माझा भारत देश
सारे जहाँ से अच्छा असा हा माझा भारत देश
नानाविध संस्कृती एकत्र नांदणारा एक समृद्ध प्रदेश
अनेक ऐतिहासिक, भौगोलिक घटकांचा असे हा उन्मेश
कविकल्पित भासो अशा वैविध्यतेने नटलेला माझा भारत देश
जगात शांततेचे पुरस्कर्ते अशी आपली ख्याती
मनात वैर ठेवणाऱ्या शेजारी राष्ट्राशीही जपली नाती
मैत्रिपूर्ण हात सदैव पुढे केला न ठेवता मनात कुठलाही द्वेष
थोरल्या भावाप्रमाणे कठोर परंतु क्षमाशील भूमिका घेणारा माझा भारत देश
आपापल्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी वाढवली देशाची शान
"प्रगतीबरोबर सर्वांगीण विकास" या आपल्या पद्धतीचा आम्हा अभिमान
ओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-