मायबोलीचे नवीन सेवादात्याकडे स्थलांतर

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

मायबोलीचे नवीन सर्वरवर आणि नवीन सेवादात्याकडे स्थलांतर पूर्ण झाले आहे.

मायबोलीवरच्या सुविधांमधे (किंवा असलेल्या अडचणींमधे ) काहीच बदल झालेला नाही. सभासदांना काहीच बदल जाणवू नये अशी अपेक्षा आहे. काही कारणामुळे पाने नीट दिसत नसतील तर तुमच्या ब्राउझरची पाने ताजीतवानी करून घ्या.
जर काही नवीन अडचणी आल्या तर कृपया इथे लिहा म्हणजे त्यावर मार्ग काढता येईल.

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद. ५-१० मिनीटे वापरल्यानंतर अजूनतरी काही अडचण, एरर वगैरे आलेला नाही.

>>मायबोलीचे नवीन सर्वरवर (आणि नवीन सेवादात्याकडे) स्थलांतर पूर्ण झाले आहे.<<
एक उत्सुक्तता म्हणुन - एडब्लुएस वर होस्ट केली का?

अजूनतरी व्यवस्थित चाललंय. आणि थोडा वेगही वाढलेला वाटतोय. पण नवीन सर्व्हरवर स्थलांतर का केलं? काही माहिती मिळेल का? सहज एक उत्सुकता म्हणून विचारतोय.

मायबोली जशी वाढते आहे तशा आपल्या गरजाही वाढत आहेत. साधारण ३-४ वर्षांनी याचा आढावा घेउन सध्याच्या सेवादात्याकडून मिळणार्‍या सुविधा, भविष्यात मिळणार्‍या सुविधा आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत याचा पुनर्विचार करणे गरजेचे असते. हे आतापर्यंत बर्‍याचदा केले आहे. पूर्वी एकाच सर्वरवर भागत असे. आता मायबोली, मायबोली नेटवर्कवरच्या इतर वेबसाईट, त्यांचे वेब सर्वर, त्यांचे डाटाबेस सर्वर, सीडीएन, मेमकॅश सर्वर, या सगळ्यांचे सॉफ्टवेअर अपडेट्स याचा विचार करता हे दिवसेंदिवस किचकट होत चालले आहे.
पूर्वी रॅकस्पेस नावाच्या सेवादात्याकडे होतो आता एडब्लुएस वापरतो आहोत. रॅकस्पेसचा अनुभव खूप चांगला होता पण आता आपल्याला लागणार्‍या सुविधासांठी त्यांच्याकडून खूपच जास्त किंमत मोजावी लागते आहे त्यामानाने सध्यातरी एडब्लुएस कमी आहे आणि त्यांच्या कडे वेबमास्तरांचे काम कमी करण्यासाठी अधिक सुविधा आहेत असे सध्यातरी वाटते आहे. Happy अजून काही तासच झाले असल्याने लक्ष ठेवून आहे.

>>>>Submitted by webmaster on 23 April, 2017 - 08:40<<<<

छान माहिती मिळाली.

छान !

वेबमास्तर,

प्रतिसाद द्यायच्या खिडकी खाली जे "Text format " सिलेक्शन दिलेले असते, त्यात "Full HTML" हा पर्याय देता येईल का? जेणेकरुन युटुब, फेसबुक व ट्विटर वरिल व्हीडीओ/ट्विट इथे "EMBED" स्वरुपात देता येतील.

Untitled.png