"नवीन लेखन" पाहण्याच्या सुविधेत काही बदल

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीवर हव्या त्या ग्रूपचे सभासद होण्याची आणि फक्त त्याच ग्रूपमधले लेखन पाहता येईल अशी सुविधा अनेक वर्षांपासून आहे. पण तरीही मला नको त्या विषयावरचे लेखन/प्रतिक्रिया पहाव्या लागतात अशी तक्रार नेहमी ऐकण्यात येते. याची दोन कारणे होती.
१) नवे लेखन वर टिचकी मारली तर जी यादी दिसते ती सगळ्या मायबोलीवरच्या सगळ्याच ग्रूपमधल्या धाग्यांची/प्रतिक्रियांची दिसते. फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधले लेखन पाहण्याची यादी होती त्यावर वेगळी टीचकी मारावी लागे. अनेक मायबोलीकरांनी ही सुविधा वापरलीही नाही २) जरी तुम्ही फक्त तुमच्या ग्रूपमधले लेखन पहायचे म्हटले तरी काही लेखन हे सार्वजनिक असल्याने दुसर्‍या ग्रूपमधलेही लेखन दिसत असे.

आजपासून या सुविधेत काही महत्वाचे बदल करतो आहोत.

पूर्वीप्रमाणेच वर "नवीन लेखन" टिचकी मारायची. तुम्ही ती लिंक बुकमार्क केली असेल तर काहीही बदल करायची गरज नाही. नवीन काही वेगळे करण्याची गरज नाही.

तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल तर (Logged in असाल तर) , तुम्हाला By Default "माझ्यासाठी नवीन" ही यादी दिसेल. मायबोलीवर ज्या ग्रुपचे तुम्ही सभासद आहात फक्त त्याच ग्रूपमधले नवीन लेखन तुम्हाला दिसत राहील. तुम्ही जसे जसे एक एका पानाला भेटी द्याल तशी ही यादी कमी होत जाईल. इथला बदल म्हणजे , ज्या ग्रूपचे तुम्ही सभासद नाहीत, त्या ग्रूपमधले नवीन सार्वजनिक धागे या यादीत दिसत, ते आता दिसणार नाहीत. मायबोलीवर पटकन "नवीन काय" पहायचे आहे , पण जास्त वेळ नाही, अशा वेळी हि सुविधा उपयोगी पडेल.

तुमच्याकडे जास्त वेळ आहे किंवा या अगोदर पाहिलेले धागे पुन्हा जरा निवांत पहायचे आहेत तर "ग्रूपमधे नवीन" या बटनावर टिचकी मारून त्या धाग्यांची यादी दिसायला लागेल. पूर्वीप्रमाणेच कुठल्या धाग्यावर कुठल्या प्रतिक्रिया नवीन आहेत हे ही दिसेल. इथला बदल म्हणजे फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलेच धागे दिसतील. इतर ग्रूपमधले धागे सार्वजनिक असले तरी दिसणार नाहीत.

तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि सगळ्याच मायबोलीवर काय चाललंय ते वाचायचं आहे, तर पूर्वी प्रमाणेच "मायबोलीवर नवीन" या बटनावर जाऊन ते वाचता येईल. जे मायबोलीवर वाचनमात्र आहेत त्यांच्यासाठी ही by Default यादी असेल. या यादीतला बदल म्हणजे जे गप्पांचे धागे आहेत ते या यादीत दिसणार नाही. जे सभासद नाहीत त्यांना गप्पांच्या धाग्यांवर काय चालले आहे हे पहाण्यात रस नसतो. आणि त्यांना त्या पानावर काय चालले आहे ते कळतही नाही. गप्पांची पाने या यादीतून काढल्यामुळे मायबोलीवर इतरत्र असलेले लेखनाचे धागे जास्त वेळा दिसतील. जे प्रवेश केलेले मायबोलीकर आहेत (Logged in ) आणि ग्रूपचे सभासद झाले आहेत त्याना त्यांची गप्पांची पाने "माझ्यासाठी नवीन" आणि "ग्रूपमधे नवीन" या याद्यांमधे दिसत राहतील.

प्रत्येक वाचकाची नवीन लेखन वाचायची पद्धत आणि अपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एकाच प्रकारे काम करणारी सुविधा अपुरी पडत होती. या नवीन बदलांमुळे प्रत्येकाला थोडे आपआपल्या पद्धतीने मायबोलीला भेट देऊन हव्या त्या विषयावरचे वाचन करणे सुलभ होईल.

विषय: 
प्रकार: 

हे फार छान झाले!
अजून एक विनंती - पोस्टकर्त्याचे नाव पोस्टच्या खाली येण्याऐवजी पूर्वीसारखे पोस्टच्या वर करता येईल का? ही अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला_/\_

तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलेच धागे दिसतील. इतर ग्रूपमधले धागे सार्वजनिक असले तरी दिसणार नाहीत.>>>>>>
हे एक छान झाले अडमीन,
याच बरोबर कु. ऋन्मेष चे धागे असा एक ग्रुप करता येईल का?
त्या ग्रुप चे मेम्बर नसू तर धागे दिसणे बंद होईल का?

अजून एक विनंती - पोस्टकर्त्याचे नाव पोस्टच्या खाली येण्याऐवजी पूर्वीसारखे पोस्टच्या वर करता येईल का? ही अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला_/\_ <<<
+१०००००००००

अजून एक विनंती - पोस्टकर्त्याचे नाव पोस्टच्या खाली येण्याऐवजी पूर्वीसारखे पोस्टच्या वर करता येईल का? ही अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला_/\_ <<<
+१०००००००००

अजून एक विनंती - पोस्टकर्त्याचे नाव पोस्टच्या खाली येण्याऐवजी पूर्वीसारखे पोस्टच्या वर करता येईल का? ही अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला_/\_ <<<
+१०००००००००
>>>>>>

वर करा किंवा खाली करा पण पहिल्यासारखे मोठे ठसठशीत करा Happy

बाकी आता दिलेली सुविधा चांगली. बापरून समजेल काय किती फायदा.

मला अमुक तमुक वैताग देत होते वगैरे अश्या पोस्ट आता ईथे खूप येतील. पण शक्य झाल्यास त्यातील वैतागवाण सूर टाळा. कारण ते आणखी कोणाच्या तरी आवडीचे असते म्हणून ईतके डिमाण्ड मध्ये असते. त्यामुळे ईतर कोणाच्या आवडीला नावे ठेवणे जरा योग्य वाटत नाही.

इतर नाही रे, तूच तो

नाव वरती आणि ठसठशीत पाहिजे याला जोरदार अनुमोदन. कित्येक वेळा कारण नसताना पोस्ट वाचत खाली यावे लागते.

धन्यवाद प्रशासक, खूपच चांगले बदल आहेत.

याचबरोबर पोस्ट करणार्याचे नाव पोस्टच्या आधी येईल ही सोय पुन्हा सुरु करावी. त्याशिवाय ही नवी सुविधा effective ठरणार नाही.

वर "नविन लेखन" मेनुत दोन ड्रॉपडाउन ऑप्शन्स आहेत - मेनु.१. संपुर्ण मायबोलीवर नविन लेखन आणि, मेनु.२. निवडक मायबोली
धाग्याच्या खाली तीन बटन्स आहेत - ब.१ माझ्यासाठी नविन, ब.२ ग्रुपमध्ये नविन आणि, ब.३ मायबोलीवर नविन

यापैकि, मेनु.१ आणि ब.१ चं बिहेवियर सारखंच आहे. त्याऐवजी ते ब.३ सारखं (मेनु.१ = ब.३) असायला हवं ना?

@राज इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
>त्याऐवजी ते ब.३ सारखं (मेनु.१ = ब.३) असायला हवं ना?
नाही. मेनू बरोबर आहेत. बिहेवियर बरोबर आहे. पण शीर्षक चुकले होते ते बरोबर केले आहे. ब-३ मेनूत द्यायचा विचार नव्हता. किंवा by default ब-३ वर जायची सोय असल्याने प्रत्येकाला हवे त्याच ग्रूपमधले दिसत नव्हते.

Double पोस्ट

@च्रप्स, धन्यवाद. ते का होतंय हे माहीती आहे पण त्यावर पटकन योग्य उपाय सापडत नाही. मधून मधून हे होईल त्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. पण त्यातल्या कुठल्याही एका धाग्याला भेट दिल्यावर बाकीचे धागेही, अजून वाचायचंय या यादीतून गळतील.

अतिशय चांगले बदल.

वेमा, अ‍ॅडमिन आणि कोअर टीमचे आभार.

मी आत्ताच विरंगुळा मधल्या शीर्षक क्रमवर लिहिले. पण मायबोली वर नवीन मधे धागा दिसत नाहीय. बाकी वाचून झालेले, नवीन प्रतिसाद नसलेले दिसताहेत.

माझ्यासाठी नविन आणि गृप मध्ये नविन
हे एकच आहे ना.?
मी जेजे गृप फॉलो करतो त्यात जे काही नविन असेल ते मला माझ्यासाठी नविन मध्ये दिसणारच
मग गृप मध्ये नविन यात काय नविन दिसणार ?

नाव वरती आणि ठसठशीत पाहिजे याला जोरदार अनुमोदन. कित्येक वेळा कारण नसताना पोस्ट वाचत खाली यावे लागते.>> मला तर त्यात गम्मत वाटते.
प्रतिसाद वाचत असतानाच अंदाज यायला लागतो कि हे कोण बोलत असेल Happy

@ प्राण,

१) 'मायबोलीवर नवीन' मध्ये सर्व ग्रुपचे सर्व धागे (गप्पांचे धागे वगळून) दिसतात.

२) 'ग्रुपमध्ये नवीन' मध्ये फक्त तुमच्या ग्रुपचे सर्व धागे आणि प्रतिसाद दिसतात.

३) 'माझ्यासाठी नवीन' मध्ये फक्त तुमच्या ग्रुपचे पण तुम्ही न वाचलेले धागे आणि प्रतिसाद दिसतात.

@सोनू.
शीर्षक क्रम हे वाहते पान आहे. वाहती पाने आता "मायबोली वर नवीन" मधे दिसणार नाही.
@ प्राण,
वर सचिन काळे यांनी सांगितलेले बरोबर आहे. थोडे विस्तारीत करून सांगतो,
असं समजा तुम्हाला दुपारी १ वाजता मायबोलीवर यायला फक्त ५ मिनिटे वेळ आहे. तुम्ही "माझ्यासाठी नवीन" यादी पाहिली तर त्यात ३ पानांवर नवीन लेखन/ प्रतिक्रिया आहेत. यावेळेस "माझ्यासाठी नवीन" आणि "ग्रूपमधे नवीन" सारखेच असतील.
पुढच्या ५ मिनिटात तुम्ही ती सगळी ३ पाने / प्रतिक्रिया पटकन वाचलीत तर १:०५ ला "माझ्यासाठी नवीन" ही यादी पूर्ण रिकामी झाली असेल. पान २ वर खरंतर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची होती पण आता वेळ नाही. मग तुम्ही रात्री आठला सवडीने लॉगीन केले तर "माझ्यासाठी नवीन" मधे तुम्हाला पान २ दिसणारंच नाही (जर तिथे नवीन काही आले नसेल तर) कारण त्याला तुम्ही एकदा भेट दिली आहे. मग तुम्ही "ग्रूपमधे नवीन" मधे गेलात तर पुढचे १५ दिवस ते पान दिसत राहील त्यावर जाऊन तुम्हाला प्रतिक्रिया देता येईल.

Pages