आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.
अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.
येणार्या काळाची नांदी !!
ईजराईलच्या दूतावासाच्या कारवर बॉम्ब हल्ला, एकाच दिवशी जगात दोन ठिकाणी :- एक दिल्ली व दुसर
जॉर्जिया देशात.
ईराण व ईझराईल माधिल भांडणाचे पडसाद भारताच्या अंगणातच का ?
जागतीक राजकारणात भारताची प्रतिमा ईतकी खालावली आहे की , मी पुर्वी लिहील्या प्रमाणे आता
जगात कोठेही अशांती असेल तर ते आपला राग व्यक्त करायला भारतच जागा शोधतील.
भारता ने आपली प्रतिमा बदलावी का ? आणि कशी बदलावी ?
स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...
पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला
प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे 
मी मज हरपून ...
"जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता ... " या ओळी कधीही कानावर पडल्या तरी चित्तवृत्ती उल्हसित होतात. एकटे-दुकटे फिरताना, दुरून जरी हे सूर कानावर पडले तरी आपण थबकतो, रस्त्यातच ५ मिनिटे उभे राह्तो, मायभूमीची आठवण काढतो, प्रफ़ुल्लित होतो आणि परत आपली वाट धरतो. हेच राष्ट्रगीत जेव्हा एक ४५००० लोकांचा समूह गातो, माझ्या देशाचा विजय व्हावा या साठी अंतिम क्षणापर्यन्त साथ देतो ... तेव्हा ’हरपून’ जाण्याशिवाय काही उरतच नाही !