कविता

कविता

Submitted by मीन्वा on 15 August, 2023 - 02:25

कधी कविता भारंभार बोलतात
शब्दाला शब्द जोडतात
यमकांचे छंदांचे वृत्तांचे
अलंकार घालून सजतात
कधी एखाद्या नदीसारख्या,
ओसंडून वाहतात
कधी खळखळत, तर कधी संथपणे
कधी कधी कविता फुटतात
एखाद्या तुडुंब भरलेल्या धरणाचा
बांध फुटावा तशा
वेगात चिरत जातात कडे कपारी
आणि दगडालाही बोथट बनवतात
कधी कविता मोजकेच बोलतात
हिऱ्या मोत्यांसारखे शब्द गुंफतात
ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेतात
काही कविता मात्र... शब्दहीन
एक अक्षरही न बोलता
आपल्या आसपास वावरतात
मौनाची भाषांतरे कळणाऱ्या माणसांच्या

शब्दखुणा: 

खोली

Submitted by VD on 1 July, 2023 - 06:47

खोलीत आलो, दार बंद केलं,
की प्रवेश होतो माझा माझ्या अथांग जगात.

मावेल खिडकीत, इतके आकाश;
जाणवेल प्रतिबिंब, इतकाच प्रकाश

जरा चंद्र जरा सूर्य, काही तासांचे;
एखाद-दोन चांदणे, अनंत कल्पनांचे;

पाऊस थोडा, काचेवर ओघळणारा
कधी संथ कधी रुद्र, येतो जातो लहरी वारा

जागी स्वप्ने अनेक, अजूनही उश्याशी;
ओढण्यासाठी चादर एक एकांताची;

अस्ताव्यस्त भावना मांडलेली, एक मेज खोलीतली;
कोपऱ्यात धूळ जराशी, पुस्तकांच्या शब्दात माखलेली;

झकण्यास नग्नता, कपाटातील वल्कले,
भडक काही, बेरंग काही, काही स्वछ धुतलेले, काही चुरगळलेले;

गतिमान जग

Submitted by Arun Bhaud on 30 April, 2023 - 04:11
गतिमान जग

सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं!

'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं!
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो

विक-डेज ला गावं शहरांकडे पळतात...
अन विकेन्ड ला शहरं गावांकडे
मधे आहेत फक्त भरधाव धावणारे रस्ते...
अन त्यासाठी भरावे लागणारे टोल!

पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं तसंच, चहाच्या कपाखाली बंदीस्त

देहाच्या कविता

Submitted by चौबेजी on 27 March, 2023 - 23:29

संथ लयीच्या पठारावर
मध्येच एखादं टेकाड उगवावं
तसे हळूच हिंदकळणारे
चुकार श्वास...
थोडे शहारे टिपत
थोडे रोमांच पेरत
खिडकीतल्या गुलमोहरालासुद्धा
ऐकू जातील
न जातीलशा ठहरावात
एकमेकांच्या देहभर लिहिलेल्या
स्पर्शाच्या धिम्या कविता

पाऊले चालती फिटनेसची वाट|

Submitted by कृष्णा on 31 January, 2023 - 03:58

आज वाड्यातल्या गप्पांमध्ये फिटनेस साठी किती पावलं कोण चालते ह्यावर चर्चा सुरु असताना सुचलेले.
दत्ता पाटील यांनी लिहलेल्या, मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या 'पाऊले चालती पंढरीची वाट' ह्या अजरामर गीताचा आधार घेऊन रचलेले विडंबन.

शब्द तितकेसे जमले नसतील पण लिहले. Happy

पाऊले चालती फिटनेसची वाट |
साखर झोपेची तोडूनिया गाठ ||

पोएटचं हेड

Submitted by चौबेजी on 2 November, 2022 - 01:00

सिटीतल्या रोड्सवरून
पोएट भटकत जातो
तेव्हा टिपतो तो व्हेन्समधलं
कुठे वाहणारं कुठे गुठळलेलं ब्लड,
भिंतींमध्ये खोल एम्बेडलेला नॉईज,
सिमेंटच्या गॅप्समधून येणारा मल्टीलेयर्ड अरोमा,
स्कीनच्या पोअर्सना पाणी आणणारा सिटीचा फ्लेवर,
आणि पार्कापार्कांवर सेटल झालेली
अर्बनस्तानाची आफ्टरटेस्ट
पोएट टच करतो इतरांचे एक्स्पीरीयंसेस
आणि फील करतो स्वतःचे फीलिंग्ज

शब्दखुणा: 

आठवण

Submitted by sanjay_35928 on 10 May, 2022 - 04:57

नमस्कार मायबोलीकर,

पहिल्यांदाच लहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही चुकल्यास क्षमा असावी.

आठवण
आयुष्याच्या उत्तरार्धात सर्व आठवू लागले.
सुटून गेलेले क्षण आठवण म्हणून पहिले.

शब्दखुणा: 

अमौन !

Submitted by चैतन्य दीक्षित on 26 March, 2022 - 00:08

एका कवितेने
मला अमौनाची शपथ घातल्यापासून
मी एक वाहता झरा झालोय!
माझ्या उगमाशी असलेले बुद्बुद् शब्द,
त्या उगमापलीकडे असलेल्या
शाश्वताचा अर्थ
थेट संसारसागरापर्यंत
अनेक वाटांनी,
हळूहळू,
पण ठाम पोहोचवतात!
मग सनातन सूर्य
त्या अर्थांचं पांघरूण विणतो
धरा नेमस्त गर्भार होते,
आणि झऱ्याला
अखंड शब्द मिळतात!
आता मी
त्या उगमापलीकडे जायचं म्हणतोय!
फक्त,
बुद्बुदाच्या उठण्या-मिटण्यामधला
क्षण सापडायचा अवकाश!
~ चैतन्य दीक्षित

बालभारतीच्या कवितेची गाणी

Submitted by Charudatta Sawant on 28 February, 2022 - 10:39
तारीख/वेळ: 
28 February, 2022 - 10:21
ठिकाण/पत्ता: 
तळेगाव दाभाडे, पुणे

बालभारतीच्या कवितेची गाणी

मला माझ्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या आपणा सर्वांनाच आवडत असत.

ह्या बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेला वाचक आणि श्रोत्यांसाठी त्या मी नवीन रुपात सादर केले आहे.

बालभारतीच्या कवितेची गाणी ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे.

माहितीचा स्रोत: 
https://charudattasawant.com/balbharati
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - कविता