दसर्याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.
गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.
एका रम्य, नितांतसुंदर संध्याकाळी
प्राजक्ताचं एक फूल अगदी अलगद
माझ्या हाती येऊन विसावले
मी हसलो त्याच्याकडे बघत,
त्याच्या परिमळ अंगांगात भिनला जणू
तेही टपोरे हसत होते हे पाहून
पण, त्या फूलावरचे अवेळचे दव
अस्वस्थ करीत होते मला सतत
आपले जन्मदाते झाड सुटल्याचे दुःख
सलत होते बहुदा त्याला कुठेतरी
त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात
मग मी ही त्याला ठेवले झाडाच्या पानावर
त्याचे टपोरेपण खुलूनच दिसले
त्या हिरव्याकंच पानांवरती
खुशीत होते ते, झुललेही झुला
वाऱ्यावर स्वार, अपेक्षांच्या ओझ्याशिवाय
रिपरिप (मुक्तछंद)
तुझे बंद ढगाळ डोळे अन्
त्यांतून सरणारा पाऊस
आता ओळखीचा झालाय.
पण एक खरं सांगू का,
पावसाच्या अमाप सरींनंतर
तुझ्या ओठांवर पडणारं,
फिक्कट गुलाबी इंद्रधनु,
मला खरंतर जास्त आवडतं!
तुझ्या मनाच्या या आभाळाला
कुठला असा काठच नाहीये!
अपरिमित अथांग आहेस तू.
म्हणून कधीकधी अवघड जातं
तुझं मन पूर्ण समजून घेताना.
फेसाळत्या अथांग समुद्रालाही
कुठेतरी किनारा लागून असतो.
त्यामुळं तू सागराहून गूढ आहेस.
"स्त्री सक्षमीकरण"
"तुझ्याss **चा..."
तिच्या तोंडून निघालेल्या त्या कचकचीत उद्गारांची मला गंमत वाटली
आणि त्याचबरोबर 'स्त्री सक्षमीकरण' म्हणजे नक्की काय, याची त्या काळोखातही ओळख झाली;
तेव्हा
जेव्हा तिने त्या आडदांडाला जमल्या गर्दीसमोर बदडबदड बदडलं
आणि
पाठीमागे वळून आपल्या लेकराकडे बघत म्हणाली,
"चाल माज्याबरूबर, मेला तुझा बाप आजपास्नं !"
―र!/२४.५.१८
जिथे बायको तुळस, बहिण रंगोळी , मुलगी गुलाब आई दिवा आहे
असा अर्थपुर्ण परिपुर्ण संसार सगळ्यानाच हवा आहे
धन कला शक्ति चि याच एकमेव खाण आहे
आपण माणुस होण्याचे याच तर प्रमाण आहे
चांदण्यानी हे आकाश सजते, चंद्र एकटा शोभत नाही
स्त्रियानी हे जिवन फुलते माणुस एकटा जगत नाही
पैसा गाडी बंगला मोबाईल हे सगळ व्यर्थ आहे
स्त्रिया असतिल परिवारात तरच जगण्याला अर्थ आहे
राखी नवरात्र होळी दिवाळी असे सारे सण या करी साजरे
यांची जागा घेणारे मिळणार नाही कुणी आयुष्यात दुसरे
याच आहे गितेचा सार आणि जिवनाचे अनमोल अभंग
आपण जरी चित्र रेखाटतो याच भरतात त्याचात रंग
आपण सुर्य तर या प्रकाश आहे
रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….
जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का?