीयांसाठी आधार ज्यांना समाजाने टाकुन दिले आहे.

Submitted by निलेश बच्छाव on 22 March, 2019 - 04:43
तारीख/वेळ: 
22 March, 2019 - 04:34 to 31 March, 2019 - 04:34
ठिकाण/पत्ता: 
उल्हासनगर-04

FB_IMG_1553152676057.jpg11 वर्षानंतरची ग्रेट भेट .
उल्हासनगर मध्ये स्टेशन परिसरात बेवारस पणे राहत असलेल्या आणि शारीरिक स्थिती ठिक नसलेल्या बबन कांबळेंची त्यांच्या कुटुंबीयांशी 11 वर्षानंतर भेट घडवुन दिली .
घटनाक्रम-1)3 मार्च ला उल्हासनगर स्टेशन परिसरातुन जाणीव वृद्धाश्रम मध्ये ठेवण्यात आले.
2)7 मार्च पर्यंत त्यांना साई रुग्णालय विठ्ठलवाडी येथे उपचारासाठी दाखल केले

माहितीचा स्रोत: 
रसत्यावरील बेवारस,अनाथ,मनोरुग्ण भारतीय नागरीकांना आधार आणि पुर्नवसन.

चिरुमाला (भाग २)

Submitted by मिरिंडा on 30 April, 2018 - 02:41

मी पाटलांच्या मागे चाललो होतो. मध्येच एकदा थांबून मला म्हणाले," आणा ती ब्याग इकडं.." मी म्हंटले , " राहू द्या हो. मी आणतो की." त्यावर ते म्हणाले," अवंअसं कसं ,कुनि पाह्य्लं तर काय म्हनल ,पावन्यास्नी सामान घेऊन चालवतोय. " मग मात्र मी त्यांना म्हंटलं , " नाही नाही , ठीक आहे. " पण त्यांनी ऐकलं नाही. माझ्या हातातली बॅग घेऊन ते निघाले. आम्ही बराच वेळ चालत होतो. रस्ता म्हणजे रानातली पायवाटच होती. .... आजूबाजूला माजलेलं रान आणि त्यातली रानटी रंगीबेरंगी फुलं पाहात मी जात होतो. पाटील वयस्कर असले तरी त्यांचा चालण्याचा वेग माझ्य दुप्पट होता. मला फार भराभर चालावे लागत होते.

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - ठाणे