धर्म

सजल जलद मोही रुप या राघवाचे

Submitted by पुरंदरे शशांक on 25 January, 2021 - 02:38

झळकत कटि शोभे पीत वस्त्रे जयास
कनक किरिट माथी उज्वले नीलभास

शर धरि कर स्कंधे सज्ज कोदंड दंडा
असुरगण गळाठे हर्ष भक्ता उदंडा

मृदुल स्मित खुणावी ना भी संसारदुःखा
कर तरि नित पाठी धीर देई प्रभूचा

सजल जलद मोही रुप या राघवाचे
निशिदिनि मनी ध्याता मूळ तुटे भवाचे

अवतरण जयाचे भाविका उद्धराया
निजजन हित वाहे देऊनी नामछाया

असे आगळा राम आदर्शमूर्ती

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2021 - 05:23

असे आगळा राम आदर्शमूर्ती

जना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
वरी भाविका देतसे दिव्य भक्ती
अशा राघवासी स्मरावे भजावे
किती रामदासे जना बोधवावे

असे आगळा राम आदर्शमूर्ती
तया टाळूनी वाउगेची पूजीती
भ्रमा वाढवोनी रती आत्मघाती
अभक्ते स्वये देशही नासविती

बहु भक्त झाले इथे राघवाचे
पुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे
तया पाहता कीव ये दुर्जनाचे
रवी तेज ते येई का काजव्याचे

जना उद्धराया स्वये राम येई
तया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी
भ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती
जनासी तरी व्यर्थचि घोळविती

भरतभेट

Submitted by सप्रसाद on 25 November, 2020 - 20:05

(भरत जेव्हा श्रीरामांना परत नेण्यासाठी हट्ट करतो, पण श्रीराम वचनपालनापासून ढळत नाहीत, तेव्हा सर्व लोक जनक महाराजांना निवाडा करण्याची विनंती करतात. त्यावेळी जनक महाराज म्हणतात…)

श्रींच्या चरणी अनन्य व्हावे
प्रेम असे निष्काम असावे

रामप्रभू हे धर्मध्वजाधर
भरता, तू प्रेमाचा सागर
इतका सुंदर बघता संगर
न्यायनिवाडे सर्व हरावे
प्रेम असे निष्काम असावे

हक्क तुझा रामावर भरता
हट्ट तुझा हा योग्य सर्वथा
निर्मळ प्रेमळ अंतर असता
धर्माहुन ते श्रेष्ठ ठरावे
प्रेम असे निष्काम असावे

अब्जाधीशांचे वर्तन तर्काच्या कसोटीवर

Submitted by केअशु on 7 November, 2020 - 01:21
टाटा अंबानी

मित्रहो! गेले काही दिवस एका प्रश्नाने मनात घर केले आहे.मी हा प्रश्न बर्‍याच जणांना विचारला पण पटेलसे उत्तर कुठेच मिळाले नाही.

वरच्या फोटोत दिसणार्‍या व्यक्ती श्री रतन टाटा आणि श्री मुकेश अंबानी हे भारतातील अब्जाधीश उद्योगपती आहेत.फोटोत ते तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी आल्याचे दिसत आहे.निदान ते मंदिर प्रांगणात आहेत इतके तरी नक्कीच.

तर प्रश्न असा आहे की हे दोघे अब्जाधीश पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? (मंदिर कोणत्या देवाचं आहे हा प्रश्न इथे महत्वाचा नाहीये.ते कोणत्याही देवाच्या मांदिरात गेले तरी फरक पडत नाही.)

शब्दखुणा: 

आयुष्याचा प्रवास , अध्यात्म इत्यादी

Submitted by radhanisha on 5 November, 2020 - 09:14

दोन इंटरेस्टिंग कथा आहेत .. खऱ्या खोट्या देव जाणे पण अध्यात्मिक वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

शब्दखुणा: 

दासगणू महाराजांनी लिहिलेलं महालक्ष्मी स्तोत्र हवं आहे

Submitted by sameernavare on 18 October, 2020 - 00:19

कुणाकडे दासगणू महाराजांनी लिहिलेलं महालक्ष्मी स्तोत्र pdf पुस्तक स्वरूपात आहे का? मला हवं आहे. डाउनलोड कुठून करण्यासारख असेल तरी लिंक मिळाली तरी चालेल . धन्यवाद

श्री हरी स्तोत्र मराठी अर्थ

Submitted by radhanisha on 10 September, 2020 - 05:29

जगज्जालपालं कचत्कंठमालम्
शरच्चंद्रभालं महादैत्यकालम् ।
नभोनीलकायं दुरावारमायं
सुपद्मासहायं भजेsहं भजेsहम् ।।१।।

जे सृष्टीचं पालन करतात , ज्यांच्या गळ्यात चमचमती तेजस्वी माला आहे ;

ज्यांचं मुखमंडल शरद ऋतूतील चंद्रासमान भासतं , जे दैत्यांचा विनाश करतात ;

ज्यांची काया निरभ्र निळ्या आभाळासमान आहे , ज्यांच्या मायेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे ;

आणि जे आपली पत्नी श्री लक्ष्मीदेवी यांच्यासोबत आहेत , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

शब्दखुणा: 

जरी चाललासी गृृृृृृहासी पुन्हा या

Submitted by पुरंदरे शशांक on 1 September, 2020 - 05:07

जरी चाललासी गृहासी पुन्हा या
कृपादृष्टी ती राहू दे शांतवाया
असे नेणता पूजनी अर्चनीया
तरी गोड मानूनी घ्या मोरया बा

न जाणेचि पूजादिका भाव काही
परी बाळकाचि मती ध्यानी घेई
कृपाळूपणे सर्व सांभाळी आता
पुन्हा मागुते येत र्‍हावे समर्था

तुवा निर्मियेले फले पुष्प वस्त्रे
समर्पोनी मागे जरी मोती रत्ने
तरी जाणुनी भाव हा नष्ट सारा
सुबुद्धी परी देत राही उदारा

जरी मूढता व्यापूनिया मनाला
परी ओढ थोडी असे मन्मनाला
जरा प्रेम देई उदारा कृपाळा
तरी दूर हो ऐहिकाचा जिव्हाळा

डेमॉनिक पझेशन खरे असते का?

Submitted by केशव तुलसी on 27 August, 2020 - 12:16

डेमॉनिक पझेशन् अर्थात पिशाच्चबाधा हा प्रकार खरा असतो का? हा धागा अमानवीयमध्ये येतो पण त्या धाग्यावर अवांतर चर्चा होते म्हणून इथे विचारत आहे.
अनेक चांगले लोक /कुटुंबे अचानक विचित्र वागायला लागतात.हसता खेळता परिवार काही वर्षात धुळीला मिळालेला पाहीला आहे. नेहमी हसतमुख असलेले लोक अचानक प्रचंड रागिट चिडके होतात .व्यसनाच्या नादाला लागून खाक होतात.यातल्या प्रत्येकाला घडतेय ते वाईट घडतेय हे माहीत असते पण काहीतरी असते जे त्यांना मागे खेचत असते व पुन्हा पुन्हा निराशा, चीड ,राग यांच्या खोल गर्तेत ढकलत असते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - धर्म