मेनका प्रकाशन

'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' - मूळ लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, अनुवाद - सुजाता देशमुख

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

हाँसदा सौभेन्द्र शेखर हा संथाळी आदिवासी तरुण लेखक आणि झारखंडच्या पाकुर इथल्या सरकारी इस्पितळात काम करणारा डॉक्टर. त्याच्या ‘द मिस्टिरियस एलमेन्ट ऑफ् रूपी बास्की’ या पुस्तकाला २०१५ चा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे. हाँसदाच्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातल्या एका कथेमुळे ‘संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण होतं आहे’ अशा आरोपावरून त्याला झारखंड राज्य सरकारनं कोणत्याही खुलाशाविना तात्पुरतं बडतर्फ केलं आहे. त्याच्या पुस्तकावरही अर्थातच बंदी घातली आहे.

विषय: 
प्रकार: 

'युगमुद्रा' - बाबा आमटे : साधना, वारसा आणि प्रेरणा

Submitted by चिनूक्स on 23 December, 2014 - 14:41

परवा, म्हणजे २६ डिसेंबर रोजी बाबांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता होते आहे. या दिवशी लोकबिरादरी प्रकल्पाच्या नव्या, अत्याधुनिक दवाखान्याचा लोकार्पण सोहळा हेमलकशाला होणार आहे. बाबांच्या जन्मशताब्दीवर्षाच्या निमित्तानं महारोगी सेवा समिती आणि आमटे कुटुंबीय यांच्या सहकार्यानं तयार झालेल्या मेनका प्रकाशनाच्या 'युगमुद्रा' या पुस्तकाचं प्रकाशनही याच कार्यक्रमात होणार आहे.

'नाही लोकप्रिय तरी' - बर्ट्रांड रसेल (अनु. - डॉ. करुणा गोखले)

Submitted by चिनूक्स on 13 August, 2014 - 02:58

Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free.

- बर्ट्रांड रसेल

बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे.

विषय: 

'गोष्टी सार्‍याजणींच्या' : 'मिळून सार्‍याजणी'तल्या निवडक कथा - मेनका प्रकाशन

Submitted by चिनूक्स on 21 August, 2013 - 12:54

'मिळून सार्‍याजणी' या मासिकाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. 'मिळून सार्‍याजणी' हे जगण्याशी, प्रामुख्यानं स्त्रीच्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलं गेलेलं आणि म्हणूनच अनुभवांना प्राधान्यानं स्थान देणारं मासिक आहे. स्त्रीप्रश्नांबाबत बोलताना पुरुषांनाही सामावून घेत 'जगणं' जोडून घ्यायचा प्रयत्न या मासिकानं सतत केला आहे. जगण्याचा अनुभव देणार्‍या, या मासिकात आजवर प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक कथांचा संग्रह - 'गोष्टी सार्‍याजणींच्या'.

'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' - श्री. सुमेध वडावाला (रिसबूड)

Submitted by चिनूक्स on 19 March, 2012 - 00:13

खरा भारत हा खेड्यांमध्ये वसला आहे, असं आपण कायम ऐकत असतो, वाचत असतो. मात्र या खर्‍या भारताकडे अजून सरकारचंच पुरेसं लक्ष गेलेलं नाही, तर बड्या कंपन्यांना तरी हा भारत कसा माहीत असणार? भारतातल्या शहरांबाहेर राहणार्‍या अवाढव्य लोकसंख्येपर्यंत पोहोचायचं कसं, हा प्रश्न त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कायमच भेडसावत आलेला आहे. कारण या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जी सखोल माहिती हवी, तीच मुळात उपलब्ध नाही. ही माहिती मिळवणं हे भारतासारख्या खंडप्राय देशात महाकठीण.

'पेज थ्री' - मंगला गोडबोले

Submitted by चिनूक्स on 12 September, 2011 - 23:47

स्त्रियांना विनोद कळत नाही, आणि त्यांना विनोद करता येत नाही, असा एक समज मराठी वाचकांमध्ये पूर्वापार आहे. रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ अशा लेखकांनी त्यांच्या लेखनांतून, मुलाखतींमधून या समजाला चांगलंच खतपाणी घातलं. शकुंतला फडणीस, पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, मंगला गोडबोले यांनी मात्र सातत्यानं दर्जेदार विनोदी लेखन करत या समजाला छेद देण्याचं काम उत्तमरीत्या केलं.

विषय: 

'अठरा धान्यांचं कडबोळं' - अनुवाद : डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर

Submitted by चिनूक्स on 27 March, 2011 - 23:54

मराठी साहित्यात अनुवादांचं स्थान मोठं आहे. वामन मल्हार जोश्यांपासून भारती पांडे, अपर्णा वेलणकरांपर्यंत अनेकांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणलं. मात्र हे अनुवाद बहुतांशी नाटकं, कादंबर्‍या आणि क्वचित कविता व प्रवासवर्णनांपर्यंतच मर्यादित राहिले. उत्तमोत्तम कथा मराठीत फारशा आल्या नाहीत. फार वर्षांपूर्वी जयवंत दळवी 'यूसिस'मध्ये कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रभाकर पाध्ये आणि शांताबाई शेळक्यांकडून इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करून घेतले होते. हे अनुवाद बरेच गाजले. शांताबाईंनी केलेल्या या अनुवादांचं दुर्गाबाई भागवतांनी स्वतंत्र लेख लिहून कौतुक केलं होतं. नंतर मात्र असे प्रयत्न झाले नाहीत.

Subscribe to RSS - मेनका प्रकाशन