यूजलेस ईटर्स आणि "न्यू वर्ल्ड ऑर्डर"

Submitted by सेन्साय on 21 March, 2017 - 06:09

आपण कधी कधी रागाने म्हणताना पाहतो घराघरात की,
काय एवढा मोठा घोड़ा झालास तरी काही कामधंदा न करता नुसता बसून असतो...
फुकटचे जेवायला लाज नाही का वाटत ?

मराठीत तर म्हणीमध्ये सुद्धा एक अश्या अर्थानेच आहे - खायला काळ नी भुईला भार.

पण म्हणून ह्या उपरोधिक बोलण्याचे धनी ठरलेल्या मंडळीना काही त्या यूजलेस ईटर्स ह्या डेफिनेशन खाली आपण नक्कीच गणणार नाही.

मग ह्या परिभाषेअंतर्गत कोण कोण येतात ?

Useless Eaters -
A term implied in National Security Study Memorandum 200 written by Henry Kissinger. It basically implies that there are too many "useless eaters" consuming valuable resources would be better used by a "reduced" world population
.

ह्यांच्या अभ्यासासाठी आपल्याला आधी "न्यू वर्ल्ड ऑर्डर" माहिती करून घ्यायला लागेल
आणि त्याअनुषंगाने इकडे चर्चा अभिप्रेत आहे कि, ह्यांनी त्यांचे मिशन राबवायला ऑलरेडी सुरुवात केलीय का ?
त्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे वाटते

१) प्रगत देशांची ही पडद्यामागची मूळ भूमिका आणि त्यांच्या वागण्यातील जागतिक पटलावरील राजकीय दुटप्पीपणा !

२) विविध विषाणूजन्य नवीन आजार आणि त्यांच्यामुळे होत असलेले मृत्यू हासुद्धा ह्याच पॉलिसीचा भाग असू शकतो का ?

३) वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स अधिकाधिक अत्यानुधिक करणे आणि निवडक देशांच्याच हातात त्याची दोरी ठेवणे ह्यामागे ह्यांची दाखवत असलेली विचारधारा फसवी असू शकते का ? आणि जागतिक महायुद्धात ह्यांचा वापर करताना असे देश नैतिकता सोडून कसे युद्ध करतात ( क्लस्टर बॉम्बचा अफगाणिस्तान मधील वापर इत्यादी)

४) हार्प ( HAARP ) चा वापर करून इतर देशांमध्ये वरकरणी नैसर्गिक उत्पात घडवत असे युजलेस ईटर्स संपवणे खरोखर चालू असेल का ?

५) ह्यात भारत काही मार्ग काढू शकतो का ? काढू इच्छित असेल तर काय करू शकतो ? काय करावं ?

Group content visibility: 
Use group defaults

एन डब्लु ओ चे खरे खोटे माहित नाही पण या जगात खालील प्रकारची लोकं असतात.
१. त्यांना सतत कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत आहे असे वाटत असते.
२. त्यांना प्रत्येक घडलेल्या घटनेमागे खर्‍या कारणापेक्षा प्रत्यक्षात भलतेच कारण असल्याचा ठाम विश्वास असतो
३. त्या कारणाची सत्यता सिद्ध करण्यासाठी ते अचाट कार्यकारणभाव शोधून काढतात.
४. सर्व देशाची सरकारे हे मूठभर (खरेतर काही विशिष्ट कुटूंबे) धनदांडग्यांच्या हातचे बाहुले आणि आपण अदृश्य वेठबिगार आहोत असे वाटत असते.
५. कुठे तरी एक कंपू जगातल्या सगळ्या घटना घडवून आणतो असे त्यांचे ठाम मत असते.
६. जगात एलियन आहेत व त्यांच्याशी ह्या कंपूचे संबध आहेत असे त्यांना वाटते, त्या एलियन्सनीच यांना नवनवीन तंत्रज्ञान पुरवले असा यांचा विश्वास असतो.
७. आपल्यापासून खूप म्हणजे खूप गोष्टी लपवून ठेवल्या जात आहेत असे त्यांना वाटते.
८. नेहमीच्या पद्धतीने जगण्यात त्यांना रस नसतो, म्हणजे नोकरी करणे, कामे करणे, पैसा कमावणे. नैसर्गिक बेबंदशाहीची त्यांना ओढ असते, त्यात जबाबदारी नसल्यामुळे मुक्त जीवन जगता येईल असे त्यांचे मत असते.
९. अराजक, निर्नायक, सत्ताहीन, सीमाहीन, लष्करहीन, युद्धविरहित, पैसाविरहित जग असावे अशी यांची स्वप्ने असतात.
१०. ही लोकं प्रचंड बुद्धिमान असली तरी रुढार्थाने आळशी, कर्तृत्वहीन, मनाचे कमकुवत असतात. जगाच्या वेठबिगारी व्यवस्थेमुळे इच्छा नसून आपल्यावर कामाची सक्ती होते पण तेवढे करुनही आपल्याला जे सुखी आयुष्याचं स्वप्न दाखवले जाते ते मिळत नाही म्हणून हे जगावर नाराज असतात.
११. खूप पैसे कमावणे, गरजेपेक्षा जास्त संपत्ती, धनदौलत, गाड्याघोड्या, ऐशोआराम मिळवणे हे ह्यांना फालतू वाटते, हीच ती गाजराची स्वप्ने असतात ज्यामागे धावत लावून कोणीतरी आपल्याला गाढवासारखं राबवून घेईल असे त्यांना वाटते, त्यामुळे नोकरी, व्यवसाय करण्यातून यांचे मन उठते, सतत चळवळीच्या मूडमध्ये असतात, पण आंजावर या विषयाशी संबंधित वेबसाईट्स धुंडाळण्याव्यतिरिक्त, व भरमसाठ माहिती डोक्यात कोंबून घेण्याव्यतिरिक्त यांच्याकडून काही होत नाही. गरजेपेक्षा जास्त संपत्ती कशी वाईट याबद्दल हे जगाला ज्ञान शिकवत असतात खरेतर आळशी, इन्कॉम्पिटंट असल्याने यांना त्यासाठी लागणारे खूप काम टाळायचे असते.

या आणि अशा प्रकारच्या लोकांचा एनडव्लुओ वगैरे गोष्टींवर विश्वास चटकन बसतो, त्याबद्दल अधिकाधिक माहिती ते गोळा करत असतात. ती माहिती म्हणजे प्रत्यक्षात यांच्यासारख्याच लोकांनी अचाट बुद्धीने कार्यकारणभाव लावून निर्माण केलेली माहिती असते. ज्याचे पुरावे हे स्वतः कन्फर्म करु शकत नाहीत, पण मानसिकता तशी असल्याने लिहिलेले ते सर्व सत्य समजतात, व मनाशी पटवून घेतात.

यांनी अशा मानसिक अवस्थेत राहिल्याने बाकी जगाचे प्रत्यक्षात काहीही बिघडत नाही, यांचे स्वत:चे आयुष्य मात्र दरिद्री, क्लेषकारक, दु:खी होत जाते. व त्यामुळे ते जे विचार करत असतात त्यावर त्यांचा अधिकाधिक विश्वास बसत जातो, हे एक विषारी चक्र आहे. यातून मनाचे आजार उद्भवू शकतात.

---------------------------------------------------------------------
वरील परिच्छेद धाग्याच्या विषयाशी संबंधित आहे, कृपया कोणी वैयक्तिक घेऊ नये. विषयाबद्दल चर्चा केल्याने आपण वरिल लोकांपैकी समजले जाऊ असा विचार मनात आणू नये. मात्र वरील पैकी काही गुण आपल्यात असतील तर धोक्याचा इशारा लगेच ओळखावा व सावध व्हावे.

काय की, तुमचा अशा वागण्याने जगाला, न्यु वर्ल्ड ऑर्डरला, एलियन्सना, सरकारांना, धनदांडग्यांना, विशिष्ट कुटूंबांना शष्प फरक पडत नाही, फक्त तुम्हाला स्वतःला पडेल व त्याचे कारण तुम्हाला कोणीही सांगायला येणार नाही, तुम्हाला समजणारही नाही.

श्री नानाकळा ह्यांनी छान मुद्दे मांडले आहेत पण धाग्याचा उद्देश् सायन्स संबधी जोडून विचार जाणून घ्यायला अधिक आवडेल जसे की प्लेग मध्ये अनेक प्रसंगी मुद्दाम घडवून आलेले लाखो लोकांचे बळी तसेच एंथ्रेक्स ईबोला व्हायरस इत्यादी आणि निकोल टेस्ला ह्यांच्या विज्ञाननिष्ठ earth oscillator सारखे प्रयोग ह्यांची सांगड घालता संशय बळावतो. nwo ही कॉन्सपिरसी थिअरी असली आणि गूगलवरील सर्वच माहीती खरी नसते हे मान्य करूनही इतिहास थोड़े वेगळे सांगतोय. Haarp प्रोग्राम आता काही छुपा राहिलेला नाही आणि होलोग्राफि इल्युजनने सामान्य लोकांना भरकटवणे हेसुद्धा इंटरनेटवर पाहतो. तसेच माइंड कण्ट्रोल हे एक नवीन सायन्स युद्धात वापरले जात असेल तर ते जास्त कलाटणी देणारे ठरू शकते.

खायला काळ, भुईला भार, जगातले रिसोर्सेस उगाच वाया घालवणारे लोक आहेत, फक्त ते नक्की कोण? हे ठरवणार कोण?

माझे मला सतत वाटत रहाते की माझे आयुष्य आता संपले तर जगाचे बरेच होईल, वाईट काहीच नाही. पण इतर लोकांना स्वतःबद्दल तसे वाटत नाही. त्यात पुनः मनुष्यहत्त्या हे तसे बरेच धर्मात निषिद्ध आहे. त्यामुळे जे अनेक लोक खरेच मरू इच्छितात (कारण बरे न होणारे, अत्यंत कष्टदायक रोग झालेले, आपला सर्व भार इतरांवर पडल्याने (बहुधा आपले स्वकीयच) इतरांचे जीवन कठीण होते आहे ज्यांना वाटते) त्यांना सुद्धा डॉक्टरच्या मदतीने स्वतःचे आयुष्य संपवण्याची परवानगी अमेरिकेत नाही (आता आहे म्हणतात ओरेगॉन मधे, पण स्वतःहून तिथे जाणारे फार थोडे).

एक लक्षात ठेवा - हा प्रश्न किसिंजर च्या खेरीज बर्‍याच भारतीयांना देखील पडला होता, विशेषतः भारतातील लोकांबद्दल. तेंव्हा काँप्युटर नव्हते,
भारतात मनमोहन सिंग ने आर्थिक क्रांति केली नव्हती! पण आता पहा - किती लाख भारतीय जगभर पसरून त्यांना आणि इतरांना अत्यंत उपयुक्त जीवन जगताहेत. आज कितीतरी भारतीयांना स्वतःचे नि इतरांचे आयुष्य उपयुक्त करण्याची संधि आहे. पन्नास वर्षांपूर्वी शिकल्या सवरल्या लोकांना सुद्धा भारतात चांगले जीवन जगणे कठीण होते, म्हणून तर सगळे परदेशी पळून गेले. शिकण्यासाठी गेले नि परदेशीच राहिले. खूप उपयुक्त जीवन जगताहेत. आज भारतातहि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या विषयात उच्च शिक्षण मिळण्याची सोय आहे, त्यासाठी परदेशी जायला नको.

तर ही परिस्थिती जशी भारतात उत्पन्न झाली तशी उद्या इतरत्रहि होईल, लोक चंद्रावर, मंगळावर जातील कुणि यूजलेस ईटर्स उरणार नाहीत.

एक धोक्याची सूचना - किसिंजर अत्यंत कारस्थानी माणूस आहे. त्याचे ऐकू नका. त्याला सगळे भारतीय युजलेस वाटत होते, बांगला देश युद्धाच्या वेळी त्याने सैन्य पाठवायची तयारी केलीच होती - रशियन लोकांनी त्यांना पळवून लावले. तसेहि अमेरिकन लोकांना शेवटी सगळ्या जगातली संपत्ति स्वतःकडे असावी असेच वाटत असते नि इतर सर्वांना,विषेशतः सर्व मुस्लिम, हिंदू नि इतर लोकांना मारून टाकावे किंवा ख्रिश्चन करावे असेच त्यांना वाटते.

तेंव्हा उचला ते बोट अणूशस्त्रावर ठेवलेले.

मी तर सिलेक्टिव ब्रिडींगच्या बाजूचा आहे.युजेनिक्स जरी आउटडेटेड झाले असले तरी मला अपील होते.लोकसंख्येतून हेल्दी ,उंच,बुद्धीमान,आकर्षक ,रॉबस्ट असे स्त्री पुरुष निवडावे व त्यांनाच फक्त ब्रिडींगचा अधिकार असावा.निरक्षर ,किडमिडे ,कमीबुद्धीमान अनाकर्षक यांचा तसाही घराला ना दाराला कसलाच उअपयोग नसतो.

मग आर्टिफ़िसिअल इंटेलिजन्स वापरून बनलेले रोबो आणि असे जेनेटिकल सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचा मानव वंश - ह्यात कोण उजवे ठरू शकते ? असा प्रश्न आहेच कि !!

मी तर सिलेक्टिव ब्रिडींगच्या ..................निरक्षर ,किडमिडे ,कमीबुद्धीमान अनाकर्षक यांचा तसाही घराला ना दाराला कसलाच उअपयोग नसतो.

पण हे सगळे ठरवायचे कुणि की चांगले कोण नि कोण नाही? बरेच धंदे असफल झाल्यावर एखादा धंदा जमला नि माणूस खूप श्रीमंत झाला, मग त्याने इतर लोकांना बरीच मदत केली, नोकर्‍या लावून त्यांना उद्योगशील बनवले अशी उदाहरणे आहेत.
दुसरे असे की हे सिलेक्टिव्ह ब्रीडींग करून जन्माला घातलेले लोक मोठे झाल्यावर काम करतीलच, याची काय खात्री? तेच युजलेस झाले तर काय?

जाऊ द्या झाले वेळ जात नाही म्हणून काही तरी लिहायचे. हे काय युजफुल लिव्हिंग झाले?