तत्त्वज्ञान

श्री नृसिंह स्तवन

Submitted by पुरंदरे शशांक on 8 May, 2022 - 10:29

श्री नृसिंह स्तवन

अतिऊग्ररुपे झणी स्तंभ फोडी
अचाटे अफाटे नखी दैत्य फाडी
महा गुर्गुरे तो ध्वनि गर्जताहे
नभी लख्लखाटे मही कापताहे

कडाडे धडाडे जणू वज्र ताडे
अकस्मात स्तंभातूनि येत कोडे
मुखा शार्दूलाचे रुपे उग्र साजे
स्वये धावते भक्त प्रल्हाद काजे

राम आत्माराम

Submitted by पुरंदरे शशांक on 30 April, 2022 - 20:30

राम आत्माराम

उपवास पूर्ण । असो साधे अन्न ।
राम नामाविण । निरर्थक ।।

राहो गिरी, धामी । महाली आश्रमी ।
राम ते सप्रेमी । तरी सौख्य ।।

असो उपकारी । नेमस्त संसारी ।
रामाविण फेरी । चुकेचिना ।।

थोर नित्य कर्म । बहु दान धर्म ।
रामचि सुवर्म । तयामाजि ।।

रामनाम मुखी । जगी दोष देखी ।
रोगी सर्वार्थेसी । पथ्यहीन ।।

चित्ती राम जाण । तेणे समाधान ।
व्यर्थचि साधन । तयाविण ।।

राम आत्माराम । निश्चये स्वधर्म ।
प्रचिती सप्रेम । सद्गुरु योगे ।।

50 फर्स्ट डेट्स - एका वेगळ्या दृष्टिकोनातून !

Submitted by पुरंदरे शशांक on 26 April, 2022 - 01:26

50 फर्स्ट डेट्स - एका वेगळ्या दृष्टिकोनातून !

तुम्ही या उन्हाळ्यात काय बेत आखताय ...

Submitted by च्रप्स on 23 April, 2022 - 11:45

उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...

समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...

झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...

माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...

विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...

शब्दखुणा: 

श्री तुकाराम महाराजांचे उपदेशपर अभंग

Submitted by पुरंदरे शशांक on 20 April, 2022 - 04:04

श्री तुकाराम महाराजांचे उपदेशपर अभंग.

फळ देठीहूनि झडे | मग मागुतें न जोडे ||१||

म्हणउनि तातडी खोटी | कारण उचिताचें पोटीं ||२||

पुढें चढें हात | त्याग मागिला उचित ||३||

तुका म्हणे रणीं | नये पाहों परतोनि ||४||
.............................................................................

कपिवर बलशाली

Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2022 - 04:55

कपिवर बलशाली मारुती ब्रह्मचारी
रघुविर स्मरताची घेत राही भरारी

स्मरण तरी जयाचे सोडवी सर्वदुःखा
भय तरी बहु ज्याचे कंपविते कृतांता

लखलख तरी रोमी उज्वले सर्वकाळी
झडकरि रवीलाही फेकिले अंतराळी

कनक किरिटधारी पुच्छ ते मुर्डियेले
तळपत अति कांती अग्निने वेढलेले

कठिण तनु जयाची वज्र का लाजविते
विहरत गगनासी सूक्ष्मता लोपविते

अतुल अति बळी हा मारुती निर्विकारी
दहन सकळ लंका रावणा होत भारी

मरुतसुत मनाने रामपायी स्थिरावे
जपत तरि मुखाने नाम ते सर्वभावे

..............................................

या मृत्यूने मला काय शिकवलं?

Submitted by पियू on 31 March, 2022 - 14:49

लेखाचा विषय तसा कटू आहे. पण तरीही हिंमत करून लिहितेय.

माझ्या आसपासचे लोक / जवळचे नातेवाईक / काही सेलिब्रिटीज इत्यादी यांच्या मृत्यूने मला काही न काही साक्षात्कार झालेला आहे. काहीतरी आयुष्यभराचा धडा दिलेला आहे.

कदाचित तुमच्याही बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असा डोळे उघडण्याचा क्षण आला असेल. तर शक्य असेल आणि काही हरकत नसेल तर कृपया इथे शेअर करावे.

शब्दखुणा: 

'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 4 February, 2022 - 21:55

मनातल्या उन्हात मी.....

Submitted by बदाम.... on 11 January, 2022 - 13:45

मनातल्या उन्हात मी ......

मनातल्या उन्हात मी, का असा हिंडतो
कारण माझ्या असण्याचं, सतत शोधू पाहतो

असेल काही उद्देश त्याचा, मनाची समजूत घालतो
गुमान मुंग्यांच्या रांगेमध्ये, नाकासमोर चालत राहतो
मनातल्या उन्हात मी ......

अचानक जेव्हा पेपरमध्ये, दुर्बल सोशीत वाचतो
विस्तवास माझ्यातल्या, फुंकर पुन्हा घालतो
स्वकर्तृत्वावर जग बदलण्याची, पुन्हा खूणगाठ बांधतो
भारावलेल्या सरड्यासारखा, कुंपणापर्यंतचं धावतो
मनातल्या उन्हात मी ......

ध्यान..

Submitted by _आदित्य_ on 2 January, 2022 - 14:33

डोळे मिटावे, स्वतःला पुसावे..
तू आहेस की फक्त करतोस दावे?
जरासे बघावे, स्थिरचित्तभावें...
मिळतात का जीवनाचे पुरावे !?

मन हे खरे की झरे कल्पनांचे?
देहात लय की प्रलय वासनांचे?
दिसतील काही भयाधीन गावे..
तरी आत जावे, न मागे फिरावे !

अनिवार्य आहे असा वार होणे !!
तुझे ठार होणे, निराकार होणे !
अवघे जळावे, पुरे कोसळावे..
अखेरीस तू कणभरीही नूरावे !

जेव्हा खऱ्या अर्थी तू संपशील..
तेव्हाच रे जीवना स्पर्शशील..
गांभीर्यसौंदर्य हे ओळखावे..
शून्यात सामावूनी एक व्हावे !

.........................

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान