पालथा घडा आणि मी
.
(दुपारी जरा लवंडावं म्हटलं, तर इकडंही आले हुडका काढीत. फोटो काढायला, आढ्यावर.)
.
.
(दुपारी जरा लवंडावं म्हटलं, तर इकडंही आले हुडका काढीत. फोटो काढायला, आढ्यावर.)
.
एके दिवशी दिवसभराची भरमसाठ कामे उपसून वैतागल्या अवस्थेत उशिरा घरी परतत असताना, अगदी आणखी काहीही करायची इच्छा नसताना देखील, गाना.कॉम उघडून बघितले. त्यातल्या सुचवलेल्या चारपाच प्ले-लिस्टींमधून एक प्ले-लिस्ट यंत्रवत अशीच निवडली. आणि तिच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात परतीच्या प्रवासात ती लावली.
आमचे एक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. ते लय म्हणजे लईच भारी होते. ताडमाड भारदस्त व्यक्तिमत्व, तसलाच आवाज. छाप पाडणारे प्रकरण. दोन्हीही हातांनी वहीवर/फळ्यावर अगदी फास्टंफास्ट लिहायचे. फळ्यावर लिहिताना आपण फळ्याकडे तोंड करून लिहितो, तर हे वर्गाकडे तोंड करून उलट्या हातानेसुद्धा सरळ ओळीत फळ्यावर लिहू शकायचे. तिरके अक्षर आणि पल्लेदार फटकारे. कर्सिव्ह तर बघत र्हावे. त्यांच्या हाताच्या चिमटीत पेन एवढुसा दिसायचा. खडू दिसायचाच नाही.
स्वयंपाकघराच्या लहानश्या गच्चीत जमिनीवर साखरेसारखे पातळ काचेचे स्फटीक विखुरलेले दिसले. एक-दोनदा तिथे फिरकून दुर्लक्षही केले. पण थोड्या वेळात प्रमाण जरा जास्त दिसायला लागले. खाली वाकून, निरखून, तर्क करूनपण ते कशाचे असावेत, हे कळेना. ते कुठून पडले असावेत म्हणून वर उठता उठता छताच्या दिशेला मान वळवली आणि एकदम त-त-प-प झाले.
श्याम मनोहरांच्या एका पुस्तकात एक वाक्य होते- आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राक्षसी गुंड राहतोय हे समजलेय. मग आपली मनस्थिती नेमकी काय ठेवायची?
काल असाच मल्हारी मार्तंड शिनुमा आठवला.
मागच्या आठवड्यात एके दिवशी घरी गेल्या-गेल्या लेक मिठी मारून म्हणाली,
'बाबा, सोमवारी मला 'कल्मिनेटींग अॅक्ट'चे डायलॉग मिळणार आहेत !!!!!'
कल्मिनेटींग अॅक्ट म्हणजे यांच्या नवीन शाळेत बसवलेली छोटी छोटी नाटके किंवा पथनाट्ये.
मागच्या वेळेस "बाई मलाही डायलॉग देतील देतील" म्हणून खेळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. अगदी अॅमेलिया बेडेलिया नाही तरी रस्त्यावरची चिन्हे किंवा आग लागल्यावरच्या सूचनांचे कथन तरी मिळेल! पण शेवटच्या दिवसापर्यंत लागलेली आशा धुळीला मिळालेली. मग भाग घेतलेल्या वर्गमित्रांच्या गप्पांमध्ये सामिल होण्यावाचून हाती काही शिल्लक नव्हते.
खबरची बटणे. रंगीबेरंगी बटणे.
काल पुपुवर असाच बटणावरून टैमपास चालला असताना लहानपणी आम्ही खबरच्या बटणांनी खेळत असू ते आठवले. पुपुवरून वाहून जाण्यापूर्वी या प्रकाराची कुठेतरी नोंद राहील अश्या ठिकाणी हलव असे नंदिनीने सुचवले म्हणून ते इथे आणले. या रंगीबेरंगी बटणांना तुमच्याकडे दुसरे नावही असेल. लहानपणी फार आकर्षण असायचे यांचे. याला 'खबरची बटणे' हे नाव कुठून आले, देवच जाणे!
जलरंग वापरून केलेला हा प्रयत्न.
तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.