भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

दर रोज आपण साबण, शँपु, टुथपेस्ट वापरतो हे सर्व केमिकल्सने बनवलेले असतात, त्याचा बराच अंश हा ड्रेन द्वारा परत नदीत, जमिनीत सोडला जातो. समजा ऐखाद्या छोट्या शहराची लोक संख्या १० लाख आहे तर दररोज सकाळी किती केमिकल पॉलुशन होत असेल ?

भारतीय रेल्वेत काही गाड्यांसाठी चहासाठी प्लॅस्टीक कप ऐवजी मातीचे कुल्हड वापरले जातात. दक्षिण भारतात स्टील ताटांऐवजी केळीच्या पानात जेवंण द्यायची पद्धत अजुनही आहे. महाराष्ट्रात पुर्वी पत्रावळीवर जेवण वाढले जाई.

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा वापर, केमिकल टुथपेस्ट , साबण , शँपु वापरणे हा तुमच्या मते प्रॉब्लेम आहे का ?
जर आहे तर ईतक्या मोठ्या प्रॉब्लेमच सोल्युशन काय आहे ?

जर रामदेव बाबा सारख्या एका योगी पुरुषाने शेतकर्यांच्या सहाय्याने केमिकल रहीत साबण, शँपु वैगेरे बनवले आहेत.
अश्या प्रॉडक्टने वर सांगीतलेल्या पॉल्युशन प्रॉब्लेम्सचा उतारा मिळेल का ?

Group content visibility: 
Use group defaults

जर रामदेव बाबा सारख्या एका योगी पुरुषाने शेतकर्यांच्या सहाय्याने केमिकल रहीत साबण, शँपु वैगेरे बनवले आहेत >>>>> just lol. Lol . Its definitely not chemical free.

उसाचे चिपाड तसेच केळीच्या बुंध्यापासून डिशेस बाउल ग्लास वगैरे यशस्वी रित्या बनवले आणि वापरले जातात पण दुर्दैवाने अश्या वापराचे प्रमाण फारच नगण्य आहे ते वाढण्यसाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे

मिलिंद जाधव,

रामदेव बाबांची उत्पादनं रसायनविरहित मुळीच नाहीत. बाजारात उपलब्ध असणार्‍या इतर कंपन्यांच्या उत्पादनांमधली त्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी सर्व रसायनं पतंजलिच्या उत्पादनांमध्ये असतात. त्यामुळे पतंजलिची उत्पादनंही तितकंच जलप्रदूषण घडवून आणतात.

उदाहरणार्थ,
पतंजलिच्या केशकांति हेअर कंडिशनरामधले घटक - Glycerin, Silicone Quaternium, Dimethicone Diazolidinyl urea, IPBC इत्यादी. मजा म्हणजे Silicone Quaternium या घटकाचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. उत्पादनावर ते Silicon Quantemium असं लिहिलं आहे.

बाबांची उत्पादनं 'आयुर्वेदिक' आणि 'रसायनविरहित' आहेत हा मोठ्ठा गैरसमज जाहिरातींनी आणि पुनरुज्जीवनवाद्यांनी पसरवला आहे.

पतंजलीची उत्पादने ही रसायनविरहित आहेत, हा मुळातच मोठ्ठा गैरसमज आहे.

आणि राहिला प्रश्न प्लास्टिक निर्मूलनाचा. तर त्यासाठी आपल्यालाच कचरा व्यवस्थित जमा करण्याची सवय लावून घ्यायला लागेल. त्यासाठी रामदेवबाबा किंवा कुणी एखादा येणार नाहीये..

>>> डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा वापर, केमिकल टुथपेस्ट , साबण , शँपु वापरणे हा तुमच्या मते प्रॉब्लेम आहे का ?
जर आहे तर ईतक्या मोठ्या प्रॉब्लेमच सोल्युशन काय आहे ?

प्लास्टिक कचरा पायरोलायसिस प्लांटमधून खालील वापरण्यायोग्य पदार्थांमध्ये विघटित करता येईल:
१. द्रव इंधन (ऑईल, पेट्रोल)
२. वायू इंधन (सीनगॅस)
३. अ‍ॅक्टिव कार्बन

Roads made up of plastic garbage.... most durable and useful solution but the question is willingness for implementation. cost effectiveness or other hurdles might b d the practical problems

चिनूक्स ,

रामदेव बाबा बद्दलचा पॉईंट समजला !!

भारताच्या लोक संख्येचा विचार करता दर रोज दर माणशी वापरात येणार्या पदार्थातुन प्रदुषण होण्याची पातळी खुप मोठी असावी. त्यावर अजुन कोणत्याच लेव्हलला विचार झालेला नसावा. (असा विचार संशोधन कार्यात्त गुंतलेल्या संस्थांकडुन होणे अपेक्षीत असावे , सर्व गोष्टी सरकारने कराव्यात अश्या विचाराचा मी नाहीय. )

बेसिकली दर रोजच्या वापरात स्वस्त दरातली केमिकल विरहीत प्रसाधने (हायजीन प्रोडक्टस) आली तर त्याचा मोठा परीणाम प्रदुषण रोकण्यास होऊ शकेल. केमिकल विरहीत उत्पादने बनवण्यासाठी संशोधनाची गरज आहे , आणी प्रश्न हा आहे की ते कोण करणार ? वा कसे होणार ?

दर रोजच्या वापरातली डीस्पोझेबल प्लॅस्टीकची भांडीसुद्धा एक असा प्रश्न आहे की असे आयटम्स स्वस्त दरातल्या उप्लब्धते मुळे व उ प युक्तते मुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण त्यामुळे निर्माण होणार्या प्रदुषणा कडे कोणाचेच लक्ष नाही.

पुर्वीप्रमाणे केस धुवायला रिठे व शिकेकाई, अंग धुवायला बेसन, भांडी घासायला राख. कपडे धुवायला काय?

धागाकर्त्याना विनंती -
रामदेवबाबांची उत्पादने जर का तितकेच जलप्रदुषण घडवून आणतात तर मग धाग्याच्या शीर्षकातले 'रामदेव बाबा चे सॉल्युशन' हे शब्द काढून टाकणार का? तुम्हाला खरोखर पर्यावरणाबाबत चर्चा करायची आहे तर त्यातली गैरसमज पसरवणारी माहिती एक जबाबदार मायबोलीकर म्हणून संपादित करणे योग्य नाही का?

रामदेवबाबांची उत्पादने जर का तितकेच जलप्रदुषण घडवून आणतात का ?

माझ्या मते नाही,
रामदेव बाबा च्या पतंजलीच्या उत्पादनात " कच्चे घानी का सरसों का तेल " हे सरसों पासुन सॉल्व्हेंट न वापरता जुन्या घाण्यावर काढलेले तेल असते.
तसेच दंत कांती हे सुद्धा केमिकल न वापरता बनवलेली टुथपेस्ट आहे. ही पेस्ट वापरल्या पासुन मी सेंसीटीव्ह पेस्ट ( कोलगेट सेंसीटीव्ह ) वापरायची बंद केली. पतंजलीचा साबणही वापरुन बघीतला आहे तो केमीकल विरहीत आहे असा दावा पतंजलीचा आहे .

अश्विनी तै,
पुर्वीप्रमाणे केस धुवायला रिठे व शिकेकाई, अंग धुवायला बेसन, भांडी घासायला राख. कपडे धुवायला काय?

केस धुवायला रीठे व शिकेकाई फार पुर्वी वापरात होतीच पण काही वर्षांपुर्वी हिंदुस्तान लिव्हरच्या कोणत्याश्या साबणातही शिकेकाई असते अस जाहीरातीत म्हंटलेल आठवत. ती जाहीरात हिंदुस्तान लिव्हर नावाच्या विदेशी कंपनीनी केलेली असल्याने त्यांना तस करण्याची पुर्ण मुभा आहेच. त्या शिवाय विदेशी कंपन्यांच्या उत्पादनात टुथपेस्ट मध्ये मीठ, फेसवॉश मध्ये कोळसा ( अ‍ॅक्टीव चारकोल) हे सुद्धा आपल्याला खटकत नाही.

पण पतंजलीची प्रोडक्टस मात्र डोक्यात जातात. कारण तिथे खोटे ( केमिकल विरहीत ) बोलले जाते , पण विदेशी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात कितीही केमिकल्स घातली तरी हे मात्र चालवुन घेतले जाते. व्हील ( सौ निंबु की शक्ती ) विम निंबु के साथ वैगेरे आपण चालवुन घेतो, कधी विचार केलाय का ? १०० लिंबु एका साबणाच्या वडीत टाकले तर त्या वडीची किंमत काय असायला पाहीजे ?

लहानपणी शाली स्वेटर वगैरे धुवायला रिठ्याचे पाणी वापरल्याचे आठवते. आजोळी मोठे रिठ्याचे झाड होते. गावातील बरेचजण रिठे घेवून जात.
मी देशी-परदेशी कंपनी असा भेद करत नाही. कुठल्याही कंपनीचे उत्पादन असले तरी मी सारखाच निकष लावते. नॅचरल, हर्बल असे लेबल आहे म्हणजे धोकादायक नाही /प्रदूषण निर्माण करत नाही असे नाही. वापर झालेले पाणी योग्य प्रक्रिया न करता जलाशयात किंवा भूजलात मिसळले तर जलप्रदूषण होणार.

जाधव,

पतन्जलीच्या products बद्दल शीर्षकातील उल्लेख काढावा. पतंजली वर वेगळा धागा आहे तिथे लिहा की.

अरे वा
रामदेव ने आता असाही प्रचार चालवला का?
नेपाळ सारख्या देशाने रामदेवचा माल निकृष्ट ठरवून देशात बंदी घातली आहे. आर्मीने पण त्याचे काही प्रॉडक्ट रिजेक्ट केले आहे मग अशा व्यापार्याची जाहीरात कुठल्याबेस वर केली जात आहे?

स्वाती२ , सनव

धाग्याचा शीर्षकात बदल केलेला आहे !!

पण साबण म्हटलं की saponification ही chemical reaction आलीच. मग त्यात नावाला रिठा शिकेकाई वगैरे घातलं तरी केमिकल्स आलेच. प्युअर रिठा, शिकेकाई, राख हे रसायनांने होणारे प्रदूषण करणार नाहीत. मी खरंच विचार करत होते की साबणाचा शोध लागायच्या आधी कपडे धुवायला काय वापरत असतील? स्वातीताई म्हणतात त्याप्रमाणे रिठे काही कपड्यांसाठी असतील. अजून काही?

मी स्वत: नेपाळमध्ये (काठमांडू, पोखरात तरी होती) पतंजलीची दुकानं पाहिली की एप्रिल २०१७ मध्ये. त्यानंतर बंदी आली असेल तर माहित नाही.

http://www.hindustantimes.com/world-news/nepal-authorities-ask-ramdev-s-...

रविशंकर नामक एका बाबाने यमुनेचे नुकसान केले आहे यावर रिपोर्ट देऊन दंड केला पण त्याने भरला नाही
हे बाबालोक लोकांना उल्लू बनवतात
टाटा डाबर गोदरेज एमडीएच सारखे स्वदेशी प्रॉडक्ट बनवणार्यांनी कधी रामदेव सारखा किळसवाणा प्रचार केला नाही

<<१०० लिंबु एका साबणाच्या वडीत टाकले तर त्या वडीची किंमत काय असायला पाहीजे ?>>
------ सौ निम्बू की शक्ती अशी जाहिरात करतात ते कुठे म्हणत आहेत यामधे १०० लिम्बू वापरले आहेत?

<<बाबांची उत्पादनं 'आयुर्वेदिक' आणि 'रसायनविरहित' आहेत हा मोठ्ठा गैरसमज जाहिरातींनी >>
-------- सहमत...

हा धागा नक्की पर्यावरण प्रेमापोटी असेल तर - प्लास्टिकचा वापर टाळणे सर्वस्वी आपल्या हातात असूनही आपण डोळ्यांवर कातडे ओढून फक्त झोपडायला कुणीतरी शोधत असतो. रामदेवबाबला हवं तितकं झोडपा, माझे काही म्हणणे नाही पण आपल्या हातात जे करण्यासारखे आहे ते तरी करतोय का हे आधी बघा.

नव्या मुंबईचा अनुभव ताजा आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अथक प्रयत्न करून नमुचा कायापालट करायचा प्रयत्न केला. त्यांची झेप इतकी होती की बाजारातून प्लास्टिक पिशव्या गायब झाल्या. आमच्यासरखे आधीपासूनच कापडी पिशव्या घेऊन फिरत होते पण जे पिशवी न घेता येत होते त्यांना खूप कुरकुर करून मग रिलायन्स फ्रेश टाईप पिशव्या दुकानदार देत होते, तेही चार्ज करून. ह्या पिशव्याही चांगल्या नाहीत पण गिर्हाईक जाऊ नये म्हणून हा मार्ग दुकानदारांनी काढला. शेवटी मुंढ्यांमुळे धंदे बंद पडलेले सगळे लोक एकत्र आले आणि मुंढ्यांची बदली करवून घेण्यात यशस्वी झाले. दुसऱ्याच दिवशी मी त्या जुन्या प्लास्टिक पिशव्या मार्केटात परत पाहिल्या. नाईलाजाने हातात कापडी पिशव्या घेऊन येणारे लोक परत हात हलवत यायला लागले. जीव गेला तरी मोबाईल घरी न विसरणारे कापडी पिशव्या मात्र न चुकता विसरतात. हेच लोक सोशल मीडियावर पर्यावरण बिघडले म्हणून याला चोप त्याला चोप करत असतात, स्वतःला एकदा चोपा की....

बाकी दुःखात सुख एवढेच की मुंढ्यांच्या जागी रामस्वामी आलेत ते मुंढ्यांचे बाप आहेत. त्यांनी random धाडी घालून दुकानदारांच्या नावे दंडाचे चलन फाडायचे सुरू केलंय.

विरोधाभास हा की जिथे सरकार प्रदूषण थांबवायचे प्रयत्न करते तिथे जनता साथ देत नाही, स्वतःहुनकाही करायचे हे जनतेला दिसत असून कातडे ओढते आणि जिथे सरकार प्रदूषण वाढवायला पुढे आहे तिथे सोशल मीडियावर जाऊन सरकारला धोपटते. सोशल मीडिया हे आर्मचेअर योद्ध्यांचे समरांगण झालेय. या लोकांच्या हातून एक प्लास्टिक नाकारून सिरामिकच्या कपातून चहाही घेणवणार नाही, पण बढाया मात्र मारतील आकाशाएवढ्या.

हातात कापडी पिशव्या घेऊन जाणे सहज शक्य असतानाही ज्यांना ते जमत नाही ते रिठे, शिकेकाई वापरून कपडे धुणार वगैरे शनी ग्रहाईतक्या दूरच्या गोष्टी झाल्या. रिठे शिकेकाई वापरून कसे धुणे करतात हे कधी बघितलंय तरी या मंडळींनी? जे करता येण्यासारखे आहे तिथून सुरवात तरी करा.

अंबज्ञ, आमच्या इथला उरण फाट्याच्या फ्लाईओव्हरवर प्लास्टिक वेस्ट वापरून रस्ता रिपेर केला गेला. गेल्या महिन्यात कडक ऊन होते तेव्हा ब्रेक मारल्यावर गाड्या घसरून अपघात होण्याच्या खूप घटना घडल्या. याचे नक्की कारण माहीत नाही पण जर प्लॅस्टिकमुळे झाले असेल तर ह्या टेक्नॉलॉजित अजून संशोधनाची गरज आहे.

Plastic road technology is already well set ...only thing needed is proper utilization.

साधना,
तुमाराम मुंढे साहेबांबद्दल सहमत. खुप चांगले काम करत होते ते.
अतिक्रमणावर मात्र अजुनही तसेच कडक कारवाई चालु आहे बघुन जरा हायसे वाटते.

विरोधाभास हा की जिथे सरकार प्रदूषण थांबवायचे प्रयत्न करते तिथे जनता साथ देत नाही, स्वतःहुनकाही करायचे हे जनतेला दिसत असून कातडे ओढते आणि जिथे सरकार प्रदूषण वाढवायला पुढे आहे तिथे सोशल मीडियावर जाऊन सरकारला धोपटते.
>>
+१

{प्लास्टिकचा वापर टाळणे सर्वस्वी आपल्या हातात असूनही }
मी किपडु पिशव्याच वापरतो. पण त्याने नक्की किती फरक पडतो. कारण मी विकत घेत असलेली प्रत्येक वस्तू प्लास्टिकमध्ये packed असते. Carrry bag च्या वीसपट प्लास्टिक carry bag मध्ये असते. तेव्हि प्रश्न बक्त कापडी थैल्यांचा नाही.
या सगळ्या पिशव्या गोळा करून कचऱ्यात वेगळ्या देतो. तै रिसायकल होते का हे मला महीत नाही.

नागरिकांची जबाबदारी आहे हे बरोबरच. सरकारी निर्णयावर बौलूच नये हा नवा पायंडा पडत चाललाय.
सरकारी निर्णयांचे परिणाम अधिक व्यापक आणि दूरगामी असतात.
शिवाय जे त्याबद्दल बोलतात, ते स्वतः काहीच करत नाहीत हे सोपे सार्वत्रिकीकरण झाले.

Pages