इंग्रजी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल
२०१२ मधे बातम्या.कॉम मायबोली वेबसमुहात सामील झाली. नंतर २०१४ मधे आपण बातम्या एकत्र दाखवणार्या, हिंदी आणि कानडी भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. त्यानंतर २०१५ मधे बंगाली आणि गुजराती भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. यावर्षी नुकतीच आपण इंग्रजी भाषेतली बातम्यांचे मथळे एकत्र दाखवणारी वेबसाईट सुरु केली आहे. बातमी संपूर्ण वाचायची असेल तर मूळ स्रोताची लिंकही तिथेच दिली आहे.