गरीबी

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2017 - 18:49

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक

सविस्तर बातमीची लिंक - http://www.loksatta.com/desh-videsh-news/india-down-45-ranks-since-2014-...

साल २०१४ - भारत ५५ व्या स्थानापर्यंत आलेला.
साल २०१७ - भारताची थेट १०० व्या स्थानावर घसरण झाली आहे.

कसे ठरवतात हा ग्लोबल हंगर ईंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांक याचा थोडा शोध घेतले असता खालील चार निकष सापडले.

विषय: 
शब्दखुणा: 

एकटेपणा

Submitted by संतोष वाटपाडे on 11 November, 2014 - 01:47

दिवसभर काबाडकष्ट करुन
काळवंडलेल्या चेहर्‍याला न पुसता
वांझोट्या चुलीकडे बघत बघत
भकास स्वप्ने पदरात घेणारी रात्र
उपाशीपोटीच कोसळलेली असते
दगडांच्या फ़ाटलेल्या अंथरुणावर

निर्वाणाच्या आशेनं धावत सुटणारे पाय
स्वतःची दमछाक करुन सताड पसरतात
मोकळे श्वास घेण्यासाठी
तेव्हा सारं जग ज्यांच्या खोलीत दिसावं
अशा टाचांवरच्या भेगा
अंधार गडद गडद होत असताना
हळूहळू बाहेर येऊ लागतात
पिळवटलेल्या आतड्य़ाना मोकळीक देण्यासाठी...

अंधाराचं छद्मी हसणं कानाला झोंबत असतं
तीक्ष्ण बाणांसारखं खोलवर
तेव्हा अगतिकता पसरत जाते
थरथरणार्‍या अशक्त कायेवर
चिंध्या झालेल्या दुलईसारखी...

आकांत

Submitted by संतोष वाटपाडे on 6 August, 2014 - 00:54

पेटली दिव्याची वात जाहली रात कधीची काळी
कानात गुंजते दूर अशी बेसूर कुणाची हाळी
पेरून थेंब डोळ्यात झोंबते रात रिकाम्या पोटी
हुंदके दाबुनी खोल जराशी ओल लागते ओठी...

झोपड्यात खुरटे श्वास खुळा विश्वास झोपला आहे
मोडक्या छतावर घास कुण्या देवास ठेवला आहे
आलीत वादळे जरी मनाने तरी दडपली भीती
घेऊन तनी आभाळ मनाचा जाळ पसरली माती....

सळसळ होता वार्‍यात थांबली रातकिड्यांची नांदी
ढेकळामधे रंगते कधी भंगते नभाची मेंदी
अंधार दाटला फ़ार वादळे गार धावली रानी
डोळ्यात असा आकांत नदीतुन शांत चालले पाणी.....

तळपेल सुर्य अंबरी कधी भूवरी तेज सांडावे
नाहीच मिळाला भाव रडीचे डाव तिथे मांडावे

अंगाई

Submitted by संतोष वाटपाडे on 22 July, 2014 - 21:31

मेढींतुन नाद किड्यांचा कानावर हलका येतो
दारावर वारा कातर का गीत उदासिन गातो
मातीत बुजवली स्वप्ने केलीत उशाशी गोळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा

गवताच्या पाचोळ्याचे हे छप्पर हसते आहे
पेटली कधीची नाही ती चूल धुमसते आहे
मी पेज पिठाची देते तू नको करु कंटाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा

झोपडि ही माळावरची रात्रीत उगा थरथरते
तुटलेली जुनाट खिडकी लावली तरी करकरते
अंधार भयानक पडता टिटवीला सुचतो चाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा

बरडावर असेल नक्की जित्राब कुणाचे मेले
चवताळून पिसाट कुत्रे परसातुन भुंकत गेले
घाबरु नको थोडाही तू झाक अता रे डोळा

शब्दखुणा: 

अन्न सुरक्षा कायदा आणि रेशनींग PDS (Public Distribution System)

Submitted by विवेक नाईक on 28 February, 2014 - 07:41

२७ फेब्रुवारीच्या टाईंम्सला आलेली बातमी,

Govt spends Rs 3.65 to deliver Re 1-worth food; 57% of subsidized food doesn't reach beneficiaries (सरकार १ रू किंमतीचे अन्न वितरीत करण्यासाठी रू ३.६५ खर्च करते; सबसिडीच्या अन्नापैकी ५७% अन्न त्यांच्या खर्‍या लाभाधिकार्‍यांपर्यंत (गरीबांपर्यंत) पोचत नाही)

सरकारने नेमलेल्या संस्थेने केलेल्या पहाणी मध्ये अश्या बर्याच बाबी पुढे आल्या आहेत, उदा ,

१) ३६% अन्न धान्य हे PDS मधुन काढून घेतले जाते.
२) शासकीय अधिकार्याच्या आपसातील co-ordination च्या आभाव हा सर्वात मोठा अडथळा आहे.

Subscribe to RSS - गरीबी