रात्रभर पडणारा पाऊस पहाटे उघडला. पण वातावरण कुंद होतं, निरुत्साही होतं. आषाढघनांनी सकाळही झाकोळून गेली होती. अंघोळ आटपून अरूण देवपूजा करत होता. तिथेच शांतीची सकाळची कामं चालली होती. डब्यांचा स्वैपाक, अथर्वची शाळेची तयारी, घरातली आवराआवर, पाणी भरून ठेवा, एक ना दोन. पण शांतीच्या हालचालीत एक शिणवटा होता. अरूणला तो जाणवला. गेले काही दिवस ते एक सावट घरावर होतंच. शांतीची नोकरी सुटली होती. या आठवड्यात शेवटचा दिवस होता. दोघांच्या कमाईत कसाबसा घरखर्च भागत होता. पण आता परिस्थिती कठीण होणार होती. काल रात्रीही दोघं तेच बोलत होते. कमी पगाराची का होईना शांतीला दुसरी नोकरी मिळणं आवश्यक होतं. पण..

मी परीक्षण लिहीत नाही. कारण मला ते लिहीता येत नाही. कारण माझी चित्रपटांची समज फार तोकडी आहे.
मी फक्त अनुभव शेअर करतो. कारण मी एक सामान्य चित्रपटप्रेमी आहे. जी कलाकृती आनंद देते ती आवडते. तिच्याबद्दल लिहितो.
मग ती वाळवी सारखी डार्क कॉमेडी असो किंवा झिम्मा सारखा हलकाफुलका एंटरटेनर, आत्मपॅम्फ्लेट सारखा हटके शैलीत बनवलेला चित्रपट असो किंवा जवानसारखा सौथेंडियन मसालापट..
भाग 1 आणि 3 इथे वाचा:
भाग १
भाग ३
'ओ' ही एजन्सी साईटवर मापं घेऊन फर्निचर वेगळ्या फॅक्टरी मध्ये बनवून साईटवर लावणारी असल्याने त्यांना 2 महिन्यात सगळं आवरू याची पूर्ण खात्री होती.आम्हाला ही खात्री अजिबात नव्हती.पण हे सगळं करायला घेण्यापूर्वी काही तोडफोड कामं होती.घरात एकच ईशान्य कोपरा, तिथे ओटा दुसऱ्या बाजूने फोडून त्याची न वापरती जागा तुळईखाली न येणारा देव्हारा अशी लहान दिसणारी पण किचकट कामं होती.
भाग 2 आणि 3 इथे वाचा:
भाग २
भाग ३
रिकामं/वापरात नसलेलं घर किंवा त्या घरातली डागडुजी कामं याचं बॉलिवूड पिक्चर्स आणि के ड्रामा मध्ये अत्यंत सुंदर तलम गुलाबी चित्रण असतं.म्हणजे असं बघा:

Sea Harrier and Ka-25
“मुरुगन, यू देअर? ऐक तुझ्यासाठी काम आहे. प्लान असा आहे, मुंबई वरून अमेरिका, अमेरिकेतून दुबई, दुबईतून इराक, इराक मधून उझबेकिस्तान. तिकडून अफगाणिस्तान नंतर आउटर मंगोलिया, मधेच एक वेळ ऑस्ट्रेलिया, पुन्हा अफगाणिस्तान...”
एव्हढे आढेवेढे, एव्हढा द्राविडी प्राणायाम. ग्रेमॅनचे प्लानिंग हे असं असतं.
केकूही आता शिकलाय. किराणा भुसार दुकानात तो हेच डावपेच वापरतो. आधी हवा पाण्याच्या गप्पा. नंतर लक्स, पार्ले-जी, शाम्पूचे सशे अशी सटर फटर स्टेशन घेत गाडी एकदम बासमती तांदुळावर, “बासमती काय भाव?” दुकानदार चमकून खरा भाव बोलून जातो. असो.
“ते समजलं. शेवटी कुठे जायचं ते बोला.”
झिम्मा - १ चा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80649
आता झिम्मा २ कडे वळूया.
मी कालच सकुसप बघून आलो. काही निरीक्षणे.
१) झिम्मा १ जिथे संपतो त्याच पानावरून पुढे झिम्मा २ सुरू होतो.
२) झिम्मा १ ज्यांना आवडला त्यांना झिम्मा २ किंचित कमी किंवा किंचित जास्त आवडू शकतो. पण आवडेल हे नक्की.
ज्यांना झिम्मा १ आवडला नाही त्यांना देखील आवडण्याची शक्यता आहे. प्रयत्न सोडू नका.
वर्तमानात यु. के. बर्याच अडचणीतून जात आहे आहे असे यु. ट्युब सफरीतनं जाणवले. महागाई, टॅक्स चे ओझे न वाढ्णारे पगार ह्याने आंग्लबंधू मेटाकुटीस आलेले दिसतात...
चालू घडामोडीवर एक माहितीपुर्ण लिंन्क..
https://www.youtube.com/watch?v=dAzdBnJztn4
मा. श्री. विन्स्टन चर्चिल ह्यांचे भारताबद्दलचे विधान आठवतेय....
कालाय तस्मै नमः !
DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक
पठाण आणि जवान यांनी हजार करोडचा गल्ला कमावल्यावर आणि असे दोन चित्रपट एकाच वर्षात देणारा शाहरूख हा एकमेव हिरो ठरल्यानंतर त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना होतीच. तो सुद्धा असाच सुपरहिट जातोय का हा प्रश्न होताच.
पण नुसते चाहतेच नाही तर त्याचे टिकाकार सुद्धा प्रश्न विचारत होते की ते हजार करोड वगैरे ठिक आहे पण असे मसालापट ऐवजी त्याचा एखादी चांगली कथा पटकथा असलेला चित्रपट आला तर सांगा, मग बघू आम्ही..