विज्ञान

विज्ञान जगतातील बातम्या आणि घडामोडी

Submitted by मामी on 13 April, 2022 - 02:00

जगातील आणि भारतातील विज्ञान जगतात घडणार्‍या घडामोडी, संशोधन, प्रयोग, शोध आणि इतर बातम्या या संबंधित नोंदी आणि चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

विज्ञानाची ऐशीतैशी

Submitted by जिज्ञासा on 28 February, 2022 - 09:46

आज विज्ञान दिन. जेव्हापासून जॉर्ज मॉनबियोंचे The Invisible Ideology हे भाषण ऐकले आहे तेव्हापासून भांडवलवाद, नवउदारमतवाद, आणि उपभोक्तावाद यांचा आणि विज्ञानाचा कसा परस्पर संबंध आहे हे उलगडून बघण्याचा छंद लागला आहे. यामधून काही नव्या जाणिवा झाल्या त्यातील दोन ठळक जाणिवा या लेखात मांडणार आहे. शीर्षक “विज्ञानाची ऐशीतैशी” असे देण्याचे कारण या दोन्ही जाणिवांनी मला विज्ञानाच्या आकलनात घडणाऱ्या वा घडविल्या जाणाऱ्या चुका किती महाग पडू शकतात हे लक्षात आलं.

काळप्रवास!?

Submitted by अपरिचित on 19 February, 2022 - 09:57

काळप्रवास (टाईम ट्रॅव्हल) ही संकल्पना मला नेहमी उत्कंठावर्धक वाटते तर कधी कधी गमतीशीर वाटते.

शब्दखुणा: 

भूत फक्त रात्री का दिसते ?

Submitted by गारंबीचा शारूक on 13 February, 2022 - 00:57

जुन्या चाळीत असताना कधी कधी रात्रीचे भूताखेताचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही.
पण काही काही लोक खोटं बोलत नाहीत हे माहिती होतं. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहीती होतं. असे लोक पण जेव्हां भूताचे अनुभव सांगायचे तेव्हां त्यांना खोटं ठरवणं बरोबर वाटायचं नाही.

शब्दखुणा: 

आमच्या पूर्वजांना सग्गळं माहिती होतं का?

Submitted by भास्कराचार्य on 19 October, 2021 - 08:31

'गणितामध्ये भारतीयांचा वाटा नेहमीच सिंहाचा राहिला आहे' अश्यासारखी वाक्यं लहानपणापासून आपण ऐकत, वृत्तपत्रांमध्ये वाचत आलो आहोत. भारतीय लोक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यामुळे पुढे आहेत, ही बाब आपल्या मनावर ठसली आहे म्हणा ना! शून्याचा शोध आपल्याकडे लागला, हेही आपण रास्त अभिमानाने सांगतो. त्यातून पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांना सग्गळं सग्गळं ठाऊक असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स आपण नित्यनेमाने बघत असतोच. 'अमुक नावाच्या अक्षरांमध्ये ५ मिळवा, मग २ ने गुणा' इ. इ.

विषय: 

खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे?

Submitted by aschig on 15 September, 2021 - 16:59

लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?

एका आय. सी. यू . मधल्या डॉक्टरचे मनोगत .....

Submitted by palas on 24 April, 2021 - 10:23

एका आय. सी. यू . मधल्या डॉक्टरचे मनोगत

मी प्रथम वर्षाची निवासी डॉक्टर आहे.

मी आजपर्यंत पाहिलेला पहिला मृत्यू 30 मार्च 2021 रोजी झाला - आदल्या रात्री एक कोव्हीड रूग्ण आमच्या आयसीयूमध्ये दाखल झाला. त्याची प्रकृती चिंताजनक होती, परंतु तो केवळ 40 वर्ष्यांचा होता, मला वाटले की तो त्यातून वाचेल. पण दुसर्‍याच दिवशी त्याचा मृत्यू झाला - मी सुन्न झाले.

शब्दखुणा: 

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा .... 7

Submitted by राजा वळसंगकर on 7 April, 2021 - 10:30

13 मे रोजी दु. 12:31 वा. पुण्यात तुमची सावली "गायब" होईल!
Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे ती बघा.
**************************

दोन चंद्र

Submitted by वावे on 27 February, 2021 - 14:00
moon

कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ’हा चंद्र’ नावाची. त्यात ते म्हणतात,
"त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते"

’हा चंद्र’ म्हणजे आपल्याला नेहमी आकाशात दिसतो, तो. लहानपणी गाडीतून जाताना आपल्यासोबत पळणारा, पण गाडी थांबली तर पुढे पळून न जाता आपल्यासाठी थांबून राहणारा. मोठेपणी ’चंद्र आहे साक्षीला’, ’ एकसो सोला चॉंद की रातें’ वगैरे ओळींची आठवण करून देणारा.

’तो चंद्र’ म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वीभोवती सत्तावीस दिवसांत एक, अशा प्रदक्षिणा घालत राहणारा, सूर्याच्या सोबतीने समुद्रात भरती-ओहोटी घडवणारा, कधी सूर्यालाच ग्रहण लावणारा.

शब्दखुणा: 

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (शेवटचा भाग ४३ - वादळ शांत)

Submitted by निमिष_सोनार on 30 October, 2020 - 08:16

भाग ४२ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77150

शेवटचा भाग ४३ - वादळ शांत

खंडाळ्याला घाटात सिग्नल नव्हतं म्हणून एका ट्रेनला थांबावं लागलं. खिडकीतून लहान मुलांना झुडुपांवर माकडं दिसत होती. खाली खोल दरी होती. एका लहान मुलीने आपल्या हातातले केळ देण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिच्या वडिलांनी तिला रागावून थांबवलं.

"ए हात बाहेर नको काढूस! दुरून फेक केळ त्याच्याकडे!"

"ठीक आहे पप्पा!"

Pages

Subscribe to RSS - विज्ञान