निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!
अवधूता मी तर आहे युगायुगांचा योगी
आल्यागेल्या मिटल्या वाचून शब्द अनाहत भोगी
सारे जगत सगेसोयरे सारे जगत हे जत्रा
सारे माझ्यात मी सर्वात तरीही केवळ एकटा
मी सिध्द समाधी मीच मौनी मी अन मी बोले
रूप स्वरूप अरुपी दावून मीच मजशी खेळे
म्हणे कबीर साधू बंधू रे ऐक नाही कुठली इच्छा
कुटीत माझ्या मीच डोले खेळे सहज स्वेच्छा
अनुवाद विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
अलीकडेच कबीराची एक सुंदर कविता वाचनात आली.
(Songs of Kabir, Translated by Arvind Krishna Mehrotra, Everyman Publication,
with a preface by Wendy Doniger)
एका महाकवीचे मरणाचे अप्रतिम डिस्क्रीबशन आहे,
डोळे दिपवणारे आहे. कबीर म्हणतो:
रैनि गई मत दिनु भी जाइ
भंवर उडे बग बैठे आइ
थरहर कंपै बाला जिउ
ना जांनौं क्या करिहै पीउ
कांचै करवै रहै न पानी
हंस उडा काया कुम्हिलांनी
कउवा उडत भुजा पिरांनी
कहै कबीर यहु कथा सिरानी
काही अर्थ सांगतो की ज्याने कविता समजायला सोपी जाइल.
एकतर मत इथे सुध्दा अश्या अर्थाने आलेले दिसतेय.
बग म्हणजे हेरोन.