विचित्र निर्मिती

'कासव'चे दुसर्‍या आठवड्यातले खेळ

Submitted by चिनूक्स on 11 October, 2017 - 14:36

६ ऑक्टोबरला 'कासव' प्रदर्शित झाला, तेव्हा त्या आठवड्यात एकूण सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानं आणि अगोदरचे चित्रपट सुरू असल्यानं 'कासव'ला मुंबईत आणि इतरत्र चित्रपटगृहं मिळू शकली नव्हती.

पुण्यात आणि इतरत्र 'कासव'ला प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीमुळे आता दुसर्‍या आठवड्यात 'कासव' ५१ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

’कासव’चं दुसर्‍या आठवड्यातलं वेळापत्रक -

१. एक्सेलसियर - दक्षिण मुंबई - दु. ३.३०

२. रॉक्सी - गिरगाव - संध्या. ६

३. प्लाझा - दादर (प.) - संध्या. ६.३०

४. गोल्ड - दादर (पू.) - संध्या. ७

विषय: 

'कासव'बद्दल सांगतायेत सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर

Submitted by चिनूक्स on 1 October, 2017 - 05:49

सातत्यानं सकस, दर्जेदार चित्रपटांची निर्मिती - दिग्दर्शन करणार्‍या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचा 'कासव' हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

२०१६ सालाचा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार 'कासव'ला मिळाला आहे.

या चित्रपटाबद्दल सांगत आहेत सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर.

***

मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.

***

विषय: 

६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार्‍या 'कासव'चं ट्रेलर

Submitted by चिनूक्स on 29 September, 2017 - 10:54

२०१६ सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळवणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

'कासव'चं ट्रेलर -

विषय: 

'नाटकवेडा' - आलोक राजवाडे

Submitted by चिनूक्स on 29 September, 2017 - 09:03

उत्तम, प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक आणि नट म्हणून आलोक राजवाडेची ख्याती आहे. फोर्ब्सच्या 'थर्टी अंडर थर्टी' या यादीत झळकलेल्या आलोकला 'कासव'मधल्या अभिनयासाठी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं.

'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्या निमिताने आलोक त्याच्या नाट्यसृष्टीतल्या पदार्पणाबद्दल सांगतोय.

माझी 'कॅथलिक' मैत्रीण फ्रान्सिस - सुमित्रा भावे

Submitted by चिनूक्स on 27 September, 2017 - 23:43

सुमित्रा भावे - सुनीक सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

सुमित्रा भावे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगणारा हा लेख.

Kaasav_title.gif

***

Sumitra Bhave Lekh_Maher Diwali 2012-1.jpg

'लहर समंदर रे...' - 'कासव'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 September, 2017 - 00:59

राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळवलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

या चित्रपटातलं 'लहर समंदर रे..' हे गाणं -

या गाण्याचे संगीतकार आहेत साकेत कानेटकर आणि ते गायलं आहे सायली खरे यांनी.
सुनील सुकथनकर यांनी हे गाणं लिहिलं आहे.

***

'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय + टीझर

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 September, 2017 - 08:25

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

'कासव'ची पहिली झलक -

सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती यांची आहे.

इरावती हर्षे, अलोक राजवाडे, किशोर कदम, संतोष रेडकर, ओंकार घाडी आणि डॉ. मोहन आगाशे

विषय: 

'कासव'ची गाणी

Submitted by चिनूक्स on 11 April, 2017 - 02:20

'कासव' या डॉ. मोहन आगाशे निर्मित आणि सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटास नुकताच सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

'कासव' या चित्रपटाचं संगीत - पार्श्वसंगीत साकेत कानेटकर यांचं आहे. 'कासव'मध्ये दोन गाणी आहेत. ती सुनील सुकथनकर यांनी लिहिली असून सायली खरे व अलोक राजवाडे यांनी गायली आहेत.

१. 'लेहर समंदर'

गीत - सुनील सुकथनकर
संगीत - साकेत कानेटकर
स्वर - सायली खरे

२. अपने ही रंग में

'कासव'ला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ

Submitted by चिनूक्स on 7 April, 2017 - 03:40

६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Hs5kdjwmizU

डॉ. मोहन आगाशे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.

'व्हेंटिलेटर', 'दशक्रिया', 'सायकल' या मराठी चित्रपटांनाही यंदा पुरस्कार मिळाले आहेत.

सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.

मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.

विषय: 

परिवर्तन ट्रस्ट निर्मित लघुपट - 'जागृती' व 'मन की आँखे'

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

७ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक आरोग्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेनं 'नैराश्य', म्हणजे 'डिप्रेशन' या आजारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून या वर्षीची संकल्पना आहे - 'चला बोलूया - नैराश्य टाळूया' ('Depression– Let’s talk').

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - विचित्र निर्मिती