सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने जे अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले, त्यांपैकी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट म्हणजे ’वास्तुपुरुष’. यातले प्रमुख कलाकार आहेत उत्तरा बावकर, सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रेणुका दफ्तरदार आणि सिद्धार्थ दफ्तरदार.
डॉ. भास्कर नारायण देशपांडे (महेश एलकुंचवार) यांना ’प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’ या क्षेत्रात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत केलेल्या कामासाठी मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो, या बिंदूवर हा चित्रपट सुरू होतो आणि मग डॉ. भास्कर देशपांड्यांच्या स्मृतींमधून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.
दिग्दर्शिका "सुमित्रा भावे" यांचे चित्रपट समजून घेणं, हीच खरी श्रध्दांजली....
ऋतुपर्ण घोष यांच्या निधनाला काल सहा वर्षं पूर्ण झाली. उन्नीशे एप्रिल, तितली, बाडीवाली, नौकाडुबी, दहन, शुभो मुहूरत, अंतर्महाल, खेला, चित्रांगदा असे एकापेक्षा एक सरस चित्रपट निर्मिणारा हा एक थोर कलावंत होता.
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याशी त्यांचा दाट स्नेह होता.
ऋतुपर्ण घोष यांच्या अकाली निधनानंतर सहा महिन्यांनी सुमित्रा भावे यांनी एका दिवाळी अंकासाठी जो लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
सुमित्रा भावे - सुनीक सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.
सुमित्रा भावे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगणारा हा लेख.
***
६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=Hs5kdjwmizU
डॉ. मोहन आगाशे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.
'व्हेंटिलेटर', 'दशक्रिया', 'सायकल' या मराठी चित्रपटांनाही यंदा पुरस्कार मिळाले आहेत.
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.
'मुळी अधिक जाणिवेचे | अधिष्ठान आहे' अशा शब्दांत दासबोधात अंतरात्म्याची एक ओळख सांगितली आहे. माणसाचा सत्याचा शोध युगानुयुगे चालत आलेला आहे. पण हा सत्याचा शोध माणसाच्या माणूसपणाच्या जाणिवेतच रुतला आहे का? जाणिवेच्या पलीकडचं काही सत्य असतं की नाही? असे अनेक प्रश्न व त्यांचा उहापोह 'अस्तु - so be it' च्या निमित्ताने डोक्यात येतात. चित्रपटाच्या सुरवातीलाच 'सत्य हे जाणिवेतून येतं' (Truth stems from awareness) अशासारखं एक वाक्य आहे. हा ह्या चित्रपटाचा आत्मा म्हणायला हरकत नसावी.
एक चित्रपट दिग्दर्शिका.
एक निर्मात्री.
एक लेखिका आणि एक अभिनेत्री.
या दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.
पण या संहितेचा शेवट कसा असावा?
आपली संहिता आपल्याला लिहिता येते का?
या चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का?
सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.
प्रिय मित्रांनो,
म्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...
इंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.
लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.
इंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर!
आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.
आमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.