मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
क्रीडा
पुणे अल्ट्रा व एसआरटी ५३ किमी खडतर धाव पूर्ण केल्याबद्दल हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!
सर्वांना नमस्कार.
आपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.
आयपीएल नावाची सर्कस - द ग्रेटेस्ट रिअॅलिटी शो ईन ईंडिया
जे ईटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्वचितच घडते ते सारे काही अदभुत या आयपीएलमध्ये वारंवार लगातार घडत राहते.
ईथे एकावेळी भन्नाट कॅचेस पकडल्या जातात तर त्याच वेळी हलवा कॅचेस सोडल्या जातात.
ईथे सामन्याची पहिली ओवर स्पिनरला दिली जाते तर अखेरची ओवरही स्पिनरला दिली जाते.
ईथे सामना अटीतटीचा चालू असताना अचानक छातीवरचे नो बॉल टाकले जातात, तर कधी पाय फूटभर पुढे टाकून नो बॉल दिला जातो.
त्या फ्री हिटपासून मग शॉर्ट वाईड फुलटॉस यांची जी खैरात सुरू होते ते सामन्याचा नूर पलटवूनच थांबते.
ईथे चार ओवरमध्ये ८० धावा हव्या असताना सामना सुपरओवरम्ध्ये जातो
IPL मालक आणि ROI
फ्रेंच ओपन २०२०
यंदाचे फ्रेंच ओपन जुन ऐवजी आता सुरु झाले. सुरुवात वेगळ्या ऋतुत होत आहे .... पण शेवट नेहमीसारखाच... नदालच्या विजयाने होइल का ... की डॉमिनिक थिम किंवा जाकोव्हिक या वर्षी त्याला यशस्वी आव्हान देतील?
त्या तिघांनी सुरुवात तर स्ट्रेट सेटमधे त्यांचे सामने जिंकुन केली आहे. पण ऑक्टोबरच्या थंड हवेत.. टेनिस बॉल व रोलां गॅरसची तांबडी माती.. वेगळे रुप दाखवतील का?
तुमचे काय मत?
Novak Djokovic
जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला रविवारी यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत खळबळजनक प्रकारे अपात्र ठरवण्यात आले. स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्टाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये मागे पडल्यानंतर त्याने मारलेला बॉल लाइन जजला लागल्यानंतर असे झाले. त्याने जाणून बुजून अधिकार्याला मारले नाही असे सांगून जोकोविचने माफी मागितली तरी त्याला शिक्षा झाली. ५-६ ने मागे पडल्यानंतर जोकोविचने कोर्टच्या मागील बाजूला जोरात बॉल मारला. तो महिला लाइन जजच्या मानेवर आदळला.
गॉल्फ आणि मी...
"गॉल्फ इज डिसेप्टिवली सिंपल अँड एंडलेसली कांप्लिकेटेड; इट सॅटिस्फाय्स द सोल, अँड फ्रस्ट्रेट्स द इंटलेक्ट. इट इज अॅट द सेम टाय्म रिवार्डिंग अँड मॅडनिंग - अँड इट इज विदौट ए डाउट दि ग्रेटेस्ट गेम मनकाइंड एवर इंन्वेंटेड..." - आर्नल्ड पामर
उद्योगासाठी फंड कसा मिळवावा?
नमस्कार मंडळी,
माझ्या मागिल धाग्यावरुन आपणांस लक्षात आले असेल की आम्ही एक स्पोर्टस व आर्ट्स ट्रेनिंग इंन्स्टीट्युट काढत आहोत. तयारी सुरु झाली आहे.
सध्या स्टार्ट अप साठी शासनाच्या काही योजना आहेत असे लक्षात आले. पण नेमके कुठे व कसे अप्रोच करावे ते कळत नाहीये. आमचे प्रोजेक्ट बरेच मोठे असल्याने फंड बराच लागेल.
तर...
स्टार्ट अप साठी फंड 'शासन किंवा संस्था' यांकडून कसा मिळवता येईल. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!!
आठवणी ऑलिंपिक्सच्या- माझा अॅटलांटा ऑलिंपिक्सचा अनुभव- भाग३
मित्रांनो... आता पुन्हा एकदा ऑलिंपिक्सच्या रंजक गोष्टींकडे वळुयात.... आजच्या गोष्टीसाठी आपल्याला पुन्हा एकदा जायचे आहे ऍटलांटा ऑलिंपिक्सला....
मागच्या काही गोष्टीत मी तुम्हाला ऍटलांटा ऑलिंपिक्सचे माझे काही अविस्मरणिय अनुभव सांगितलेले आठवत असेलच. त्या आठवणींबरोबरच ऍटलांटा ऑलिंपिक्सबद्दल सांगताना त्या ऑलिंपिक्सच्या ओपनींग सेरीमनीबद्दल लिहीणे भागच आहे..
आठवणी ऑलिंपिक्सच्या- अॅट्लांटा ऑलिंपिक्स.. भाग २
आज मी तुम्हाला १९९६ च्या अॅटलांटा ऑलिंपिक्स मधील अजुन एक गोष्ट सांगणार आहे. पण त्या कहाणीतल्या नायकाची थोडी पार्श्वभुमी तुम्हाला समजावुन घ्यायला लागेल.
तर त्याकरता..चला मंडळी.. सुरुवात आपण करुयात.. असेला या इथियोपियातल्या अतिशय छोट्या खेडेगावात जाउन....
Pages
