राजकारण

बुलेट ट्रेन ची गरज आणि आम्ही !

Submitted by रमेश भिडे on 4 December, 2019 - 10:57

२००९ साली औरंगाबाद आणि जालन्याचे काही उद्योजक चीन भेटीला गेले होते. त्यात मी देखील होतो. बीजिंग शांघाय गुनझावच इन्फ्रास्ट्रक्चर बघून आमचे डोळे अक्षरशः फाटले होते.

लकीर के इस तरफ महत्वाची डॉक्युमेंट्री

Submitted by सखा on 2 December, 2019 - 14:30

लकीर के इस तरफ (२०१९)
लेखन/दिगदर्शन: शिल्पा बल्लाळ  
वेळ : ८९ मिनिट   
IMG-20191114-WA0013.jpg

महाराष्ट्रातील चाणक्य...शरदचंद्र पवार

Submitted by सचिन पगारे on 30 November, 2019 - 05:57

एखाद्याने राजकारणात जर काही मुत्सद्दीपणा दाखवला की त्याला 'चाणक्य' असे समजण्यात येते. अर्थात चाणक्य हे पात्र खरे की खोटे यात न जाता जर ह्या उपाधीचे खरे हकदार जर महाराष्ट्रातील राजकारणात कुणी असतील तर ते शरद पवार साहेब यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही

निवडणुकीपुर्वी राज्यात राष्ट्रवादीची स्थिती ही अत्यंत कमजोर होती. भाजपाने पक्ष फोडायचा सपाटा लावला होता. जवलपास २५ मातब्बर नेते पक्ष सोडुन गेले. स्थानिक नेत्यांनीही हवेचा रोख बदलुन भाजपात प्रवेश केला.

विषय: 

महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

विषय: 

अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज )

Submitted by हस्तर on 26 November, 2019 - 06:04

अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज )

नुकत्याच मिळाल्या बातमीनुसार
अजित पवार ह्यांनी उमु आणि देवेंद्र ह्यांनी मामू पदाचा राजीनामा दिला
अजित पवार छातीत दुखते म्हणून रुग्णालय भरती
सोनिया गांधी ह्यांनी काँग्रेस गट नेत्या पदाचा त्याग केला
अभिजीत बिचकुले ह्यांनी राजकारण सन्यास घेतला
राहुल गांधी ह्यांच्याकडे कुठेलेच पद नसल्याने ते आधी काँग्रेस अध्यक्ष पद घेणार मग सोडणार
शरद पवार ह्यांनी दुसरा पर्याय जमणार नसल्याने तंबाखू गुत्य्ख्याचा त्याग केला

विषय: 

माननीय श्री मुख्यमंत्र्यांना टरबूज बोलल्यावर तुम्हाला राग येतो का?

Submitted by बोकलत on 24 November, 2019 - 23:27

आपले माननीय मुख्यमंत्री हे खूपच मनमिळावू स्वभावाचे आहेत, तसेच ते खूप मेहनतीने काम करताना दिसतात. परंतु त्यांची मेहनत झाकोळली जाते. अनेक लोकं त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून त्यांना टरबूज, टरबूज्या अशी नावं ठेऊन त्यांचा अनादर करत असतात. परवाचीच गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमध्ये एकजण बोलत होता की त्याच्या बायकोला मुख्यमंत्री दिसले की टरबूज ज्यूस प्यायची इच्छा होते. घाईघाईने शपथविधी उरकला त्या दिवशी सकाळी सकाळी बायकोने त्याला ज्यूस आणायला पिटाळले. तर आपल्या मुख्यमंत्र्यांना अशी नावं ठेवणं योग्य आहे का?

विषय: 

चाले पोर खेळ

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 November, 2019 - 12:55

***********
चाले पोर खेळ
अवघा गोंधळ
श्रीदत्ता सांभाळ
पोराशी या
लबाड नाठाळ
करी चळवळ
हट्टांचे केवळ
मुर्त रुप
म्हटले तो पोर
म्हटले तो थोर
सहजीच चोर
होतो परि
त्याला हवा खावू
सारा गोड गोड
तया साठी धाड
घाली कुठे
देवून थकलो
सांगुन दमलो
कधी रागावलो
व्यर्थ पणे
करी ते सज्ञान
देई काही भान
जगाचे कल्याण
घडो मग
विक्रांत उगाच
करी हळहळ
जर सुत्रधार
अवधुत
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

शब्दखुणा: 

महाराष्ट्रातील राजकारणात नितीमत्ता लयास गेली का ॽ

Submitted by ashokkabade67@g... on 23 November, 2019 - 10:19

कालपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा तीचा सुटला आणि आजच्या वर्तमानपत्रात ठाकरे मुख्यमंत्री होणार ही हेडलाईन्स जनता वाचत असताना मिडीयाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी दाखवायला सुरुवात केली आणि प्रत्येक दैनिकाची हेडलाईन्स अक्षरशः खोटी ठरली खरं तर या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हायला काही हरकत नाही कारण महाराष्ट्रातील साऱ्याच दैनिकांच्या बातम्या खोट्या ठरण्याची जगातिल कदाचित पहिलीच घटना असावी.आणि ही घटना घडवण्यासाठी कारणीभूत कोण असावा तर जनतेसमोर नितीमत्ता आणि आदर्शाच्या बढाया मारणारा भाजप नावाचा खोटारडा पक्ष आणि ज्या पक्षाच्या जीवावर निवडून आला त्याच पक्षाच्याच नव्हे

Pages

Subscribe to RSS - राजकारण