स्वप्नी आले काही...
लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की "आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ". "आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ" करत बाबांकडे जावं. बाबांनी रट्टा दिला की आई आहेच जवळ घ्यायला. कधीकधी नुसतं ओरडलेलंही पुरतं, लगेच भोकाड पसरावं. क्षणात हसावं, क्षणात रडावं. पण रडल्यावर बर्याचदा पुढच्या पाच मिनिटात सगळं विसरून परत जवळ यायला बाई तयार.
