आव्हान

द्वेष : एक भय गूढकथा, भाग ७

Submitted by प्रथमेश काटे on 22 February, 2024 - 11:17

प्रिया रागारागाने ताडताड पावलं टाकत रूममध्ये आली. आणि तिने सरळ आपली बॅग भरायला घेतली.

" प्रिया.. प्रिया थांब. काय करतीयेस ? " तिच्या पाठोपाठ घाईघाईने खोलीत येत सोनालीने विचारलं.

" मी जाते आहे." प्रिया.

" अगं कुठे जाणार आहेस ? "

" कुठे म्हणजे ? माझ्या घरीच. मला माझ्या पपांना भेटायचं आहे. मी दुखावलं त्यांना. " प्रिया भावूक होत म्हणाली. " आजही रात्री येतील ते‌ नक्की मला भेटायला.

" प्रिया अगं अशी अविचाराने घाई करू नकोस. तुला काही माहित नाहीये. तिथे धोका आहे."

शब्दखुणा: 

आव्हान

Submitted by मी_अनामिक on 3 July, 2019 - 12:24

संपव तु वटवृक्षाच अस्तित्व माझं
तरीही लहानस बीज होईन म्हणतो...

गाड मातीत मला क्रूरतेने
होऊन अंकुर इवलसं उगवीन म्हणतो...

कर आभाळाचे घाव तू
पोलादी छातीवर झेलीन म्हणतो...

घेऊनी त्यांनाच पदाखाली
तयावर उभा राहीन म्हणतो...

उधळले कैक हजार डाव जरी तू
आणिक एक खेळीन म्हणतो...

पडेन कितीदा मोजणार नाही
नेटानं पुन्हा उभा राहीन म्हणतो...

काट्या-कुट्यांच खाच-खळग्यांच घेणं नाही
त्याच पथावर अविरत चालीन म्हणतो...

असशील तू विधीलिखित जरी
तुलाच आव्हान देईन म्हणतो...

भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

पुस्तक परिचय: आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

Submitted by नरेंद्र गोळे on 12 May, 2014 - 23:29

मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे.

चंद्रशेखर जोशी
दत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०

Subscribe to RSS - आव्हान