बेंगलोर

बेंगळूरूमध्ये घडलेला लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार

Submitted by अर्चना सरकार on 13 January, 2017 - 06:08

नवीव वर्षाच्या आदल्या रात्री बेंगलोरला जे घडले ते बातम्यांमधून कानावर आलेले. आज जरा वेळ होता, ते आठवले तर त्या संबंधित बातम्या आणि यू ट्यूब विडिओ पाहिले. शॉकिंग. शब्द नाहीयेत माझ्याकडे. त्यातला एकही विडिओ पुर्ण बघवला नाही. थिल्लरपणाच्याही पलीकडे काहीतरी किळस येणारी दृष्ये. थरकाप उडवणारी. मला बघतानाही घरी बसल्या असुरक्षित वाटू लागले. संबंधित बातम्या आधीही ऐकलेल्या पण या समजात होते की नवीन वर्ष आहे तर घडले असतील काही मद्यधुंद तरुणांकडून नेहमीसारखे गैर प्रकार, अश्यावेळी मुलींनीच काळजी घेणे योग्य. पण आज पाहिले तर माझ्याकडे निषेधालाही शब्द नाहीयेत.

शब्दखुणा: 

बेंगलोर, म्हैसुर, उटी ट्रीप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राजेंद्र on 31 August, 2016 - 05:45

आम्हाला या दिवाळीत (३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) बेंगलोर, म्हैसुर, उटी ला जायचे आहे. २९ ऑक्टोबर ला रात्री निघून २ नोव्हेंबर ला पुण्यात पोहोचायचे आहे. या चार दिवसात बेंगलोर, म्हैसुर, उटी किंवा म्हैसुर, उटी बघणे व जाता येता चा प्रवास श्यक्य आहे का? KSTDC च्या वेबसाईट वर बेंगलोर, म्हैसुर, उटी व कोडाईकनाल ची ट्रीप ५ दिवसांची आहे. ती ट्रीप सोमवारी व गुरवारी आहे. सगळी महत्वाची ठिकाण बघता येतील आशी काही ट्रीप आहे का? पुणे ते बेंगलोर प्रवास बस ने करावा कि ट्रेन ने?

विषय: 

मायबोली बंगळुर गटग!

Submitted by धनुकली on 23 September, 2014 - 06:41
तारीख/वेळ: 
27 September, 2014 - 06:30 to 08:30
ठिकाण/पत्ता: 
rukawat k liye khed hai. bhetanyachi navin jaaga- California pizza kitchen (CHYA BAHER), Indiranagar 100 ft road. nakki yenyache jamawawe hi winanti vishesh.

..
..
..
एक अकेला इस शहर में...

असं वाटलं.. घरची आठवण आली..
माय मराठी ची ओढ जाणवु लागली की पहिलं काम काय करावं?

माबो उघडावं!

अन ह्या सुंदर विश्वात स्वतः ला झोकुन द्यावं.. इथे काय नाही?
आईची माया.. बाबांचा कडक पणा.. बहीण भावांचं प्रेम.. मायेचा ओलावा.. आणि ज्ञानाचं भंडार..

ईथेच..भाववेधी काही वाचतो, हीरीरी ने आपली मते मांडतो, कुठला चित्रपट पाहीला ते बोलतो, काय खाल्लं, काय घेतलं सगळं शेअर करतो आपण..
आणि आपल्या सारखेच इतर अनेक जण..

ह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्षात भेटावसं न वाटेल तर नवल!
पण ते जरा कठीण आहे कारण आपण देशा-देशात विभगलेलो..

प्रांत/गाव: 

रंगोत्सव

Submitted by प्रकाश काळेल on 30 January, 2011 - 05:41

फ्लॉवर शो-२०११, लालबाग गार्डन, बेंगलोर, कर्नाटक.

फुलांनी साकारलेली केंपे गौडा टॉवर प्रतिकृती

नम्मा मेट्रो !

गुलमोहर: 
Subscribe to RSS - बेंगलोर