निसर्ग

हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

Submitted by सिद्धेश्वर विला... on 1 June, 2020 - 07:41

हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

तुजपर्यंत पोहोचण्यास पुष्पक विमान दे

घेऊन जा उंच नभी, अंबरात राहू दे

गगनातुनी सुंदर ती वसुंधरा मज पाहू दे

हे धरती तू मजला हरितसृष्टी दान दे

मुक्तपणे विहारण्यास घनदाट रान दे

काम क्रोध मत्सराने व्यापली धरा ऊभी

प्रेम क्षमा शांती फुलवण्या देहात त्राण दे

हे वरुणा तू मजला चैतन्य वरदान दे

झुळझुळ ती ऐकण्या अंतरी दोन कान दे

जीवन तू सृष्टीचे , फुलवतोस धरा सारी

कोपू नको कधी पुन्हा, संयमाचे वाण घे

हे समीरा तू मजला निर्भयता दान दे

कणाकणात पोहोचण्यास वाहण्याचा मान दे

शब्दखुणा: 

चक्र

Submitted by अनन्त्_यात्री on 26 May, 2020 - 12:41

झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर

सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर

नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार

प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र

चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर

विषय: 

कॅनव्हास

Submitted by पाचपाटील on 25 May, 2020 - 03:03

आता हे लिहायलाच पाहिजे, असं काही हातघाईवर आलेलं प्रकरण नाहीये.
पण उगीच आपला चाळा म्हणून एखाद्या प्रेषितासारखं अद्भुत काही आपोआप येतंय का ओंजळीत, हे चेक करून बघावं म्हणून बसलोय.

समोर खिडकीची आयताकृती फ्रेम.

फ्रेमच्या पलीकडच्या बाजूला आकाश,त्याखाली झाडं, मोकळा रस्ता, बिल्डिंग्ज आहेत.
थोडावेळ बिल्डिंग्जच्या कोपऱ्यावर, थोडावेळ झाडांच्या फांद्यांवर वेळ काढणारे पक्षी आहेत.
वरती ऊंच घारींचे शांत लयीतले हालते एकमेकींना छेडणारे काळसर पुंजके आहेत.
कधी दिसतातय कधी नाहीत.
त्यांचं त्यांचं चाललंय आपलं.

विषय: 
शब्दखुणा: 

मेळघाटातला एक दिवस (भाग-५ अंतिम)

Submitted by अरिष्टनेमि on 24 May, 2020 - 17:00

या सगळ्या भानगडीत आंघोळीला वाजले १०. मस्त कोमट-कोमट पाण्यानं आंघोळ केली. ऊन चांगलंच कावलं होतं. पुन्हा सर्पसिंहासनात आरुढ झालो. हाताशी दुर्बीण ठेवली. हो. असलेली बरी. खूप वेळा काहीही अनपेक्षित दिसू शकतं.

शब्दखुणा: 

मेळघाटातला एक दिवस (भाग-४)

Submitted by अरिष्टनेमि on 19 May, 2020 - 21:34

मी ‘कुठंय?’ म्हणून विचारल्यावर त्यानं शांतपणे बोट दाखवलं. माझ्यापासून दोन-तीन फूट दूर खुर्चीच्या मागं उजव्या हाताला भिंतीला चिकटून साप शांत पसरला होता.

‘आपण याच्या खुर्चीखाली साप सोडून आलोय’ याचं काहीही ओझं न बाळगता रामलाल जसा शांतपणे आला तसाच अतीव शांततेत निघून गेला. मी वळून सापाकडं पाहिलं. त्यानं काहीतरी खाल्लेलं होतं. मी विचार केला. ‘हा शांत पसरला आहे. कुठं जाणार नाही आता. आता आधी गरम गरम चहा घेतो, मग त्याच्याकडं पाहू.’ रामलालच्या शांतपणानं मला चांगलाच आत्मविश्वास आला होता. मी आता ‘शूर वीर’ झालो होतो. मी अजूनच ऐसपैस बसलो. शौर्य दाखवायची हीच वेळ होती.

विषय: 
शब्दखुणा: 

संध्याकाळ

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 02:54

किती ही मनमोहक संध्याकाळ,
तिची स्तुती ही किती करावी।
तिच्यात भर पडावी म्हणोनि,
प्रभाकराने  किमया साधली असावी।
निळ्या आकाशाचे ते रंग बदलणे,
जणु वसुंधरेला आपले मोह लावणे।
त्या रविकिरणाने संध्याची,
सुंदरता अजूनच वाढली असावी।
जणु आकाशी रंगाच्या साडीवर ,
सोनेरी छटा उतरली असावी।
ह्या  संध्येचा अनमोल नजारा,
त्या सौंदर्यवतीने अनुभवला सारा।
त्या लावण्य वतीने ,
त्या छनात अजूनच भर घातली।
करुनी परिधान तो निळा रंग,
जणु आकाशाशी मेळ बसली।
त्या संध्ये सोबत तिने ही,
माझे मन वेधले।

मेळघाटातला एक दिवस (भाग-३)

Submitted by अरिष्टनेमि on 15 May, 2020 - 13:58

मला बघताच झुडूपात बसलेला लालबुड्या बुलबुल अकारण अस्वस्थ झाला. फांदीवर बसून भयंकर टिवटीवीनं निषेध करू लागला. त्याचं घरटं की काय म्हणावं इथं? पण त्या तपासात मी पडलो नाही. घाबरतात पाखरं फार. लहान काय अन् मोठी काय? घरटं प्रत्येकाला जपायचं असतं. आपल्या या विश्वासावरच तर चिवचिवती पिल्लं मोठी होतात. उडून जायचं बळ त्या धडपडत्या पंखात घरटंच तर भरतं. मग त्या पाखराच्या घरट्याशी त्याला घाबरवण्यात काय शहाणपण? ‘नाही रे बा. तुझ्याशी मी येत नाही. शांत रहा. पिलांना बळ दे. पंखावर आनंद घेऊन उडू दे त्यांना माझ्या रानात अन् घरट्याची ताकद या रानाला लाभू दे. रान फुलू दे, फळू दे, वाढू दे.’

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग