भारत

पीआयओ, ओसीआय आणि बरंच काही

Submitted by सशल on 3 January, 2018 - 13:22

फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्‍यांनां भोगाव्या लागणार्‍या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?

सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.

- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!

* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक

क्रमशः

शब्दखुणा: 

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2017 - 18:49

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक

सविस्तर बातमीची लिंक - http://www.loksatta.com/desh-videsh-news/india-down-45-ranks-since-2014-...

साल २०१४ - भारत ५५ व्या स्थानापर्यंत आलेला.
साल २०१७ - भारताची थेट १०० व्या स्थानावर घसरण झाली आहे.

कसे ठरवतात हा ग्लोबल हंगर ईंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांक याचा थोडा शोध घेतले असता खालील चार निकष सापडले.

विषय: 
शब्दखुणा: 

विज्ञानवाद आणि आस्तिकता

Submitted by नानाकळा on 12 August, 2017 - 23:27

या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.

अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

विषय: 

भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

holidays and getaways थीमवर भारताबद्दल माहिती द्यायची आहे.

Submitted by संपदा on 5 July, 2017 - 08:34

आमच्या कंपनीमध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. एक थीम निवडून त्याला अनुसरून जगभरातील विविध देशांमधील माहिती सर्वांना दिली जाते. ह्यावर्षीची थीम आहे "holidays and getaways". भारतातील पर्यटन स्थळे, त्यांची पोस्टर्स, विविध राज्यांमधील खाण्याचे पदार्थ, स्टेज परफॉर्मन्सेस असणार आहेतच. त्याशिवाय खेळ ( मसाल्याचे पदार्थ ओळखणे) / प्रश्नमंजुषा / अ‍ॅक्टिव्हिटीज ( मेंदी काढून देणे, साड्यांचे छोटेसे प्रदर्शन ) करायचा विचार आहे. १-१ तासाचे ३ स्लॉट्स आहेत. एका स्लॉटमध्ये प्रश्नमंजुषा ( लिखित स्वरूपात) घ्यायचा विचार आहे. एका स्लॉटमध्ये मेंदी ई. असेल.

विषय: 

यूजलेस ईटर्स आणि "न्यू वर्ल्ड ऑर्डर"

Submitted by सेन्साय on 21 March, 2017 - 06:09

आपण कधी कधी रागाने म्हणताना पाहतो घराघरात की,
काय एवढा मोठा घोड़ा झालास तरी काही कामधंदा न करता नुसता बसून असतो...
फुकटचे जेवायला लाज नाही का वाटत ?

मराठीत तर म्हणीमध्ये सुद्धा एक अश्या अर्थानेच आहे - खायला काळ नी भुईला भार.

पण म्हणून ह्या उपरोधिक बोलण्याचे धनी ठरलेल्या मंडळीना काही त्या यूजलेस ईटर्स ह्या डेफिनेशन खाली आपण नक्कीच गणणार नाही.

मग ह्या परिभाषेअंतर्गत कोण कोण येतात ?

कृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 04:50

भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

Submitted by फेरफटका on 6 February, 2017 - 12:27

काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.

बेंगळूरूमध्ये घडलेला लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 13 January, 2017 - 06:08

नवीव वर्षाच्या आदल्या रात्री बेंगलोरला जे घडले ते बातम्यांमधून कानावर आलेले. आज जरा वेळ होता, ते आठवले तर त्या संबंधित बातम्या आणि यू ट्यूब विडिओ पाहिले. शॉकिंग. शब्द नाहीयेत माझ्याकडे. त्यातला एकही विडिओ पुर्ण बघवला नाही. थिल्लरपणाच्याही पलीकडे काहीतरी किळस येणारी दृष्ये. थरकाप उडवणारी. मला बघतानाही घरी बसल्या असुरक्षित वाटू लागले. संबंधित बातम्या आधीही ऐकलेल्या पण या समजात होते की नवीन वर्ष आहे तर घडले असतील काही मद्यधुंद तरुणांकडून नेहमीसारखे गैर प्रकार, अश्यावेळी मुलींनीच काळजी घेणे योग्य. पण आज पाहिले तर माझ्याकडे निषेधालाही शब्द नाहीयेत.

शब्दखुणा: 

पाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 19 October, 2016 - 11:08

पाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान !!

सध्या ईराक मध्ये उत्तेरकडचा बराच मोठा भाग जो ISIS बळकावलेला होता तो आता थोडा थोडा करत इराकची सेना परत मिळवत आहे. आता इराक मधल्या दुसर्या सर्वात मोठ्या शहरात (मोसुल) सध्या ISIS विरुद्द बाकिचे अशी लढाई सुरु आहे. ह्या बाकीच्यात इराकी सैन्य , तुर्कीच सैन्य, पाशमर्गा लढाकु, यझदी सैनिक व त्यांच्या सोबत अमेरिकन हवाई दल.

Pages

Subscribe to RSS - भारत