रंगीबेरंगी
घर - दिशा की निर्णय?
घर घेताना तुम्ही जास्त महत्त्व कशाला देता ?
दिशा? वास्तु? अंकशास्त्र? की बजेट, लोकेशन आणि योग्य वेळ?
परवा एका फेसबुक ग्रुपवर घराबद्दलची एक पोस्ट पाहिली. घर त्यांना आवडलं होतं. पण पोस्टमध्ये सविस्तर माहिती होती. दरवाजा कोणत्या दिशेला, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला, कोणता मजला, कोणती बाजू… आणि शेवटी प्रश्न होता, हे घर घ्यावं की नको?
मला प्रश्न पडला , आपण घर घेतो ते राहण्यासाठी की गणित जुळवण्यासाठी?
"घडणं की बिघडणं?"
एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होत असतो. कधी कमी, कधी जास्त; कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. या प्रभावामुळे माणसाच्या विचारांमध्ये आणि वर्तनात बदल होतात. काही बदल अतिशय सूक्ष्म असतात, तर काही इतके ठळक की ते सहज जाणवतात. असे बदल बहुतांशी घरच्यांना जाचक वाटू लागतात.
मनातली मूगडाळ
धरून चालूया की तुम्ही ३५ किंवा ४० वर्षांचं आयुष्य जगलेले आहात. या प्रवासात असे असंख्य प्रसंग आले असतील, जिथे तुम्ही “जाऊ दे”, “आपलीच माणसं आहेत”, “दुर्लक्ष करू” अशा विविध कारणांच्या आड अनेक अप्रिय अनुभव गिळून टाकले असतील जणू कित्येक किलो मूग गिळल्यासारखे.
पण हे सगळं कसं पचवायचं? कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने?
की आयुष्यभर पोटात साठवत राहायचं…??
आणि वरून शांत असल्याचं नाटक करत राहायचं?
बदलत्या आकाशाच्या नव्या वेधशाळा
(हा लेख Feb 2026च्या BMM वृत्तात प्रसिद्ध झाला आहे. https://bmmonline.org/wp-content/uploads/2026/01/BMMNewsletterFeb2026.pd...)
चैतन्याचा प्रश्न
(हा लेख Jan 2026च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
https://www.sudharak.in/2026/01/14715/ )
चैतन्याचा प्रश्न
Culver City मधील This Is Not a Café.
संध्याकाळची वेळ. मोठ्या काचांपलीकडे रस्त्यावर रहदारी संथपणे सरकताना.
आत कॉफी मशीनची घरघर, आणि तीन जण एका कोपऱ्यातल्या टेबलवर.
सोमणे – समोर गरम मद्रास फिल्टर कॉफी.
कासवे – डबल एस्प्रेसो.
खेकडे – ओट मिल्क कॅपुचिनोवरच्या फेसात बोटे फिरवत.
सूर्यमालेपलीकडून आलेला अलीकडचा पाहुणा: 3I/ATLAS
(हा लेख Jan 2026च्या BMM वृत्तात प्रसिद्ध झाला आहे.
https://bmmonline.org/wp-content/uploads/2025/12/BMMNewsletterJan2026.do... )
पालथा घडा आणि मी

.
(दुपारी जरा लवंडावं म्हटलं, तर इकडंही आले हुडका काढीत. फोटो काढायला, आढ्यावर.)
.
अन्नं वै प्राणा: (९)
१८८०च्या सप्टेंबर महिन्यात पितृपक्षातल्या श्राद्धाच्या निमित्तानं वामनराव आपट्यांच्या [१] घरी विष्णुशास्त्री चिपळूणकर [२], गोपाळ गणेश आगरकर, बळवंतराव टिळक, महादेवराव नामजोशी [३] आणि न्यू इंग्लिश शाळेतले सर्व शिक्षक जमले होते. गप्पा सुरू असताना आपण इंग्रजी आणि मराठी अशी दोन साप्ताहिकं काढावीत, असं विष्णुशास्त्र्यांनी सुचवलं. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा एकाच वर्तमानपत्रांमध्ये वापरण्यापेक्षा दोन स्वतंत्र वर्तमानपत्रं चालवण्याची ही कल्पना टिळक आणि आगरकर या दोघांनीही उचलून धरली. श्री.
सत्यमेवा जयते
गेल्या महिन्यात (जुलै 2024) नारळीकरांच्या वाढदिवसानिमित्त मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा वाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात माझी एक कथा वाचण्यासाठी मला आमंत्रित केले होते. तेव्हा वाचलेल्या सत्यमेवा जयते या कथेची ही युट्युब लिंक. ही कथा एका टोप नावाने ऐसी अक्षरेमध्ये 2020 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ही कथा माझ्या घोस्ट रायटर आणि इतर विज्ञान कथा या समकालीन प्रकाशनाच्या पुस्तकात नाही.