मार्च महिन्यात मुंबई वरून सकाळी ९ वाजताची फ्लाईट आहे, पुण्यावरून सकाळी लवकर निघण्यापेक्षा रात्री मुंबई एअरपोर्ट शेजारी राहून सकाळी ६ वाजता एअरपोर्ट ला जाता येईल. मुलगी आणी मीच आहे, कुणाला माहित असेल तर सुरक्षित चांगले हॉटेल जे एअरपोर्ट जवळ असेल असे सुचवा.
गेली सात-आठ वर्ष आम्ही इकडे, सॅन होजे , कॅलिफोर्निया मध्ये राहतोय. या काळात जरी पूर्ण अमेरिका बघितली नसली तरी बरेच आंबटगोड अनुभव घेतलेत. कौतुक वाटणाऱ्या गोष्टीत आहेत तर काही तितक्याच खटकणाऱ्याही. जगाच्या दोन टोकांना असणाऱ्या ह्या देशांमध्ये भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बरीच भिन्नता आहे. पण कुठेतरी एक समाज म्हणून, माणूस म्हणून एखादा समान धागाही सापडतो.
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात!
✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड
✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर!
✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन)
✪ सायकलिंगचे मानसिक पैलू
✪ भाषेचा अडथळा? हो आणि नाही.
✪ कल्याण कर्नाटक प्रदेश
✪ ५ दिवसांमध्ये ४३८ किमी पूर्ण
निघालो होतो कोकणात. रातराणीचा प्रवास चांगला चालला होता. दिवस पावसाचे असले तरी पाऊस पडत नव्हता. गाडी वेळेला धरुन चालली होती. मोजकेच प्रवासी होते. बंगळूर रस्ता सोडून गाडी कोकणवाटेला लागली कधी पत्ताही लागला नाही. हा टप्पा गेलाबाजार मी साताठ वर्षं तरी बघतोय. ना कधी गर्दी, ना कधी काम चालू ना रस्ता बंद. तरीही गुळगुळीत! खड्डे असलेच तर एखाद्या सुकांत चंद्राननेच्या गालावर मोहक स्मिताने खुलणाऱ्या खळीएवढेच!
सुरुवातीची ओळ बा. भ. बोरकरांच्या सुप्रसिद्ध कवितेवरून सुचल्यामुळे त्यांची मनापासून क्षमा मागत आहे.
खूप या पुलास फाटे
एक जाया, कैक याया
सायंकाळी अन् सकाळी
वेळ हा जाणार वाया
विमाने देशी-विदेशी
उतरती ती उत्तरेला
मार्ग हैद्राबाद जाण्या
होय तोही त्या दिशेला
रिंगणे वा कंकणे दो
बंगळूरूच्या सभोती
नाव त्यांचे रिंग रोड
आहे सर्वांच्याच खाती
ओलांडुनी त्या रिंग रस्त्या
प्रवेशिण्या शहरामध्ये
वाहनांची रांग येथे
पुलावर्ती चढू लागे
श्रीनगर ते सोहनेवाल अंतर ४९७ किमी
आजची सकाळ जरा जास्तच आल्हाददायक होती, एक तर लेह लडाख च स्वप्न पूर्ण झालं होतं आणि ते पण मनाली श्रीनगर पूर्ण सर्किट. समीर आणि मी तयार झालो तो पर्यंत बाकी दोघे अजून साखर झोपेत होते. त्यांना पटकन आवरायला सांगून आम्ही गाडी बाहेर घेवून थोडी साफ केली.
https://photos.app.goo.gl/uhykvG7h6NKLVPkd6'