नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल
मोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.
या अगोदर
आता
मोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.
या अगोदर
आता
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.
मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1
शिवसहस्त्र नामावलीतील 'चंद्रमौळी' या तेराव्या नावाचा महिमा अनुभण्याचा योग आला तो गेल्या वर्षीच्या माघ कृष्ण सप्तमीला.. सह्याद्रीच्या खांद्यावर ध्यानस्थ बसलेल्या लिंगाण्याच ते दुर्गम रुप म्हणजे तालमीतल्या मातीत रंगलेला मल्लंच जणू... त्याच्या कातील धारेवरिल चढाईतील जरब इतकी की, शड्डू ठोकत आव्हान देणार आखाड्यातला नरविरच भासावा... घोटीव शरिरबंधावर रुंद कपाळीचा कडा, वार्यालाही थारा न देणारा निमुळता माथा आणि त्यावर झळकणारी सप्त्मीची चंद्रकला... वाह!
१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती!
२०१६.. दोन वर्षांपुर्वी मकर संक्रमणाच्या मुहुर्तावर मुंबईहून निघालो ते दांडेलीच्या ओढीने... मध्यरात्रीच्या सुमारास केपीला पुण्यातून उचलून बेळगावचा रस्ता धरला. गाडीत तिघे चक्रधर असले तरी चक्रधर स्वामींची जबाबदारी अस्मादिकांवरच होती. दिवसभर ऑफिस गाजवून नंतर रात्री ड्रायव्हिंग केल्यामुळे कोल्हापूर येईतो पापण्या जडावू लागल्या होत्या... चहाचा अनिवार्य ब्रेक घेऊन चक्रधर स्वामींची जबाबदारी विनय वर सोपवली आणि मागच्या सीटवर अनिरुद्ध शेजारीच हेडरेस्ट वर मान टाकली..
जसं प्रत्येक आईला आपलं मुल सर्वात सुंदर वाटतं, तसं बहुधा जगातल्या प्रत्येक मुलाला/मुलिला आपली आईच सर्वात सुंदर आणि सुगरण वाटत असेल. आणि त्या प्रत्येक मुलाकडे/मुलिकडे आईच्या म्हणून असंख्य आठवणी असतील. पण माझ्याकडे त्या तश्या अतिशय थोड्याच आहेत.
मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.