तत्त्वज्ञान

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 24 February, 2020 - 04:23

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

जीव माझ्झा कासावीस झाला

असलीस जरी तू तोंडाने फाटकी

तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी

रंगबिरंगी चांदण्या त्यावरी

झेलण्या ओघळण्या पाऊस सरी

कापड ऐसे तरल मुलायम

पिळवटते हे हृदय ते कायम

सडपातळ ती नाजूक दांडी

बघणार्यांच्या उडती झुंडी

बटनावरती नक्षीदार दांडा

देती सलामी बघणाऱ्या सोंडा

काय असे ते गुपित न कळले

त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले

मीही नसे अपवाद त्याला

मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला

===========================
सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 

मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 19 February, 2020 - 02:56

मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये

तुझ्याकडून गिफ्ट आलेलं

पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं

फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा

नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं

हादरून गेलो उभाआडवा , काहीच सुचलं नाही

लक्षच लागत नव्हते माझे , सारखा स्कीनवर बघत राही

त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे

समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे

सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती

राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती

शब्दखुणा: 

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 18 February, 2020 - 02:50

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

निर्व्यसनी असाल तर नको नको ती सवय लावून घ्यावी

कधी तंबाखू चोळावा निवांत तर कधी दारू ढोसावी

जर सर्व ठीक आले ,, तरच बायको करावी

अन्यथा बोहल्यावर चढू नये

चढल्यावर तोंडावर पडू नये

यातून अखेरपर्यंत सुटका नाही

हेच सत्य मानून , खालील पध्द्त अवलंबावी

व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा

हातातल्या लिटमस कागदावरी

बघावे सामूचे मोजमाप नीट

बायको येण्यापूर्वी घरी

जर सामू आला सात

खुशाल आपली काढावी वरात

जर त्यामध्ये असेल चढउतार

शब्दखुणा: 

फुल पँटची स्टोरी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 17 February, 2020 - 02:20

मी जेव्हापण रडलो तू हळूच खांदा पुढे केला

मी रडायचो आणि मग हळूच तुझ्या डेयरीवर पडायचो

तुला वाटायचं ,, दुःखात आहे बिचारा

साधाभोळा समजून छानपैकी घालायचीस वारा

मी त्या झुळकेमध्येच हळूच हलका व्हायचो

तेव्हा तुला वाटायचं कि हुंदके देतोय म्हणून

तू अजून जवळ घ्यायचीस मला

छानपैकी समजावायचीस मला

कुठल्या परिस्थितीला कसं सामोर जावं ?

परिस्थितीशी दोन दोन हात कसं करावं ?

पण मी मात्र ,

दोन हातात कसं धरावं ?

कधी अन कसं पुढं रेटावं ?

या शिकवणीत बांबू मात्र बराच शिकला

छोट्या चणीचा , हळूहळू मोठा झाला

शब्दखुणा: 

स्वच्छ भारत अभियान !

Submitted by Dr Raju Kasambe on 8 February, 2020 - 00:56

Poem.jpgस्वच्छ भारत अभियान

ओला कचरा सुका कचरा
सर्वांना समजावु या
तनामनाने राबवू या
स्वच्छ भारत अभियान !

प्लॅस्टिक थर्माकोलचा
वापर आपण थांबवू या
घराघरात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !

स्वच्छतेचे महत्त्व किती
सर्वांना शिकवू या
शाळेशाळेत राबवू या
स्वच्छ भारत अभियान !

डेंग्यु मलेरिया रोगराई
पळवून लावू या
गावागावात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !

मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट

Submitted by Dr Raju Kasambe on 8 January, 2020 - 04:54

मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट
मुंबईत पावसाळ्यात पाउस हा दररोजच पडतो. तो कधीही कसाही पडतो, कोसळतो. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था असते. नाले तुंबलेले असतात. मुंबईला महापूर सुद्धा येतो. २६ जुलै २००५ ला महापूर आल्यावर मुंबईकरांचे काय हाल झाले होते ते ऐकून, वाचून होतो. तेव्हा मी मुंबईला नसल्यामुळे महापूर अनुभवला नव्ह्ता.

प्रांत/गाव: 

झेब्र्याचा जन्म

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 January, 2020 - 02:30

एकदा वाघ शिकारीस निघाला

शोधत शोधत शिकार तो कुरणाशी गेला

डौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडे

गाढवांचा कळप तेथे चरण्यासी आला

हेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्याने

असेल फर्लागभर अंतरावर

घेऊन पावित्रा मारणार उडी

इतक्यात नजरभेट झाली

त्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडी

अन शिकारी खुद्द शिकार झाला

तारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याची

घेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्या

व यथेच्छ जोड्याने चरण्याच्या

मंगला समयी लग्न लागले

सोहळ्यास सारे जंगल लोटले

शब्दखुणा: 

उडता मुका, जरी असला सुका

Submitted by सिद्धेश्वर विला... on 13 December, 2019 - 02:10

उडता मुका, जरी असला सुका

तो गॉड मानून घ्यावा

कितीही चंचल पऱ्या दिसल्या

तरी एकीचाच हात धरावा

सोज्वळ शालीन निवडून

द्यावी सून आपुल्या घराला

घेत जावे उडते मुके मग

ठेउनी स्थिर मनाला

हात लावूनी ओठांना

त्या सोडिती हवेत सारे

अंतकुक्कुट बनवती सैरभैर

उमजा धोक्याचे हेच इशारे

सुक्या मुक्यांचे पाश हळूहळू

करतील विजार तुमची ओली

घेणाऱ्याला करावा लागतो

आपला खिसा तिच्या हवाली

सुक्या मुक्याने पदरी पडती

फक्त ओलीचिंब स्वप्ने

बायको कुशीत येऊनही

शब्दखुणा: 

गीता जयंती

Submitted by मी मधुरा on 8 December, 2019 - 06:33

गीता जयंती निमित्त आगामी युगांतर पुस्तकातला एक भाग तुम्हा सर्वांकरता......

युगांतर-आरंभ अंताचा!

कुणाच्यातरी आगमनाची चाहूल लागली आणि भीष्मांनी डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहिले. निळा शेला आणि मोरमुगुटातले मोरपीस कृष्णाला अगदीच शोभून दिसत होते. तो भीष्मांजवळ आला तेव्हा त्याच्या रुपाचं संमोहन तिथल्या वाऱ्यावरही घडलं असावं. कुठल्याशा धुंदीत तो चक्राकार वाहू लागला.

अस्तित्व

Submitted by सामो on 8 December, 2019 - 04:49

शर्वरीने स्वतः: अजून जवळून मृत्यू बघितला नसला, तरी अन्य जनांप्रमाणे, तिने दूरच्या नातलगांचे दूर जाणे जरूर अनुभवलेले होते. लहानपणापासूनच गूढांकडे ओढा असलेले तिचे मन, किती तरी वेळा विचार करत असे, माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? आपण कुठे जातो, परत कसे येतो?

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान