एका मराठी माणसाने धडाडीने किराणा दुकान चालू केले. ते चालवून पण दाखवले. पण आता त्यात ऊंदीर झाले आहेत. त्यांची संख्या वाढतेय. वास सुटतो. धान्य खराब होतेय. गोळ्या ठेवल्या तर काही मरतात पण अंडी घातलेली असतात त्यातून मोठे सैन्य तयार होते. ते कुटुंब मेटाकुटीला आले आहे.
पेस्ट कंट्रोलचा उपयोग झाला नाही. त्यांनीही ऊंदरांची ग्यारंटी दिलेली नाही. स्प्रे वगैरेचा फारसा फायदा होत नाही. तसेच अन्नधान्यामुळे बरेच पर्याय बाद होतात. एका मारवाड्याने दुकान बंद करून दुसरा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. तो पटतो पण..
माझी मुलगी ऑनलाईन जर्मन व मराठी भाषेचे वर्ग घेते. तिचे काही विद्यार्थी परदेशात आहेत.
यातल्या काही लोकांची तिथल्या भारतीय बँकेत खाती आहेत. ते फी खात्यातून ट्रान्सफर करतात तेव्हा मुलीच्या खात्यात एकही रुपया कट न होता सगळे पैसे येतात. बँकेचा जो एक्सचेंज रेट असतो त्याप्रमाणे पैसे मिळतात.
ज्यांची अशी खाती नाहीत त्यांच्याकडून मुलगी paypal ने फी घेते. इथे त्रास असा आहे की paypal स्वतःचा एक्सचेंज रेट वापरते जो बँकेपेक्षा कमी आहे आणि वर कमिशनही जास्त घेते. तिचा यामुळे दुहेरी तोटा होतो.
मला या संदर्भात खालील माहिती हवी:
नमस्कार,
मायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.
मी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.
हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?
मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.
मिशन मंगळ
२० ऑगस्टला इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या 'अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर' (Unlocking India's Potential in Space Sector) या वेबिनार मध्ये आम्ही भाग घेतला होता. इस्रोचे खाजगीकरण होणार आहे अशा चर्चा बऱ्याच काळ चालत होत्या परंतु तसे काहीच होणार नाही, पण खासगी कंपन्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं आणि त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असं इस्रो चेअरमन के सिवन म्हणाले. खासगी कंपन्या इस्रोसोबत अंतराळ मोहिमांत भाग घेतील परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील असं ही ते म्हणाले.
तुम्ही जर कार्पोरेट नोकरी करत असाल तरच या पुढे वाचा. हे माझे कॉर्पोरेट जगतातील तीस वर्षाचे अनुभव आहेत. लक्षात ठेवा कुठली ही कंपनी तुम्हाला नौकरी वर ठेवताना चॅरिटी म्हणून ठेवत नसते. तुम्ही जर नोकरी करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअल प्रॉफिट सेंटर समजले पाहिजे.
मागच्या आठवड्यात बि.बी.सी. वर '3 Years in Wuhan' ही डॉक्युमेंटरी पाहीली. चीन मध्ये नवतरुणांईचा Start Up venture मधील संघर्ष ह्याबद्दल एक छान आढावा आहे.
https://www.bbc.co.uk/programmes/m000jlrw
त्यात मला विषेश एक वाटले की चिनी नवतरुणांन्ना त्यांच्या संघर्षाच्या काळात हरप्रकारे support करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काही यंत्रणा आहेत. त्याची availability आणी नियोजन प्रकर्षाने भावले व असे भारतात आहे का असा प्रश्न पडला.
गुड मॉर्निंग मायबोली . कालच मातृदिन साजरा झाला .
कुठेतरी ऐकले कि - एक आठवडा आधीच कामगार दिन साजरा केला असताना वेगळ्या मातृदिनाची गरज आहे का?
मायबोलीकरांना काय वाटते?
समजा तुम्हाला एक दिवस कोरोना आणि लॉकडाऊन मुक्त मिळाला तर तुम्ही काय प्लॅन कराल?
फक्त एक दिवस मिळणार आहे समजा आणि तेवढाच.
सांगा सांगा काय कराल?
माझ्यापासून सुरु करतो- मी पोरांना शाळेत पाठवेन आणि घरी आराम करेन . प्रचंड गोंधळ चालू असतो घरात दोघांचा .