किरण माने प्रकरणाबद्द मला जे थोडेफार कानावर आहे ते असे की स्टार प्रवाह चॅनलवरच्या मुलगी झाली हो या मालिकेच्या शूटींगदरम्यान सेटवर काहीतरी घडले. त्यात महिला कलाकारांतर्फे प्रामुख्याने प्रामुख्याने श्रावणी पिल्ले , कविता म्हापसेकर आणि मूणाल देव यांच्या तक्रारींमुळे किरण माने यांना वाहीनीने काढून टाकले आहे. तर माने म्हणतात की त्यांनी सोशल मीडीयावर राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना काढून टाकले.
वरील माहीतीत काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा.
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो. मग तेव्हापासून मी या केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकण्यास आणि त्याच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा क्रमही सुरू झाला, अगदी 2014 मध्ये हे प्रसारण केंद्र बंद होईपर्यंत.
खूप लहान असताना गावी गेलो होतो. चुलते वगैरे गावी असायचे. एकदा काकाच्या ग्रुपबरोबर तालुक्याच्या गावी सायकलवर गेलो होतो. या ग्रुपला तालुक्याचे जुने थिएटर पाहून सिनेमा बघायची हुक्की आली. तेव्हां गावी मनोरंजनाचे एकच साधन होते. ग्रामपंचायतीच्या आवारातला टीव्ही. त्तालुक्याला भारतभर भ्रमण करून शिळे झालेले सिनेमे यायचे. सिनेमाचं नाव अमानुष होतं. हिरो कोण हे कुणालाच माहिती नव्हतं. पण पिक्चर बघायचा ही हौस दांडगी असल्याने हिय्या करून सगळे एकदाचे घुसले.
डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रहण ही वेबमालिका प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालेली आहे.
जरी ही मालिका एका कादंबरीवर आधारीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंग्यांची पार्श्वभूमी या मालिकेला आहे. १९८४ मधे दिल्ली, कानपूर आणि बोकारो इथे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत लहान मुले, बायका, वृद् आणि तरूण पुरूष या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
सोशल मीडिया हा आजच्या जगात एक प्रभावशाली माध्यम असून समाजातील कुठल्याही घटकासंदर्भात बदल घडवून आणण्याचं साधन म्हणूनही याकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत लैंगिक अल्पसंख्याक समुदायासाठी सोशल मीडिया म्हणून अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो आहे आणि अशा समुदायातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला लागले आहेत. समाजाकडून त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्या अशा व्यक्त होण्यामुळे आपल्यालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत.
सध्या मी whatsapp चे स्टेटस बघणं टाळलंय.
परंतु आल्या मेसेजला उत्तर देण्याचं पथ्य मात्र पाळलंय.
अवघड झालंय जगणं अन खडतर झालाय प्रवास.
प्रत्येक रात्रीवर उधार पडलाय उद्याचाच श्वास.
फोटो कुणाचा हे बघण्याआधी, आधी खाली पहावं लागतं
फुलं असतात दोन्हीकडे, तिथलं म्हणणं मात्र समजून घ्यावं लागतं.
पहिली जरा थंडावताच दुसरी लाट आली.
उमलत्या सुखाच्या प्रवासात काटेरी वाट आली.
झाला कुणाचा जन्म अन ओढवलं कुणाचं मरण
शेवटी नशिबाच्या सोंगटीवर एकजात सारे शरण.
कुठला वर्ण कुठला देश कुठला जात अन धर्म
माणसाशी माणूस म्हणून वागण्यातच माणुसकीचे मर्म.
राजकारण्यांना 'काय बोलायचं आता' हा मूर्ख प्रश्न कधीही सतावत नाही.. ते लोक अनंत काळापर्यंत ऐसपैस बोलत राहू शकतात..!
पण मिडीयावाल्यांचे मात्र फारच हाल होतात ..!
कारण दिवसभराचा मुबलक वेळ आ वासून उभा असतो.. आणि दळत रहायचं म्हटलं तर हाताशी पुरेसा कंटेंटही नसतो..
मग काय करणार..! वाक्यांची लांबी वाढवण्याचा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून, वाक्यामध्ये बिनकामाचे शब्द
घालून घालून, नेमून दिलेली वेळ मारून न्यावी लागते बिचाऱ्यांना..!
देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.
अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे.