नव्या भारतीय न्या य संहिते नुसार हिट अँड रन अपघात झाल्यास चालकाला १० वर्शे शिक्षा व ७ लाखाचा दंड अशी तरतूद आहे. नक्की कायदा काय आहे. आय पीसी मध्ये, २ वर्शे परेन्त शिक्षेची तरतूद होती. ह्या कायद्या च्या अनुषंगाने चर्चा करु. विरोधात देश भर ट्रकर लोकांनी संप चालू केला आहे व टॅक्सी ड्रायव्हर पण संपात सहभागी होणार आहेत. पेट्रोल पंपावर अभूत पूर्व गर्दी आहे. ट्रकर संपाचे दूरगामी परिणाम होत असतात.
सर्व माल महाग होत राहील.
नमस्कार मला सातारा सैनिक शाळे बद्दल माहिती हवी आहे. बेसिक माहिती मिळाली आहे. तिथे प्रवेश कसा मिळतो वगैरे..... पण तिथे प्रत्यक्श शिकणारे किन्वा शिकलेले कोणि भेटले नाही आहे.
कृपया या बद्दल कोणि मदत करु शकेल का
आज मला एक एस एम एस आलेला आहे. तो खालील प्रमाणे.
अॅज पार्ट ऑफ स्पेशल कँपेन ३.० सर्ट इन , गवर्न मेंट ऑफ इंडिया अॅड्वायसेस यु टू कीप युअर डिजिटल डिवायसेस बॉट फ्री. गेट बॉट रिमुव्हल टूल अॅट पुढे लिंक दिली आहे. https://www. सी एस के डॉट जीओ व्ही डॉट इन.
हा नक्की काय प्रकार आहे. लिंक क्लिक केली नाही कारण ती बॉट फोन वर इन्स्टॉल करायसाठी असली तर? हे देशातील सरकारचेच आहे का काही दुसरे. मार्गदर्शन करावे.
का एका अनएकेडमी शिक्षिकाला जॉबवरून काढण्यात आलं?
कुठे चालला आहे आपला भारत देश?
आजकाल शिक्षित लोकांना निवडून द्या म्हणणं गुन्हा झाला आहे..
२०२३ मधे जेव्हा आपण विकसित देशांबरोबर तुलना करतो तेव्हा अशा मानसिकतेमुळे आपण मागे तर नाही जात आहोत असं नाही वाटत का..अशाने भारत विकसित देश कसा बनणार?
फक्त निवडक लोकांना काहीही बोलायचं स्वातंत्र्य, त्यांनाच उज्वल भविष्य.. बाकिच्यांना बेसिक गोष्टी बोलायचा पण हक्क नाही?
असं वाटत नाही तुम्हाला भारतात शिक्षित अडाणी लोक जास्त झाले आहेत?
सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?
महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी योजनेप्रमाणे रेशन आपल्या दारी ही योजना सादर केली आहे.
आरा रेशनसाठी रेशनच्या दुकानात जाण्याची गरज राहणार नाही. फिरत्या रेशनगाडीतून घरो घरी रेशनचे वाटप अशी ही योजना आहे. या योजनेबद्दल काय वाटतं ?
रेशन दुकानदार, रेशन खाते यांचा भ्रष्टाचार यामुळे कमी होईल का ? रेशनचे रॉकेल गायब होण्याचे प्रमाण बंद होईल का ?
भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.
बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सध्या मायाजालात अनेक जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती अडकल्याचे वारंवार दिसून येते आहे. पुरूषांच्या जोडीला महिला सुद्धा या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे विषकन्याच नाही तर विषकुमारांचा सुद्धा वापर केला जातो हे उघड झाले आहे.
पण सध्या मायाजाल (हनीट्रॅप) या शब्दाच्या वापरावरून वादंग उठले आहे. मायाजाल या शब्दाचा वापर करून काही देशद्रोह्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी करून त्यांना बळी / पीडीत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे असे काही जणांचे म्हणणे आहे.
त्यांच्या जागी विशिष्ट लोक असते तर मीडिया ने आग लावून त्यात तेल ओतत राहण्याचे काम केले असते असे त्यांचे म्हणणे आहे.
श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.