प्रताधिकारमुक्त फोटो/चित्रे मोफत कशी मिळवायची ? How to find copyright free images ?
मायबोलीवर असलेली चित्रे/फोटो प्रताधिकारमुक्त किंवा प्रताधिकार मालकाची रीतसर परवानगी घेऊनच प्रकाशीत करावी असे धोरण आहे. गेल्या काही दिवसात अशी चित्रे / फोटो मिळवणे सोपे झाले आहे. इतकच नाही तर या साईटसवर आता खूप चांगल्या प्रतीचे फोटो आहेत. खालील साईटवरचे फोटो प्रताधिकारमुक्त असून कुठल्याही कारणासाठी ( व्यावसायिक सुद्धा) मोफत वापरता येतात. काही फोटो मोफत वापरता येतात पण जिथून फोटो घेतला त्या साईटचे / फोटोग्राफर चे क्रेडीट द्यावे असा नियम असू शकतो. . त्या त्या फोटोखालचे लायसन्स वापरून त्या चित्राचा/फोटोचा वापर करावा. फक्त एका कारणासाठी फोटो वापरता येत नाही.