तत्त्वज्ञान

भावभक्ती लोणी

Submitted by पुरंदरे शशांक on 28 August, 2019 - 01:16

भावभक्ती लोणी

घर शोधूनी पहाती
कृष्ण गोप सखे सारे
नाही कुणीच घरात
शिरताती चोर सारे

शिंकाळ्यात ठेवलेले
लोणी नेमके शोधले
हात पुरेना कोणाचे
उंच होते टांगलेले

कान्हा सांगतसे युक्ती
करा कोंडाळे छोटेसे
चढूनिया त्यावरी मी
लोणी काढेन जरासे

सवंगडी लगोलग
धरताती एकमेका
कान्हा खांद्यावरी त्यांच्या
चढे अलगद देखा

हात घालिता मटकी
कडी वाजली दाराची
सवंगडी कान्हयाचे
पळ काढती त्वरेची

कान्हा उभा थारोळ्यात
तक्र लोणी भुईवरी
तुकडे ते खपरेली
विखुरले दूरवरी

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 August, 2019 - 02:47

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

आनंद ओसंडून चाललाय पहा

शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी

सासू लाटतेय चपाती

अन भाजतेय सून मोठी

धाकटीने घातलाय कपड्याना पीळ

मधलीने बसवलीय द्वाड पोरांना खीळ

छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं

इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ?

महालाला लाजवेल अशी घराची शोभा

महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा

घराला घरपण माणसांनीच येते

भुई चालेल कमी , पण लागते घट्ट नाते

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 

तोडी कर्मबंध

Submitted by पुरंदरे शशांक on 23 August, 2019 - 01:06

तोडी कर्मबंध

सांगे गीतेमाजी । योगेश्वर स्वये ।
कर्मयोग सोये । आवर्जून ।।

स्वधर्म आचरा । फलाशारहित ।
साधाल स्वहित । आपेआप ।।

ऐसे सांगे वर्म । स्वये जगन्नाथ ।
करीता सारथ्य । पार्थासाठी ।।

न सांडिता कर्मे । पार्था उपदेसी ।
टाकी मीपणासी । पूर्णपणे ।।

सोडिता मी माझे । तुटे कर्मबंध ।
संसार संबंध । नाश पावे ।।

संसारी असता । होशील तू मुक्त ।
न हो आसक्त । कदाकाळी ।।

कर्मयोग सोपा । करुनी श्रीहरी ।
भाविका उद्धरी । गीतामिषे ।।

..............................................

धाव पांडुरंगा

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2019 - 23:41

धाव पांडुरंगा

संवसारा लागी । व्याकुळ होऊनी ।
जातो विसरुनी । पांडुरंगा ।।

काय तो आठव । नाहीच सर्वथा ।
सदा व्यापी चित्ता । संसारची ।।

सुखदुःखी गोवे । सदा सर्वकाळ ।
नित्य हळहळ । ऐहिकाची ।।

नसेचि सत्संग । नसे नाम मुखी ।
अनुसंधानासी । तुटी पूर्ण ।।

धाव पांडुरंगा । नसावा वियोग ।
अनुताप योग । घडो मज ।।

दीनानाथ करी । साच तुझे ब्रीद ।
सर्व माझे हित । तुज पायी ।।

गोवणे.... गुंतणे

एक ड्राइवर, सिंगापूर मधला !

Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 23:50

परवा रविवारी सहकुटुंब एका restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. टॅक्सिने परत आलो. चिनी वंशाचा टॅक्सी ड्रायव्हर. त्याचे payment करून उतरायला लागलो होतो.

तेवढ्यात, तो टॅक्सी ड्राइवर म्हणाला, " भगवान आपको और आपके परिवार को खुश रखें "!

ते अस्स्खलित हिंदी ऐकून आम्ही चाटच !!!

"विकेट पडणं, दांडी गूल " असले जे जे काही शब्दप्रयोग असतील त्याची प्रचितीच म्हणा ना !

अशा प्रसंगी त्या कर्त्यांची जी आश्चर्याच्या धक्क्याच्या मानसिक अवस्था असते तशीच आमची झाली.

Where did you learn hindi? माझा स्वाभाविक प्रश्न.

"From Indian passengers" त्याचे नम्र उत्तर.

एक म्हातारा

Submitted by सुंदरराव on 21 July, 2019 - 12:34

एक म्हातारा दूरदेशी
बसलाय बंद खोलीत
नैराश्यानं कुजवलेला
बसला आहे कुढत
चूका केल्या तारूण्यात
बसतो तेच उगाळत
नोकरी दिली सोडून
झाले म्हणतो नुकसान
एवढ्या तेवढ्या डॉलरचं
करतो त्रागा म्हातारा
शोधू पाहतो उतारा
नुकतीच आदळ आपट
कुढण्याला नाही शेवट
करीना कुणी जवळ
मनात काढतो जाळ
वड्याचं तेल वांग्यावर
लोकांनी मारलं फाट्यावर
एक म्हातारा दूरदेशी
बसला होता उपाशी
कुढत कुंथत रडत
दिवस बसतो ढकलत

श्री पंढरीनाथ महाराज

Submitted by पुरंदरे शशांक on 16 July, 2019 - 23:47

श्री पंढरीनाथ महाराज

परब्रह्म दिव्य । भले साकारले ।
सुंदर सावळे । पंढरीत ।।

कटीवरी कर । विटेवरी उभे ।
रखुमाई शोभे । वामांगी ती ।।

मस्तकी किरीट । मकर कुंडले ।
गळा माळ रुळे । तुळशींची ।।

अर्ध उन्मिलित । नयने न्याहाळी ।
मांदियाळी भली । भक्तांची की ।।

झळके बरवे । स्नेह मुखावरी ।
सस्मित अधरी । श्रीहरीच्या ।।

नाभी नाभी ऐसे । भक्तांसी कौतुके ।
आश्वासित देखे । प्रेमभरे ।।

भाव देखोनिया । अति शुद्ध एक ।
होतसे पाईक । भक्त काजि ।।

ज्ञानदेव थोर

Submitted by पुरंदरे शशांक on 11 July, 2019 - 06:29

ज्ञानदेव थोर

ज्ञानदेव थोर । योगीयांचा राणा ।
भावे देवराणा । मूर्त केला ।।

ज्ञानदेवीतूनी । करिसी उघड ।
ब्रह्मविद्या गूढ । सकळिका ।।

वर्णियेला हरी । निर्गुण अनंत ।
जरी शब्दातीत । सांगे श्रुती ।।

शब्द अमृताचे । ठेवोनिया फुडे ।
ब्रह्मचि रोकडे । रुप केले ।।

भाषा मराठीची । गुढी उभविली ।
गगनीही भली । सामावेना ।।

यथार्थ गौरव । माऊली नामाने ।
भाविक प्रेमाने । हाकारिती ।।

जन्मोजन्मी ठाव । देई चरणांशी ।
तेचि सुखराशी । शशांकासी ।।

कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत

Submitted by सिद्धेश्वर विला... on 11 July, 2019 - 05:43

कधीकधी मी हळवा होतो

बघुनी देव दानवांत

का उगविली हि बीजे तू ?

अर्धपोटी मानवात

कधीकधी मी कठोर होतो

बघून साऱ्या वेदनांना

भळभळ त्या वाहत असतात

पण पुन्हा करतो सुरुवात

कधीकधी मी हळहळतो

कोमेजल्या कळ्या बघुनी

नव्या उमलताना बघून

त्याला करतो कुर्निसात

कधीकधी मी बिथरतो

भविष्यकाळ चिंतूनि

कल्पनांच्या माध्यमातून

पेटवतो नवी वात

कधीकधी मी शोधतो

हरवलेली जुनी वाट

मिट्ट काळोख दूरदूर

आता हीच माझी वहिवाट

हीच माझी वहिवाट ....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान