पीआयओ, ओसीआय आणि बरंच काही

Submitted by सशल on 3 January, 2018 - 13:22

फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्‍यांनां भोगाव्या लागणार्‍या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?

सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.

- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!

* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक

क्रमशः

(बरेच दिवसांनंतर नविन लेखनाचा धागा चालू करत आहे. तेव्हा बर्‍याच चुका झाल्या असतील विषय, शब्दखुणा इत्यादी. किंवा काही राहून गेले असेल. सल्ले मिळताच चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेन.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागची चर्चा होऊन किमान ५ वर्षं तरी उलटली असतील. अजूनही सावळा गोंधळ तसाच.

भारत सरकारच्या पॉलिसीज् सतत चेन्ज होतात. त्यांच्या सिस्टीम्स म्हणे तेव्हढ्या ताकदीने अपडेट होऊ शकत नाहीत.

सध्याच्या अनुभवावरून तरी पूर्ण सीकेजीएस बिझीनेस म्हणजे पैसे उकळायला बसवलेली संस्था वाटत आहे. कदाचित माझे शब्द अति स्ट्राँग असतील पण माझे आणि काही मित्र मैत्रिणींचे अनुभव बघता खरंच तसं म्हणावंसं वाटत आहे.

लकी असलात तर काम होईल नाहीतर घाला खेपा, भरा पैसे आणि नशीबाचा कौल घ्या.

सध्याच्या अनुभवावरून तरी पूर्ण सीकेजीएस बिझीनेस म्हणजे पैसे उकळायला बसवलेली संस्था वाटत आहे. >>>+१

टोटली.
पीआयओ टू ओसीआय प्रोसेसला टाकलंय, पण त्यात त्यांच्या मते सो कॉल्ड चुका केल्याने इतरांना Proud आलेल्या अनुभवानुसार तो अर्ज कधीही परत येऊ शकतो.
आता धडा घेऊन आमची ओसीआय करायला इन पर्सन या महिन्यातली appointment घेतली आहे. तो पर्यंत नोटराईझ केलं, फोटो काढले आणि उत्साह राहिला तर जाऊ.

सीकेजीएस् ला केला तर अतिशय फ्रेण्डली अनुभव येतो.

हा सध्याचा लेटेस्ट अनुभवः
काम करून घेण्यासाठी जी डॉक्युमेन्ट्स लागतात त्यात कन्सिस्टन्सी नाही. वेड्यासारखी सव्यापसव्य करायला लावतात. एकदा सीकेजीएस् वर माहिती द्यायची मग परत भारत सरकार च्या वेबसाईट वर माहिती द्यायची. कुठेही मागे जाऊन इन्फॉर्मेशन चेन्ज करता येत नाही. एकदा कुठे काही चुकलं की सगळं परत करा. हे सगळं करून चांगले ६-८ तास मेहेनत करून अ‍ॅप्लिकेशन केलं तर मिडल नेम एके ठिकाणी (त्यानींच इश्यू केलेल्या हँड रिटन डॉक्युमेन्ट वर - पी आय ओ वर) आहे आणि एके ठिकाणी नाही ह्यावरून सरळ रिजेक्ट केलं अ‍ॅप्लिकेशन. किमान केस ओपन ठेवायची आणि अ‍ॅडिशनल डॉक्युमेन्टेशन द्या असं सांगता आलं असतं.

परत रिफन्ड मागायचा तर त्यांची सिस्टीम अशी क्रूकेड. ज्याला कळली त्याला कळली नाहीतर आहेच परत फोन कॉल.

अ‍ॅप्लिकेशन शिप करायचं तर सॅन फ्रान्सिस्को करता दोन शिपींग लेबल्स घ्यायला लावतात. एक उगीचंच आहे. सध्याच्या पॉलिसीज् प्रमाणे त्याची गरज नाही आणि हे कॉल करून त्याबद्दल विचारलं की सांगायचं आमची सिस्टीम अपडेट होऊ शकत नाही पटापट(!). रिफन्ड साठी अ‍ॅप्प्लाय करा. किती लोकं परत खटपट करतील त्या १५$ रिफन्ड करता. म्हणजे जे लोक करणार नाहीत खटपट त्यांचे पैसे ह्यांच्या कुठल्या तरी फन्ड मध्ये "चॅरिटी" म्हणून जमा होणार की काय.

पीआयओ टू ओसीआय फ्री कन्व्हर्जन करणार होते ३१ डिसेम्बर पर्यंत. काहितरी खुसपट काढून रिजेक्ट केलं आणि डेडलाईन उलटली. आता अडिचशे तीनशे डॉलर भरायचे. का कारण नाव जुळत नाही. एके ठिकाणी मिडल नेम आहे, एके ठिकाणी नाही!

रिजेक्शन लेटर मध्ये अ‍ॅप्लिकन्ट चं नाव घालताना मिडल नेम सकट पूर्ण नाव स्वतः हँड रिटन आहे. म्हणजे ह्यांनां हे कळतंय की ह्या दोन एकच व्यक्ती आहेत ते?!
परत कारण दिलं आहे "Father's name does not match". Does this mean father's name does not match for the applicant or father's name itself does not match between father's name on hand-written PIO and the one we provide on the website where you try and give it exactly like in the passport? This is still mystery to me and even if now I opt for in-person appointment, I am not confident if one trip will be sufficient. Because at any point of time they may demand additional documentation and mind you, it may need to be notarized!!!

आता म्हणे नविन अ‍ॅप्लिकेशन करताना नोटराइज्ड अ‍ॅफिडेव्हिट द्या. त्यात आता एक टेबल करावं बहुतेक. अमुक तमुक व्यक्तीचं हे फर्स्ट नेम आहे, हे मिडल नेम आहे (जे काहि ठिकाणी फक्त इनिशियल लिहीतात) आणि हे लास्ट नेम आहे. ह्या तीन शब्दांची अशी x नंबरची व्हॅलिड कॉम्बिनेशन्स असू शकतात. तर ह्या सर्व एकच व्यक्ती आहेत ह्याची कृपया नोंद घ्या!!! :रागः

गेले दोन तीन वर्षं अनेकोनेक लोकांकडून ह्याबद्दल तक्रारीचा सूर ऐकला आहे. अजूनही सावळा गोंधळ तसाच? हेच काय अच्छे दिन? एक कन्सिस्टन्ट सिस्टीम मेन्टेन करता येत नाही ह्या लोकांनां?? मग एव्हढे पैसे घेतात तरी कशाकरता? कोणा तरी मंत्री/अधिकार्‍याच्या सात पिढ्या पोसायला?

वेब साईट वर लिहीतात ३१ डिसेंबर ही डेडलाईन.

पण त्यातली गम्मत अशी की किमान मी तरी कुठेही ३१ डिसेम्बर IST असं बघितलं नव्हतं (माझ्या डोळ्यांचा आणि बुद्धीचा दोष असू शकतो). पण हे सर्व जर भारताबाहेरच्या नागरिकांकरता आहे तर त्यांच्या वेळेप्रमाणे नको का डेडलाईन?

हा मायनर इष्यू आहे ह्याची जाणीव आहे. पण आधीच एका अ‍ॅप्लिकेशन पायी एव्हढी मेहेनत करून स्ट्रेस्ड झालेल्या माझ्या जीवाला आता प्रत्येक बारीक सारीक गोष्टी खटकत आहेत.

आज फोन केला माझं रिजेक्टेड अ‍ॅप्लिकेशन सॉर्ट आऊट करण्याकरता आणि नविन अ‍ॅप्लिकेशन वर चुका(?!) दुरूस्त करण्याबद्दल माहिती घेण्याकरता तर आज त्यांचं कॉल सेन्टर बंद. आज कशाबद्दल बंद?

मी ऐकलं इतर लोकांकडून की हाही incovenience होतो. ते भारतीय सुट्ट्या पाळतात आणि अमेरिकेच्याही.

आपण आपले सामान्य नागरीक. गरज आपल्याला आहे तेव्हा नाक घासत जे म्हणतील त्याप्रमाणे त्यांचा लहरी कारभार चालवून घ्यायचा. कॉल केला की चांगले बोलतात हे अच्छे दिन च म्हणायचे बहुतेक!

कॉक्स अ‍ॅंड किंग्स ची पूर्ण वेबसाईट आणि भारतीय गवर्नमेंटची ओ सी आय अ‍ॅप्लिकेशनची वेबसाईट दोन्ही लोएस्ट बिडर ने डेवलप केलेल्या आहेत. जी कुठली कंपनी असेल त्यात यूझर एक्स्पीरियंस डिझाइन कोणाला ऐकून पण माहित नसेल. सर्व डिझाइनर्स, सिस्टम आर्किटेक्ट्स , डेवेलपर्स, टेस्टर्स हे इतर कुठल्याही ठिकाणी नोकरी वा असाइन्मेंट न मिळालेले लोक असावेत. असली बेक्कार डिझाइन्ड सिस्टम प्रॉडक्शन मधे रिलीज करण्यापेक्षा ट्रेन स्टेशनवर वडापाव विकावा त्या लोकांनी.

अजिबात कंसिस्टंसी नाही. तेच तेच इंफर्मेशन परत परत भरावे लागते. दोन वेगळ्ञा वेबसाईट मधून एक टेम्पररी नंबर , एक पर्मनंट नंबर असे नंबर्स देतात दर अ‍ॅप्लिकेशनला ! आणि वर म्हणे आमचे अ‍ॅप डाउन लोड करा म्हणजे तुम्हाला स्टॅटस अपडेट मिळत राहतील. १५-२० वर्षे दुनिया वेब बेस अ‍ॅप्लिकेशन डिझाइन मधे काय प्रगती करते हे यांच्या गावी नाही. आणी म्हणे यांचं मोबाइल अ‍ॅप डाउन लोड करा ! असल्याच कुठल्या तरी कट रेट शॉप कडून बनवून घेतलेलं अ‍ॅप कोण डाउनलोड करेल ?
तारखा भरायचे कॅलेंडर विजेट तर इतके बेकार आहे की बस. आणि प्रत्येक पेजवर वेगळ्याच टाइपचे विजेट. एक्दा लिहिलेलं विजेट रीयूझ करावे एवढी देखील अक्कल नाही!

चांगल्याशा कॉलेजला जरी कंत्राट दिलं तर एकदम चकाचक प्रोसेस आणि यूझर ईंटरफेस डिझाइन करुन मिळालं असतं ...

मला लहान मुलाच्या अंगठ्याचा ठसा घेणे फार जिकिरीचे गेले. आणि तो नोटरी समोर घ्यायचा. पण तेव्हडे सोडल्यास व तीच माहिती दोन ठिकाणी भरायची हा भाग सोडला तर सगळे व्यवस्थित झाले. मुलाचे ओसीआय कार्ड दिलेल्या दिवसांपेक्षा निम्म्या वेळात आले.
स्वतःचा भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण केले तेव्हादेखील काही वाईट अनुभव आला नाही. सगळे सुरळित झाले होते.

जर भारतीय सरकारच्या वेबसाइटवर माहिती भरण्याचा नियम रद्द केला तर सर्व प्रोसेस अजून सोपी होईल.

पोराच्या पीआयओ मध्ये माझं नाव लिहिताना मिडल नेम घातलेलं नाही. आता मीच लिहिलं न्हवतं का त्यांची चूक मला माहित नाही कारण हे ५ वर्षांपुर्वी झालं. पण वर सशल आणि एक कॉमन फ्रेंड यांच्या पीआयओ मध्येही फादरचं मिडल नेम नाही हे बघुन फोर्मचं तसा केला असावा असं म्हणायला जागा आहे.
सगळ्या फोर्मस वर पासपोर्ट वर आहे तस्सं नाव घाला लिहिलंय, पण या एका ठिकाणी मात्र पीआयओवर आहे तसं नाव घाला हे कुठेही न लिहिता तुम्ही समजून घ्यायचं आणि नाही समजून घेतलंत तर मग परत सगळं करा. Sad

अमेरिकन पासपोर्ट असेल तर १० वर्षाचा मल्टिप्ल एंट्री व्हिसा हे बेस्ट ऑप्शन आहे. कनेडिअन पासपोर्टला ती ही सोय नाही.

सशल, वेबसाईट चं डिझाईन, त्यातल्या ड्रॉप डाऊन बॉक्स मधला ऑप्शन निवडल्यावर सुद्धा, 'इनव्हॅलिड एंट्री' अशी एरर, एकाच पानावर वेगवेगळी abbreviations, संभ्रमात टाकणारी वाक्यरचना, रामाच्या आणी अर्जुनाच्या बाणाप्रमाणे, एकदा सुटला की परत घेता येणार नाही ह्या नियमाने चालणारे, एकदा चुकलं की परत मागे वळता येणार नाही अशी प्रॉसेस, रिफंड चे किचकट ऑप्शन्स आणी बर्याच इल्लॉजिकल गोष्टी अशा प्रवासातून जाण्यासाठी गुड लक!

'पब्लिक चार ठिकाणी ठेचकाळून आल्याशिवाय सुधारणार नाही' ह्या तत्वावर अढळ विश्वास ठेवून वाटचाल करणारं सरकारी काम आहे ते.

(हम होंगे कामयाब, ही) श्रद्धा आणी (मन आहे, तर मनस्ताप सुद्धा होणारच अशी) सबुरी ठेवावी लागते.

मला नोटरीनं 'why do you have to go through all of this, just to go back to your own country'? असं डोळे विस्फारून विचारलं होतं.

>>कोणा तरी मंत्री/अधिकार्‍याच्या सात पिढ्या पोसायला?<<

तुमची तक्रार सुषमा स्वराज यांना ट्वीट करा, पीआयओ/ओसीआय त्यांच्याच खात्यांतर्गत येते बहुतेक. ताबडतोब दखल घेण्याबाबतची त्यांची किर्ती ऐकुन आहे...

असली बेक्कार डिझाइन्ड सिस्टम प्रॉडक्शन मधे रिलीज करण्यापेक्षा ट्रेन स्टेशनवर वडापाव विकावा त्या लोकांनी. >> Biggrin वडापाव वर का संक्रांत!

आमच्याकडे दोन्ही मुलांची आडनाव एकच आहेत ... जोड आडनावं आहेत मधे हायफन.... इंडीअन साईट वर स्पेशल कॅरेक्टर नॉट अलाऊड .... कस्टमर सर्व्हिस ला कॉल केला तर हे चालत नाही म्हणून एकाचा अ‍ॅप्लिकेशन रिजेक्ट केला....

दुसर्‍याचा काय तर म्हणे फादर नेम मॅच होत नाही.....

मी आता विसा च करणार मुलांचा- तसही परत ५ वर्षात नवीन ओसिआय म्हणजे परत हीच मारामारी

तुमची तक्रार सुषमा स्वराज यांना ट्वीट करा, पीआयओ/ओसीआय त्यांच्याच खात्यांतर्गत येते बहुतेक. ताबडतोब दखल घेण्याबाबतची त्यांची किर्ती ऐकुन आहे...>>>> सशल चल ट्वीट करुया

मन आहे, तर मनस्ताप सुद्धा होणारच >> गुलझार चाचा च जणू. कोणाला कशाने स्फूर्ती मिळेल सांगता येत नाही Lol

सशल तुझ्या मन:स्तापाची कल्पना येऊ शकते. प्रत्यक्ष नि ऐकिव अनुभव एव्हढे चित्र विचित्र आहेत कि थेट विचित्र विश्व वाचतोय असे वाटावे.

मी हे उपद्व्याप केलेले तेंव्हा ह्यूस्टनवाल्यांना फक्त कलर कॉपीज हव्या होत्या तर न्यूयॉर्क वाल्यांना b&W. हे असे का हे कोणालाच नाहित नाही. मी कॉन्स्युलर ला मेल केलेले तेंव्हा त्याने दिलगिरी व्यक्त करून हे बदलु असे मेल केले होते. पुढे काय झाले देव जाणे.

'आई बापां चे लीळाचरित्र दाखवणारी सगळी documents असताना नि मूळ पासपोर्ट application मधे असताना family application मधे पोरांच्या फॉर्म बरोबर आइ बापांच्या कागदांच्या प्रति परत का हव्यात' हा प्रश्न अजून सुटलेला नाही. मी CKGS वाल्याला हे विचारलेले त्यावर 'आमाला पॉवर नाय, आमाला आमच्या लायनीप्रमाणे जावे लागेत' टाइप उत्तर मिळाले होते.

इथे documents notarised करणे ह्याचा अर्थ वेगळा आहे हे CKGS वाल्यांना माहित नव्हते. वेब साईट वर कुठून navigation करून पोहोचता ह्यावर Required doc. list बदलत होती. हे मी त्यांना फोनवरून समजावले तेंव्हा त्यांचा super set पाठवा साहेब, कशाला ताप घेताय करून असे सांगितलेले. पण CKGS मधे फोन केला कि उत्तरे मात्र नक्की मिळत होती - भले दर वेळेला वेगवेगळी का असेनात Happy

passport renew करताना मात्र एकदम सुखद अनुभव होता पंधरा वर्षांपूर्वी.

"असली बेक्कार डिझाइन्ड सिस्टम प्रॉडक्शन मधे रिलीज करण्यापेक्षा ट्रेन स्टेशनवर वडापाव विकावा त्या लोकांनी" - Are you sure? A lot can go wrong with one simple वडा-पाव.

ट्रेन थांबल्यावर, पुलावरून पलिकडे जावून वडा-पाव घ्यावा लागू शकतो. पुढच्या स्टेशन वर घ्यायच्या वडा-पाव चं कूपन अलिकडच्या स्टेशन वर घ्यावं लागू शकतं. ह्या स्टेशन वर फक्त पाव मिळेल, तो दाखवून पुढच्या स्टेशन वर वडा घ्यावा आणी दोन्ही दाखवून परत येऊन ट्रेन च्या दारात चटणी मिळेल अशी काहीतरी सिस्टीम असू शकते. असो, प्रतिभासाधन हा काही आपला प्रांत नाही. त्यासाठी फारएण्ड, पायस, श्रद्धा वगैरे लोकांची डोकॅलिटी लागते. तेव्हा इथेच थांबावं.

अमेरिकन ग्रीन कार्ड , आई वडिलांचं ग्रीन कार्ड, इतर अनेक देशांचे व्हिसा, इथली सिटीझनशिप, इतले पासपोर्ट रेन्यू करणे , गाड्या / घरे घेणे कशालाही एकही कागद नोटराइझ करावा लागला नाही. पी आय ओ चं ओ सी आय करताना मात्र नोटरी लागणार ! कधी सुधारणार कोण जाणे. आम्ही करतो आहोत तोवर मुलं बाळगतील ओ सी आय. आमच्यामागे त्यांना ओढ राहील का नाही माहित नाही . पण असल्या किचकट छळवादी सिस्टम शी झटापट करण्याचा पेशंस नक्कीच राहणार नाही .

फेफे Lol

असो, प्रतिभासाधन हा काही आपला प्रांत नाही. त्यासाठी फारएण्ड, पायस, श्रद्धा वगैरे लोकांची डोकॅलिटी लागते. तेव्हा इथेच थांबावं. >> अरे कुडचेतकरांचे नाव घे नि हो सुरू Lol

"गुलझार चाचा च जणू. कोणाला कशाने स्फूर्ती मिळेल सांगता येत नाही" - अरे, ते थोडसं, 'मै शायर तो नही, मगर ऐ हसी, जब से देखा, मैने तुझको, मुझको, शायरी आ गयी' असा प्रकार आहे. जन्मठेपेच्या शिक्षेत महाकाव्य सुचू शकतं, तर असल्या अग्निदिव्यातून जाताना थोडीसी फिलॉसॉफी आपोआप सुचते. डिफेन्स मेकॅनिझम आहे ते. Happy

"पण असल्या किचकट छळवादी सिस्टम शी" - कमाल आहे तुमची. बरेचसे कागद 'सेल्फ अ‍ॅटेस्ट' पण करण्याची 'सोय' केली आहे ना. Wink

मला त्या विनोदामागचं कारूण्य दिसलच नाहीये. मीच कागद जोडणार. अ‍ॅप्लिकेशन वर 'वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे सत्य आहे' म्हणून सही पण करणार. आणी तरिही, प्रत्येक कागदावर स्वत:च सही करून, ते अ‍ॅटेस्ट करणार. रिडंडंसी नाहीये का ही? ईतक्या कागदांचं नंतर नेमकं काय करतात हा पण प्रश्न मला भेडसावतो.

सीकेजीएसवर खंडकाव्य लिहीले तरी कमी पडेल इतके किस्से आहेत. सीकेजीएस आधी जी संस्था चालवत होती, त्यांचे अजूनच वेगळे किस्से.
पासपोर्ट रीन्यूवल पटकन झालेले. पीआयओ ला फेडेक्सचे एन्वलप द्यायलाही त्यांनी ४/४ वेळा फोन खाल्ले.

असामी म्हणाला तसे वेगवेगळी लिस्ट. मग आम्ही सगळेच पाठवले. पण त्या तयारीमध्ये महिनातरी गेला सगळे कागदपत्र गोळा करून दोन दोन सेट बनवायला आणि मग नोटरीकडून घ्यायला.

एक बाळबोध प्रश्न - जवळजवळ गेल्या १२ वर्षांपासुन ओसीआय मिळवण्याची सोय असतानाहि (इवन पीआयओ टु ओसीआय क्न्वर्जन) लोकांनी फक्त पीआयओच का घेउन ठेवलं?..

राज, पुर्वी मुलांचं ओसीआय घ्यायला एकातरी पालकाचं ओसीआय असणं गरजेचं होतं.

पीआयओ ला तशी रिक्वायरमेन्ट नव्हती.

दोन-तीन वर्षांपुर्वी कधीतरी त्यांनीं हा निर्णय घेतला की आता पीआयओ निकालात काढणार ( कधीतरी, फेज्ड् आऊट). त्यामुळे मग गेल्या दोन तीन वर्षांत बर्‍याच लोकांची झुंबड उडाली आहे पीआयओ टू ओसीआय कन्व्हर्जन करता.

सॅन फ्रान्सिको काउन्सुलेट मधे २०१० च्या आसपास ताज्या दमाचे लोक होते तेव्हा अनुभव चांगला होता. आता चे माहीत नाही.

Pages