मल्लिका

Vaccinated

Submitted by चिन्नु on 27 June, 2021 - 05:41

Vaccinated

झालं बाई झालं
झालं बाई झालं
आमचं पण एकदाचं
टुचूक करून झालं

तुमच्या भाषेत vaccinated झालो
त्यांना सांगायचं तर jabbed होऊन आलो!

स्लीवलेस घातलं की
म्हणायचे दंडाधिकारी,
Vaccine च्या वेळी बघा
कशी किंमत कळली खरी!

ठणकावून सांगितले मी
लगेच कुठे मिळणार शिवून
नवा कोरा ड्रेस आणला यांनी
तेव्हा दुकानात जाऊन

किती drive आले गेले
कुणी किती केली घाई
सगळ्या जाहीराती पाहिल्या
पण कुण्णा बधले नाही

तो

Submitted by चिन्नु on 19 June, 2021 - 23:29

तो

तो धावत राहतो सतत, ऊन वारा पित..
आवळलेल्या मुठीत दडलेला असतो कुटुंबाचा भार..
त्याच्या करारी नजरेला ओढ असते जिंकण्याची..
बंद ओठांमध्ये लपवलेल्या कितीतरी वेदना घेऊन तो परततो घरट्याकडे..
पिलं झेपावतात त्याच्या कडे, आईचा चिरपरिचित पदर सोडून,
त्याच्या भळभळणार्या जखमांना नाकारत मिठीत शिरतात..
अन् त्या रेशीम मिठीत विरघळू लागतं बापाचं प्रेम!

Happy Father's Day! __//\\__

लकेर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

प्रकार: 

मूठ

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

तुला काय?
तू पाठ फिरवून जाशीलही..
मग मी मला कसं आणि कुठंवर गोळा करू?
तुटल्या जीवाचे तार तार झाले..
भिनलेत सूर, कसे वजा करू?
सख्य नुरले वेड्या आसवांशी..
कसे आरश्याशी दगा करू?
खोल मूठ एकदाच ह्या जीवाची
कुठंवर श्वासांची निगा करू?
अस्तित्वाचा झगडा जिण्याशी
बोल मना तुला काय सजा करू?

प्रकार: 
Subscribe to RSS - मल्लिका