जन पळभर करतिल हाय हाय

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

भा रा ताम्ब्यान्ची क्षमा मागून _/\_

जन पळभर करतिल हाय हाय

(एका मुम्बई लोकल मध्ये ऑफीस गर्दीच्या वेळी प्रवास करणार्‍या चाकरमान्याच्या मनस्थितीचे वर्णन)

(डब्यात चढण्या पूर्वीच्या स्थितीचे वर्णन)

जन पळभर करतिल, 'हाय हाय !'
(कुणी उद्धरतील हे आय माय)
डब्या शिरता खन्त काय ?

(डब्याच्या पॅसेज मधल्या स्थितीचे वर्णन)
कुणी ढकलतील, कूणी सरकतिल;
सारे अपुला मार्ग आचरतिल,
तसेच सारे खडे राहतिल,
असेच पन्खे बन्द राहतिल ?

लोक भान्डतिल, कर्ण पिकतिल,
रागाने या शिव्या वाहतिल
पुन्हा विजारी डाग उमटतिल,
पुन्हा पायावर हेच पाय ?

(आसनस्थ झाल्या नन्तरच्या स्थितीचे वर्णन)
सखेसोयरे घर्म पुसतिल,
स्कन्धी कुणीतरी (अपुले)शिर डकवतील
कुणी आपुले कोडे सोडवतिल
(कुणी फोनावर बडबड करतिल)
(कुणि फेसबूक कुणी वॉट्स अप वर)
किन्नर येतील, भिक्षुक रडतिल
माथे दुखता त्यांचें काय जाय ?

(लोक फलाटावर उतरतानाच्या स्थितीचे वर्णन)
स्टेशन येतील लोक उतरतिल !
लोक नवे ते आतच शिरतिल
खिश्या कुणाच्या फोन हरवतिल ?
शवर्लिक ते खिसे कापतिल ?
कां पसरवुं नये शान्‍तींत काय ?

---------------------------------------------------------------
मूळ गीत
जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जातां राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी कीं न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचें काय जाय ?

अशा जगास्तव काय कुढावें !
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शान्‍तींत काय ?

विषय: 
प्रकार: 

Dhanyawaad