मत्सर , असूया , जेलसी - भाग 2 .
अर्थात थोड्या प्रमाणात मत्सर चांगला असंही म्हटलं जातं . कारण तो आपल्याला प्रगतीसाठी मोटिव्हेट करतो .... मी जे आधीच्या भागात म्हटलं आहे , ते अशा गोष्टींबद्दल - ज्या प्रयत्नाने मिळण्यासारख्या नसतात ... अशी परिस्थिती जी आहे तशी स्वीकारण्याखेरीज आपल्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नसतो . अशा गोष्टींबद्दल मनात पडलेलं मत्सराचं बीज हे फार विषारी ... दिसताक्षणी गोळ्या घालाव्या या लायकीचं.... फक्त प्रॉब्लेम हा की ते शोधायला गेल्याशिवाय दिसत नाही आणि आपल्याकडे त्याला मारता येईल अशा गोळ्याही नसतात .... ह्या गोळ्या म्हणजे आत्मचिंतन .. कशाकशासाठी कौन्सिलर शोधणार ...