बळे पेलि कोदंड रक्षार्थ धर्म
जनी सज्जनी आज आनंद मोठा
अयोध्यापुरी सोहळे थोर होता
स्वये श्रीप्रभू येउनी मंदिरी या
प्रतिष्ठापिली धर्मकिर्ती ध्वजा या
बळे पेली कोदंड रक्षार्थ धर्म
झणी निर्दळी दुष्टशक्ती कुकर्म
अति प्रेमभावे स्वभक्ता सहाया
पदी राघवाच्या मनोबुद्धी काया
जनी मानसी आज संतोष मोठा
अयोध्यापुरी व्यापूनि भक्तीलाटा
जनी दावितो नित्य कर्तव्यनिष्ठा
स्मरुया गुणा राघवाच्या तदर्था
सदा अंतरी सर्वदा रामराया
जरी भाविता तोचि येतो सहाया
मुखी नाम येणे कृपा ही तयाची
समाधान हे साक्षचि जाण त्याची
"त्या" विचाराने सुद्धा माझं हृदय शतशत तुकड्यांमध्ये विदीर्ण होत होतं. आत्म्याशिवाय जिवंत असलेलं शरीर कुणी पाहिलं आहे का ? भर मध्यरात्री उगम पावलेला सहस्त्रश्मी कुणी पाहिला आहे का ? आपल्या स्थानावरून ढळलेला ध्रुव कुणी पाहीला आहे का ? जसं हे सगळं घडणं कालत्रयीही शक्य नव्हतं तसंच श्रीरामाशिवाय एकाकी आयुष्य जगणारा सौमित्र देखील कुणाच्या नजरेस पडणं कालत्रयी शक्य नव्हतं.
पण कधीकधी जे अशक्य असते ते शक्य करून दाखवण्याचे कटकारस्थान जणू नियती रचत असते. खडतर भविष्याच्या जाणिवेने भूतकाळातील अनेक स्मृतींचा पट माझ्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागला.
रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला. पण त्या आधी शबरी कोण होती, रामाला भेटण्याआधी तिचं आयुष्य यांबद्दल थोडंस पाहूया.