जन पळभर करतिल हाय हाय
भा रा ताम्ब्यान्ची क्षमा मागून _/\_
जन पळभर करतिल हाय हाय
(एका मुम्बई लोकल मध्ये ऑफीस गर्दीच्या वेळी प्रवास करणार्या चाकरमान्याच्या मनस्थितीचे वर्णन)
(डब्यात चढण्या पूर्वीच्या स्थितीचे वर्णन)
जन पळभर करतिल, 'हाय हाय !'
(कुणी उद्धरतील हे आय माय)
डब्या शिरता खन्त काय ?
(डब्याच्या पॅसेज मधल्या स्थितीचे वर्णन)
कुणी ढकलतील, कूणी सरकतिल;
सारे अपुला मार्ग आचरतिल,
तसेच सारे खडे राहतिल,
असेच पन्खे बन्द राहतिल ?