आयुष्यातील सौंदर्यस्थळं
एखादी व्यक्ती लाम्बून पाहून पाहून बरी वाटते, मग आवडायला लागते. हळू हळू तुम्हाला हे ही कळते की त्या व्यक्तीला पण तुम्ही आवडता बहुधा. कारण ही आवडण्याची प्रक्रिया रस्त्यात मुद्दाम येण्याजाण्याच्या वेळी थाम्बणे, कंपनीच्या बसने एकत्र प्रवास करणे, लिफ्ट मध्ये भेटणे यातून सुरू झालेली असते. एक दिवस कानात हेडफोन लावून आपण गाणं ऐकत असताना अचानक तो समोर येतो, मग पुन्हा कधीतरी तेच 'घुंघट की आड से...' ऐकताना त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. नकळत चेहऱ्यावर स्मितहास्य येते. पण तुमचे हे गुपित फक्त तुम्हालाच माहित असल्याने तुम्ही अजून खूष होता. गाणी वाढत जातात, कधी 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना...