तळवलकर - श्री. मुकेश माचकर
लहानपणी पेपर वाचायला मिळायचा गल्लीतल्या सार्वजनिक वाचनालयात. ते घराच्या सरळ रेषेत रस्त्यापलीकडेच होतं. त्याच्या आठ कप्प्यांमध्ये पेपर लागले की, लगेच धावत रस्ता पार करून त्यांच्यावर झडप घालायचो. पण, त्या काही सेकंदांमध्येही तिथे ठिय्या मारूनच बसलेले अधीर आणि ज्येष्ठ पेपरवाचक मिळेल त्या पेपरवर कब्जा करायचे. त्या मारामारीतही आरामात हाताला लागायचा तो महाराष्ट्र टाइम्स अर्थात मटा.